
नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा झाला आहे. गेल्या २४ तासांत देशातील रुग्णसंख्येत २१ टक्के इतकी वाढ झाली असून २७ हजार ५५३ नवे बाधित आढळले आहेत. त्याचवेळी २८४ रुग्णांना करोनामुळे प्राणास मुकावे लागले आहे. दरम्यान, देशात ओमिक्रॉनचा धोकाही वाढत चालला असून एकूण रुग्णसंख्येने आता दीड हजारचा टप्पा ओलांडला आहे. ( ) वाचा: करोनाच्या दोन लाटा झेलल्यानंतर येईल याची शक्यता बळावत चालली आहे. वाढत्या करोना रुग्णसंख्येने सर्वांचीच झोप उडवली आहे. त्यात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने येत्या काही दिवसांत रुग्णसंख्येचा स्फोट होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच गेल्या २४ तासांतील करोना व ओमिक्रॉनची आकडेवारी केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केली असून हे आकडे चिंतेत अधिकच भर घालणारे ठरले आहेत. सध्याची स्थिती पाहता , दिल्ली, कोलकाता अशा प्रमुख महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ दिसत आहे. वाचा: देशात गेल्या २४ तासांत तब्बल २७ हजार ५५३ नवीन करोना बाधितांची नोंद झाली असून जवळपास तीन महिन्यांतील ही सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता १ लाख २२ हजार ८०१ इतकी झाली आहे. २४ तासांत आणखी २८४ रुग्ण दगावले असून मृतांचा एकूण आकडा आता ४ लाख ८१ हजार ७७० इतका झाला आहे. करोना रुग्णसंख्या वाढत असताना बाधितांचा आकडाही वाढत चालला आहे. ओमिक्रॉन बाधितांची संख्या आता दीड हजारच्या पुढे गेली आहे. वाचा: देशात ओमिक्रॉनचे आतापर्यंत १ हजार ५२५ रुग्ण आढळले आहेत. त्यातील ५६० जण उपचारांनंतर बरे झाले असून अन्य रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. ओमिक्रॉनचे सर्वाधिक ४६० रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यातील १६० रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात केली आहे. त्यानंतर दिल्लीत ३५१ ओमिक्रॉन बाधित आढळले असून त्यातील ५७ रुग्ण बरे झाले आहेत. गुजरातमध्ये १३६, तामिळनाडूत ११७ तर केरळमध्ये ओमिक्रॉनचे १०९ रुग्ण आहेत. आतापर्यंत २३ राज्यांत ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. गेल्या २४ तासांत सर्वाधिक २१ रुग्ण गुजरातमध्ये आढळले. वाचा:

मुंबई: २०२२ मध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली . करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात राहिला, तर संमेलन आयोजित करण्याच्या दृष्टीनं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक काल (शनिवारी) आणि आज (रविवारी) उदगीर इथं पार पडली. आगामी ९५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या नवीन वर्षी मार्च महिन्यात उदगीर इथं होणार आहे. अध्यक्षपदासाठी भारत सासणे यांचे नाव बरीच वर्षे चर्चेत होतं.निवडणूक प्रक्रिया असताना त्यांनी निवडणूकही लढवली होती. फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावामुळं सासणे यांचं नाव दोन वर्षे पिछाडीवर पडलं होतं. उस्मानाबाद इथं झालेल्या संमेलनात दिब्रिटो; तसेच नाशिक इथं नुकत्याच झालेल्या संमेलनात नारळीकर सक्रिय न राहिल्यानं यापुढं चालता-बोलता अध्यक्ष नेमण्याचं महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी ठणकावलं होतं. त्यानुसार सासणे यांच्या नावावर सहमती झाली.मराठवाडा साहित्य परिषद आणि उदयगिरी महाविद्यालय या संमेलनाच्या आयोजक संस्था सासणेंसाठी आग्रही होते. याशिवाय महाराष्ट्र साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ; तसंच संलग्न आणि समाविष्ट संस्थांनी सासणे यांच्या नावाला पसंती दिली आहे. लेखक भास्कर चंदनशिव, बाबा भांड, अच्युत गोडबोले आणि डॉ. रामचंद्र देखणे यांचीही नावे चर्चेत होती. दहावी आणि बारावीच्या परीक्षा; तसंच करोनाचा प्रादुर्भाव यातून मार्ग काढून मार्चपर्यंत संमेलन यशस्वी न झाल्यास ९३व्या संमेलनाप्रमाणे तेही लांबणीवर पडू शकते.

संगमेश्वर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Ratnagiri) जिल्ह्यात संगमेश्वरमधील () बावनदी पुलावर शनिवारी सकाळच्या सुमारास विचित्र घडला. तीन ट्रक आणि कार यांचा विचित्र अपघात झाला. या अपघातामुळे सुमारे पाच तास वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातातून एक ट्रकचालक बचावला. हा अपघात इतका भीषण होता की, पुलाचा कठडा तोडून ट्रकचा पुढचा भाग हवेत लोंबकळत होता. त्यात असलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. तब्बल पाच तासांनंतर दुपारी एक वाजताच्या सुमारास वाहनांचा अडथळा दूर केल्यावर मुंबई-गोवा महामार्गावरील () वाहतूक पूर्ववत झाली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसून, एक जण जखमी झाला. मारुती जानू पाटील (वय ५५, रा. पाचुंबरे, ता. शिराळा, जि. सांगली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. अमोल जगदीश केसरकर (वय ३१, रा. मोरवे खंडाळा, जि. सातारा) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार शनिवारी सकाळी ते ट्रक, आणि जनार्दन जयवंत शेळके हे दुसरा ट्रक घेऊन निवळी ते साताऱ्याकडे जात होते. त्याचवेळी मारुती पाटील हा ट्रक घेऊन मुंबईहून भरधाव वेगाने गोव्याच्या दिशेने आला. बावनदीच्या ब्रिटिशकालीन अरुंद पुलावर मध्यभागी ही वाहने आली असता, मारुती पाटील याचा ट्रकवरील ताबा सुटल्यामुळे ट्रकची धडक प्रथम जनार्दन शेळके चालवत असलेल्या ट्रकला बसली. नंतर त्या पाठोपाठ येणार्या अमोल केसरकर याच्या ट्रकलाही धडकला. त्यामुळे केसरकर यांचा ट्रक मागे जाऊन तिरका फिरला. पुलाच्या मध्यभागी येऊन पुलाचा कठडा या ट्रकने तोडला. ट्रकचा पुढील भाग हा पुलाबाहेर लोंबकळत होता. सुदैवाने यातील चालक बचावला. त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. केसरकर यांच्या ट्रकच्या मागून येणाऱ्या कारलाही या ट्रकची धडक बसून नुकसान झाले. त्यामधील प्रवासी अर्शिया सोहेल मणेर (वय २६, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) ही जखमी झाली आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात मारुती पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी आज, रविवारी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक यांच्यावर गंभीर आरोप केले. काही जुन्या प्रकरणांत पंचांवर कशा प्रकारे दबाव टाकला जातो, याबाबतच्या दोन ऑडिओ क्लिप त्यांनी ऐकवून वानखेडे आणि एनसीबीवर आरोप केले. पंचनाम्यात दुरुस्ती करण्यासाठी फोन करून दबाव टाकण्यात येत असल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळतंय. यावेळी वानखेडे यांना कार्यकाळ वाढवून देण्यात यावा यासाठी महाराष्ट्रातील भाजपच्या काही नेत्यांनी दिल्लीत प्रयत्न सुरू केल्याचा दावाही त्यांनी केला. नबाव मलिक यांनी एनसीबीचा 'फर्जिवाडा' उघड करणार असल्याचा इशारा दिला होता. नववर्षानिमित्त एनसीबीच्या बोगस कारवायांचा भंडाफोड करणार असल्याचा संकल्प त्यांनी ट्विटद्वारे केला होता. त्यानंतर नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन आणि एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले. मागील काही प्रकरणांत पंचांवर दबाव टाकून स्वाक्षऱ्या घेतल्या जात आहेत, असा आरोप करतानाच, दोन ऑडिओ क्लिप ऐकवल्या. काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये? नवाब मलिक यांनी यावेळी दोन ऑडिओ क्लिप ऐकवून एनसीबी आणि समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले. एनसीबीकडून कशा प्रकारे बोगस कारवाया केल्या जातात हे त्यांनी सांगितले. या ऑडिओ क्लिपमध्ये मॅडी नावाचा पंच आहे आणि त्याला किरण बाबू नावाच्या अधिकाऱ्याने फोन केला. एका जुन्या प्रकरणात पंचनाम्यावर सही कर आणि आमच्या समक्ष पंचनामा केला आहे, कारवाईची प्रक्रिया केली आहे, असे त्यात आहे, असे तो अधिकारी सांगत आहे. त्यावर मॅडी नावाची व्यक्ती घाबरून जाते. त्यानंतर मलिक यांनी दुसरीही ऑडिओ क्लिप ऐकवली. यानंतर त्यांनी समीर वानखेडे आणि पंचामध्ये बोलणे झाल्याचा दावा करत गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवरही आरोप मी काही प्रकरणांत दिलेल्या माहितीचं काय झालं? असा सवाल करतानाच स्थापन केलेल्या चौकशी समितीच्या अहवालाचं काय झालं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मी 'फर्जीवाडा' उघड करत आहे. मला बोलण्यापासून रोखण्याचा विविध माध्यमांतून प्रयत्न केला गेला. पण मी त्याबाबत कोर्टातच बोलणार आहे. त्याबाबत बाहेर कुठेही बोलणार नाही. पण एनसीबी आणि केंद्रीय तपास यंत्रणा काही चुकीचं करत असतील तर, मला प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आहे, असे मलिक म्हणाले. समीर वानखेडेंवर आता एनसीबी काय कारवाई करणार, असा सवालही त्यांनी केला. समीर खानचा जामीन रद्द करण्यासाठी हायकोर्टात अपील केल्याचे मला कळले आहे. या प्रकरणात इतरही आरोपी आहेत, पण फक्त समीर खानच्या जामीनाविरोधातच अपील करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. समीर वानखेडेंच्या सेवेतील मुदतवाढीसंदर्भातही मलिक यांनी भाष्य केले. वानखेडे यांना मुदतवाढ दिली जावी, यासाठी महाराष्ट्रातील काही भाजपच्या नेत्यांनी दिल्लीत लॉबिंग सुरू केली आहे, असा दावाही मलिक यांनी केला.

पुणे: पुण्यातील () धनकवडी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. इंजिनीअर मुलाने बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या जन्मदात्या आईचा खून केला. त्याने आईला औषधांचा ओव्हरडोस देऊन नंतर तिची दोरीने गळा आवळून केली. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन जीवन संपवले. धनकवडी परिसरातील इंजिनीअर असलेल्या व्यक्तीने बेरोजगारी व कर्जबाजारीपणामुळे नैराश्यातून आईची हत्या केली. तिला औषधांचा ओव्हरडोस दिला. त्यानंतर तिची दोरीने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन केली, अशी माहिती समोर आली आहे. निर्मला मनोहर फरताडे, (वय ७६) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर गणेश मनोहर फरताडे (वय ४२, रा. दोघेही धनकवडी ) याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी गणेश फडतरे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा सहकारनगर पोलिसांनी दाखल केला आहे. शनिवारी धनकवडी येथील एका सोसायटीत ही घटना घडली. याबाबत शोनीत तानाजी सावंत यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश फरताडे बेरोजगारी व कर्जबाजारीपणामुळे वैतागला होता. त्याला नैराश्य आले होते. यातूनच त्याने आई निर्मला फरताडे यांना औषधांचा ओव्हरडोस दिला. त्यानंतर दोरीने गळा आवळला. त्यामध्ये निर्मला यांचा मृत्यू झाला. यानंतर स्वतः देखील घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.

हिंगोली: हिंगोलीत एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या तरुणाचं आठ दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. संसाराची घडी बसण्याआधीच आकाशने आत्महत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Hingoli live news) हिंगोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या वंजारवाडी शिवराममधील शेतात असलेल्या आखाड्यावर एका लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन हिंगोलीच्या एका २६ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. हा तरुण हिंगोलीच्या महादेव वाडी परिसरातील रहिवासी आहे. आकाश भानुदास कुटे वय २६ असं मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी आकाशने कोणतीही सुसाइड नोट लिहिली नाही. त्यामुळे आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट आहे. वाचाः या तरुणाने उचललेल्या धक्कादायक पावलामुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. आकाशचा आठ दिवसांपूर्वी विवाह झाला होता. शहरातील महादेव वाडी येथील तरुणीशी त्याची रेशीम गाठ बांधली होती. परंतु लग्न झाल्यानंतर आठ दिवसातच त्याने हे धक्कादायक पाऊल उचलल्यामुळे त्याचा संसार अर्ध्यावरच राहिला. त्याच्या पश्चात आई, एक भाऊ, पत्नी आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. वाचाः

जम्मू: मंदिरातील चेंगराचेंगरीच्या घटनेने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात असतानाच आता वैष्णोदेवी येथून करोनाबाबत धक्कादायक बातमी हाती आली आहे. येथील विषाणूने शिरकाव केला असून १३ विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून पुढील आदेशापर्यंत विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ( ) वाचा: देशात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. त्यातच अनेक शाळा-महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांतही करोनाने शिरकाव केल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे. महाराष्ट्रातील नवी मुंबई, अहमदनगर, उत्तराखंडमधील येथील शाळांमध्ये करोनाचा स्फोट झाल्याचे पाहायला मिळाल्यानंतर आता जम्मू काश्मीरमध्ये कतरा येथील वैष्णोदेवी विद्यापीठातही करोनाने दहशत पसरवली आहे. विद्यापीठातील १३ विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली आहे. ३१ डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यात १३ विद्यार्थी बाधित आढळले असे रायसी येथील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. वाचा: एकाचवेळी १३ विद्यार्थी करोना बाधित आढळल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून पुढील आदेशापर्यंत कॅम्पस बंद ठेवण्यात यावे, असे निर्देश रायसीचे जिल्हाधिकारी चंद्रदीप सिंग यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार विद्यापीठ तातडीने बंद करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठात सोमवारपासून परीक्षा सुरू होणार होत्या. मात्र, करोनाच्या एंट्रीने परीक्षांना ब्रेक लागला आहे. परीक्षेच्या नव्या तारखा पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहेत. दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वाढत आहेत. शनिवारी राज्यात १६९ नवे बाधित आढळले आहेत तर १०७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात करोनाचे १ हजार ३९७ सक्रिय रुग्ण आहेत. वाचा:

औरंगाबादः गेल्या दोन-तीन दिवसातील राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. त्यातच आता राज्यातील अनेक जिल्ह्यात सुद्धा करोनाचे आकडे वाढतांना पाहायला मिळत आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील आकडेवारी सुद्धा अशीच काही चिंता वाढवणारी ठरत आहे. शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यात एकूण २६ नवीन रुग्णांची भर पडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. () कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यनंतर औरंगाबादची परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासूनची आकडेवारी पुन्हा एकदा वाढतांना पाहायला मिळत आहे. २८ डिसेंबरला जिल्ह्यात ०९ रुग्णांची भर पडली, २९ डिसेंबरला वाढून रूग्ण संख्या १६ झाली, ३० डिसेंबरला पुन्हा १६ रुग्ण आढळून आले. ३१ डिसेंबरला वाढून १८ रुग्ण आढळून आले. तर १ जानेवारीला हा आकडा थेट २६ वर गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. वाचाः शहरात गर्दीच-गर्दी... औरंगाबाद शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या अनेक भागात होत असलेली गर्दी वाढत्या करोनाच कारण ठरत आहे. या भागात खरेदीसाठी लोकांची रोज मोठ्याप्रमाणात गर्दी होताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे एवढ्या गर्दीत सुद्धा नागरिक मास्क वापरताना दिसत नाही. त्यामुळे ही गर्दी अशीच राहिली तर कोरोनाचा आकडा आत्तापेक्षा आणखी वाढू शकतो यात काही शंकाच नाही. वाचाः लॉकडाऊन नाही राज्यात ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली, तरी तूर्तास लॉकडाउन करण्याचा राज्य सरकारचा कोणताही निर्णय झालेला नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात जेव्हा ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासेल, त्या दिवशी लॉकडाउन लागू होईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या बैठकीत लॉकडाउनचा कोणताही विषय नव्हता, असा खुलासा केला. परंतु, मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरात निर्बंध जरूर वाढवले पाहिजेत. मात्र, ज्या वेळी ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर होईल, त्या दिवशी ऑटोमोडमध्ये लॉकडाउन होईल, अशा पद्धतीने ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आता इतक्या लवकर लॉकडाउनचा विषय नाही.', असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. वाचाः

मुंबई: नव्वदीच्या काळात सुपरहिट ठरलेली अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी ती कुटुंबियांसोबत मसूरीला गेली होती. तिथले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मसूरी व्हेकेशन संपवून तिच्या मुलांबरोबर ती नुकतीच मुंबईत परतली आहे. विमानतळावर उतरल्यावर शिल्पा तिच्या कारकडे जात होती तेव्हा एका फोटोग्राफरनं तिच्या मुलाला म्हणजे वियानला मास्क काढण्यास सांगितला होता. जेणेकरून त्याचा फोटो काढता येईल. त्यावर शिल्पानं वियान मास्क काढणार नाही असं स्पष्ट सांगितलं. ती फोटोग्राफर्सना हे सांगत असतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. कामाबद्दल सांगायचं तर शिल्पा शेट्टी लवकरच 'इंडियाज गॉट टॅलेंट' या कार्यक्रमात परीक्षक म्हणून सहभागी होणार आहे. १५ जानेवारी पासून सोनी टीव्हीवरून हा रिअॅलिटी शो प्रसारित केला जाणार आहे. या कार्यक्रमात शिल्पासोबत किरण खेर, गायक बादशाह, गीतकार मनोज मुंतशिर सहभागी होणार आहेत.

मुंबई: घोटाळ्यांचे आरोप करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणारे नेते यांनी पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकारला आव्हान दिलं आहे. घोटाळा मुक्त महाराष्ट्र सरकार, असा संकल्प सोमय्या यांनी नववर्षानिमित्त केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना, २०२२ मधील संकल्प काय असेल हे ट्विट केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. माफिया सेना मुक्त महापालिका करणार आणि घोटाळा मुक्त महाराष्ट्र सरकार करणार असल्याचा संकल्प करत त्यांनी आणि महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. ठाकरे सरकारमधील घोटाळेबाज नेते, ज्यांची चौकशी सुरू आहे, त्यांचा निकाल लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची आणि मंत्र्यांची थेट नावे घेतली. परिवहन मंत्री अनिल परब, भावना गवळी, आनंद अडसूळ, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक आणि अजित पवार यांच्यावर सोमय्या यांनी निशाणा साधला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता. करोना काळात शिवसेनेने भ्रष्टाचाराचा जागतिक रेकॉर्ड केला, असं ते म्हणाले होते. डोंबिवलीत भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले होते. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर आरोप करत, आणखी काही मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणणार आहे, असा इशारा त्यांनी दिला होता.