Type Here to Get Search Results !

पाणी पिण्याचा बहाणा देत घरात शिरले; महिलेला डांबून ठेवले अन् घडले असे काही की गाव हादरले

हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील चोरीच्या घटना या नागरिकांसाठी आता नवीन राहिल्या नाहीत. कारण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हिंगोली जिल्ह्यात जबरी चोरी होत असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या पहेनी गावामध्येही आज अशीच एक घटना घडली आहे. आज दुपारच्या सुमारास पहेणी गावापासून काही अंतरावर असलेल्या एक घरात महिला एकटीच असल्याचे पाहून चोरट्यांनी पाणी पिण्याचा बहाणा करत घरात प्रवेश करून महिलेला चाकूचा धाक दाखवला व अंगावरील जवळपास १ लाख रुपयांचे वर दागिने लंपास केले आणि महिलेला घरात डांबून चोरट्यांनी तेथून पळ काढला. सदरील घटनेची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या संख्येने धाव घेतली. परंतु तितक्यात चोरट्यांनी पोबारा केला. वाचाः गावकऱ्यांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर लगेचच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेने पहेणी गाव मात्र हादरून गेले होते. सिंधू बालाजी शेवाळे असं या महिलेच नाव आहे. सदरील महिला हि रोडच्या बाजूच्या घरा जवळच असलेल्या शेतात कांदा पिकात खुरपणीचे काम करत होती. या महिलेला एका जणाने आवाज देत, ताई आमची गाडी पंचर झाली आहे. आम्हाला थोडं पाणी प्यायला दे! असं म्हटल्यानंतर जवळच असलेल्या घरात महिलेने प्रवेश करून पाणी आणण्यासाठी गेली असता हा प्रकार घडला. सध्या या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून नरसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. वाचाः


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/lk56Bau
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

ADVERTISEMENT