Type Here to Get Search Results !

आयपीएल बीसीसीआयसाठी ठरतेय सोन्याची खाण, यंदाची कमाई ऐकाल तर हैराणच व्हाल....

: मुंबई : येत्या २६ मार्चपासून इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा (IPL) थरार रंगणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ () आगामी आयपीएल हंगामातून बक्कळ कमाई करणार आहे. यंदाच्या हंगामातून बीसीसीआय ८०० कोटी रुपये कमावणार आहे. आयपीएलच्या टायटल स्पॉन्सर आणि इतर प्रायोजकांकडून हे उत्पन्न बोर्डाला मिळणार आहे. २००८ मधील स्पर्धेच्या पहिल्या हंगामानंतर बोर्डाची एका हंगामात ही सर्वाधिक कमाई असेल. काही दिवसांपूर्वीच आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरमध्ये बदल झाला आणि विवोऐवजी टाटाला टायटल स्पॉन्सरचे अधिकार मिळाले. आयपीएल २०२२ साठी दोन नवीन सहयोगी प्रायोजकांसह एकूण नऊ मोठे ब्रँड प्रायोजक बनले आहेत. हे देखील लक्षात घेतले पाहिजे की, बीसीसीआयने स्विगी (Swiggy), इंस्टामार्ट आणि रुपे (Rupay) यांच्यासोबत केंद्रीय प्रायोजकत्वावर स्वाक्षरी केली आहे. अहवालानुसार, स्विगी सोबत ४२ कोटी रुपयांचा आणि रुपे सोबत ४४ कोटी रुपयांचा प्रायोजकत्व करार करण्यात आला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी प्रायोजकांद्वारे येणाऱ्या रकमेबद्दल आनंद व्यक्त केला होता, पण एकूण रक्कम उघड केली नाही. टाटा समूह मुख्य शीर्षक प्रायोजक म्हणून मंडळाला वार्षिक ३३५ कोटी रुपये देणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लीगमधील सामन्यांची संख्या वाढल्यानंतर बोर्डाच्या कमाईत बदल करण्यात आला आहे. आणि यांच्यात पहिली लढत आयपीएल २०२२ चा पहिला सामना २६ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात होणार आहे. गेल्या हंगामाचा अंतिम सामना या दोन संघांमध्ये झाला होता, ज्यामध्ये चेन्नईने बाजी मारली होती. आयपीएल २०२२ चे संपूर्ण ग्रुप स्टेज सामने महाराष्ट्रात खेळवले जाणार आहेत. ७० पैकी ५५ सामने मुंबईतील तीन मैदानांवर, तर इतर १५ सामने पुण्याच्या मैदानावर खेळवले जातील. पण त्यानंतरचे महत्वाचे सामने मात्र महाराष्ट्रात होणार नाहीत, असे आता दिसत आहे. आयपीएलचे अखेरचे सामना कदाचित अहमदाबादमध्ये खेळवले जाऊ शकतात, असे आता म्हटले जात आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/p84OePF
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

ADVERTISEMENT