Type Here to Get Search Results !

हार्दिक पंड्याच्या वहिनीचा व्हिडीओ झाला व्हायरल, लाडक्या भाऊजीसाठी लिहिला खास संदेश

:नवी दिल्ली : आयपीएलमध्ये आता मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार नाही, तर तो आता गुजरातच्या संघाचे नेतृत्न भूषवताना पाहायला मिळेल. त्यामुळे आता हार्दिक आणि कृणाल हे दोन्ही पंड्या बंधू एकत्र दिसणार नाही. पण सध्याच्या घडीलाच्या हार्दिकच्या वहिनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. या यादीत संघाचा दीर्घकाळ भाग असलेले पंड्या ब्रदर्स हार्दिक आणि कृणाल यांना देखील त्यांच्या जुन्या फ्रँचायझीपासून वेगळे व्हावे लागले आहे. या हंगामात ते दोघेही वेगवेगळ्या संघांसाठी खेळताना दिसणार आहेत. पंड्या ब्रदर्स विभक्त झाल्यामुळे कृणाल पंड्याची पत्नी खूपच भावूक झाली आहे. तिने इंस्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पंड्या बंधूंचे अनेक फोटो आणि नाचतानाची दृश्ये पाहायला मिळत आहेत. दोन्ही भावंडांमध्ये असणारे प्रेम आणि भावनिक नाते तिच्या या व्हिडिओतून दिसून येते. पोस्ट शेअर करताना पंखुडीने लाडक्या भाऊजींसाठीही एक खास संदेश लिहिला आहे. पोस्ट शेअर करताना तिने लिहिले आहे की, “माझ्या सर्वोत्कृष्ट मुलांसाठी!! गेली ६ वर्षे मी तुम्हा दोघांना एकाच स्टँडवरून चिअर केले आहे, पण यावेळी ते वेगळे असणार आहे. तुम्हा दोघांना एकमेकांविरुद्ध खेळताना पाहून थोडासा त्रास होईल, पण तुम्हा दोघांना तुमच्या स्वतःच्या मार्ग आणि अटींवर विकसित होताना पाहून थोडासा उत्साहदेखील आहे. हार्दिक दुसऱ्या बाजूने मी तुला साथ देत राहीन. आताही आणि कायमही." (IPL 2022) च्या आगामी हंगामाची सुरुवात २६ मार्चपासून चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. फेब्रुवारीमध्ये झालेल्या आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात अनेक खेळाडूंना त्यांची जुनी फ्रँचायझी सोडून नवीन फ्रँचायझीमध्ये सामील व्हावे लागले आहे. अनेक खेळाडूंनी त्यांची जुनी फ्रँचायझी गमावली आहे, कारण ते बऱ्याच वर्षांपासून एकाच संघाशी संबंधित होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Y8jv6OT
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

ADVERTISEMENT