Type Here to Get Search Results !

मुंबई: चारकोप तलावात दोघे बुडाले; एकाला वाचविण्यात यश, दुसऱ्याचा शोध सुरूच

मुंबई: कांदिवली पश्चिमेला असलेल्या चारकोप येथील एका तलावात दोन तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. या दोघांपैकी एकाला वाचविण्यात यश आले आहे. तर, दुसऱ्या तरुणाचा शोध घेतला जात आहे. (two young men drowned in a lake in charkop one has been rescued) हे दोन तरुण तलावात बुडत असल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिस आणि अग्निशमनदलाला माहिती दिली. अग्निशमनदलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जवांनाना एका तरुणाला वाचविण्यात यश मिळाले असून दुसरा तरुण मात्र सापडलेला नाही. हे दोघे तरूण कसे बुडाले याबाबत मात्र अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. दुसऱ्या तरुणाचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. पोलिसही या कामात अग्निशमनदलाला सहकार्य करत आहेत. क्लिक करा आणि वाचा- या दुर्घटनेमुळे चारकोप परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/bsPALp9
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

ADVERTISEMENT