
नवी दिल्ली : सध्याच्या घडीला क्रिकेट एवढं वेगवान झालं आहे की, एकाच दिवशी भारताचे दोन क्रिकेट संघ मैदानात उतरणार आहेत. पण एकाच वेळी हे दोन्ही सामने सुरु असताना त्यांचे प्रतिस्पर्धी मात्र वेगळेच असणार आहेत. नेमकं घडणार तरी काय, पाहा...भारताचे दोन संघ १२ मार्चला मैदानात उतरणार आहे. १२ मार्चला भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना बंगळुरु येथे होणार असून सकाळी ९.३० मिनिटांनी हा सामना सुरु होणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने दणदणीत विजय साकारला होता. त्यामुळे आता या सामन्यात भारताच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. या दिवशीच म्हणजे १२ मार्चला भारताचा दुसरा सामना हा वेस्ट इंडिजबरोबर होणार आहे. सध्या न्यूझीलंडमध्ये महिला विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. या विश्वचषकात भारताचा महिला संघ हा १२ मार्चला वेस्ट इंडिजच्या संघाबरोबर दोन हात करण्यासाठी उतरणार आहे. हा सामना हॅमिल्टन येथे भारतीय वेळेनुसार पहाटे ६.३० मिनिटांनी सुरु होणार आहे. महिला विश्वचचषकात भारतीय संघाने आतापर्यंत एक विजय मिळवला आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर दमदार विजय मिळवला होता. पण त्यानंतर भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आता भारताचा तिसरा सामना हा वेस्ट इंडिजबरोबर होणार आहे. विराट कोहलीवर असणार सर्वांचं लक्ष... दुसऱ्या कसोटी सामन्यात सर्वांचं लक्ष हे भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीवर असणार आहे. विराट गेल्या दोन वर्षांपासून चांगल्या फॉर्मात दिसत नाही. विराटने २०१९ साली कोलकाताच्या इडन गार्डन्समध्ये झालेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात आपले अखरचे शतक झळकावले होते. त्यानंतर जवळपास ८०० दिवसांमध्ये कोहलीला एकही शतक झळकावता आले नव्हते. कोहलीकडे भारताचे नेतृत्व होते, त्यामुळे त्याच्या फलंदाजीच्या कामगिरीबाबत जास्त कोणी बोलत नव्हते. पण आता कोहलीकडे भारताचे एकही कर्णधारपद राहीलेले नाही. दक्षिण आफ्रिकेतील पराभवानंतर कोहलीने कसोटी क्रिकेटचे कर्णधारपदही सोडण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर रोहित शर्माकडे भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/l0mw1Ei
via IFTTT