मुंबई :बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. चार वर्षांनंतर शाहरुख मोठ्या पडद्यावर परतणार असल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळतेय. या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख एका खास व्हिडीओद्वारे जाहीर करण्यात आली असून त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. या पार्श्वभूमीवर सिनेमाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद म्हणतात, ‘प्रेक्षकांना एखाद्या हिंदी सिनेमाकडून जराही अपेक्षा नसेल अशी भव्य आणि धमाकेदार अॅक्शन दाखवण्याच्या हेतूनं 'पठाण'ची रचना करण्यात आली आहे. चाहत्यांसाठी आम्ही पठाणशी संबंधित काही महत्त्वाच्या क्षणांवर आधारित कॅम्पेनची काळजीपूर्वक आणि पूर्णपणे विचार करून आखणी करत आहोत. त्यामुळे प्रदर्शनाची तारीख जाहीर करणारा हा व्हिडीओ प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरतोय. तसंच शाहरुखबरोबर काम करणं हा आमच्यासाठी मोठा सन्मान आणि जबाबदारी आहे.' पठाण हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/rQHsGA3
via IFTTT
