Type Here to Get Search Results !

अमरावती जिल्ह्यात बालविवाहाचा विस्फोट, एकाच दिवशी गुप्तपणे होणारे ४ बालविवाह रोखले

अमरावती : कोरोना काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बालविवाहाची शृंखला सुरु झाली. ती अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये. जिल्ह्यात आज एकाच दिवशी अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरु असलेले चार थांबवत उध्वस्त होणाऱ्या आयुष्याला चाइल्ड लाईनने पुन्हा उत्कर्षाचा मार्ग दाखवला असून पालकांना निर्वाणीचा इशारा देण्यात आला. जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष बालकांच्या काळजी आणि संरक्षणाच्या संदर्भात काम पाहते. १८ वर्षांच्या आतील अल्पवयीन मुलीचं लग्न लावणे कायद्याने गुन्हा असून सुद्धा पालक आपल्या मुलींचा विवाह अल्पवयात लावत असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. अश्याच प्रकारे एकाच दिवशी चार बालविवाह थांबविण्यास बालसंरक्षण कक्षाला चाईल्ड लाईनच्या सहकार्याने यश आले. सविस्तर माहिती अशी की, अमरावती जिल्ह्यातील ग्राम उमरी ता. दर्यापूर येथील अल्पवयीन बालिका 17 वर्ष 3 महिने, बिहाली ता. चिखलदरा येथील बालिका १७ वर्षे ५ महिने, हिवरखेड ता. मोर्शी येथील बालिका १५ वर्ष, आणि घाटलाडकी ता. चांदूरबाजार येथील बालिका १५ वर्षे, या ठिकाणी बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती बाल संरक्षण कक्षाला मिळाली. प्राप्त माहिती नुसार सुनील शिंगणे, (विभागीय उपआयुक्त, महिला आणि बाल विकास विभाग, अमरावती) आणि उमेश टेकाडे (जिल्हा महिला बाल विकास अधिकारी,अमरावती) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांनी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांना सोबत घेऊन दोन पथक तयार केली. एक पथक घाटलाडकी,(चांदूरबाजार) हिवरखेड(मोर्शी) येथील अल्प वयीन मुलीचा विवाह रोखण्यात यशस्वी झाले. तर त्याचवेळी दुसऱ्या पथकाला देखील उमरी,(दर्यापुर) बिहाली(धारणी) येथील बाल विवाह रोखण्यात यश आले. सदर बाल विवाह थांबविण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले ,बालसंरक्षण अधिकारी भुषण कावरे, नम्रता कडु, विधी तथा परीविक्षा अधिकारी सिमा भाकरे, सामाजिक कार्यकर्ते किर्ती सगणे, मनिषा फुलाडी, समुपदेशक आकाश बरवट, माहिती विश्लेषक कांचन ढोके, चाईल्डलाईन समन्वयक अमित कपुर, टीम मेंबर अजय देशमुख, शंकर वाघमारे यांचे सहकार्य लाभले. महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांचा जिल्हा असलेल्या अमरावती जिल्ह्यात बालमजुरी आणि बालविवाहाच्या वाढत्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे हे बाल विवाह अत्यंत गोपनीय पद्धतीने होत असताना चाइल्ड लाईनेने पालकांना समज दिली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/uRHGpBr
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

ADVERTISEMENT