Type Here to Get Search Results !

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना; एकटे असाल तर...

नवी दिल्ली: युक्रेन-रशिया युद्ध सुरू आहे. त्यामुळं युक्रेनमध्ये हजारोंच्या संख्येनं भारतीय अडकले आहेत. भारतीयांसाठी तेथील परिस्थिती आव्हानात्मक अशीच आहे. केंद्र सरकारनं युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं 'ऑपरेशन गंगा' सुरू केलं आहे. त्यानुसार, शेकडो भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या युक्रेनमधून मायदेशात आणलं आहे. अद्याप हजारो भारतीय मायदेशात परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी युक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून तिथे अडकलेल्या भारतीयांसाठी महत्वाची मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. भारतीय दूतावासानं प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनेत अनेक महत्वाच्या बाबी नमूद केल्या आहेत. भारतीय नागरिकांना युक्रेनमधून रोमानिया आणि हंगेरीमार्गे सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात येत आहे. आजूबाजूच्या देशांच्या सीमा भारतीय नागरिकांसाठी खुल्या कराव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. तेथील संचारबंदी उठवण्यात आल्यानंतर तुमच्या आजूबाजूला वर्दळ वाढल्यास, ज्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे, तेथून बाहेर निघण्यासाठी जवळपासच्या रेल्वे स्थानकांत जावे आणि तेथून पाश्चिमात्य क्षेत्रांच्या दिशेने प्रवास करावा, असा सल्ला भारतीय नागरिकांना देण्यात येत आहे. रेल्वे सुरू आहे आणि रेल्वेने प्रवास सुरक्षित आहे, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. भारतीय दूतावासाकडून दोन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तिथे ट्रेन सुरू असतील आणि तिकीटं उपलब्ध असतील तर, ती आरक्षित करू शकता, असा सल्ला त्यातून देण्यात आला आहे. याशिवाय, युक्रेन रेल्वेकडून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी स्पेशल ट्रेन चालवण्यात येत आहेत. त्यासाठी तिकीटं आरक्षित करण्याची आवश्यकता नाही. रेल्वेचे वेळापत्रक www.uz.gov.ua/ या संकेतस्थळावर पाहू शकता. तसेच रेल्वे स्थानकांवरील डिजिटल बोर्ड पाहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/dc7HTXh
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

ADVERTISEMENT