Type Here to Get Search Results !

अजब! रिक्षा चालकाने हेल्मेट न घातल्याने आकारला दंड

कल्याण: वाहतूक पोलिसांची ऑनलाइन दंड आकारणी प्रणाली अनेकदा काहींना डोकेदुखी ठरत असते. त्याचे ताजे उदाहरण कल्याण शहरात पाहायला मिळाले आहे. कल्याण शहरात राहणारे गुरुनाथ चिकणकर या रिक्षा चालकाला चक्क परिधान न केल्याने वाहतूक पोलिसांनी ५०० रुपयांचा दंड आकाराला आहे. (in kalyan a driver was fined for not wearing a ) मुंबईच्या कांदिवली भागात ०३ डिसेंबर २०२१ रोजी एक दुचाकी चालक विना हेल्मेट प्रवास करत होता. त्याचा फोटो वाहतूक पोलिसांनी काढला. त्याचे हे चलान असल्याचे समोर आले आहे. मात्र, आता या दुचाकी चालकाचा दंड ऑनलाइन प्रणालीच्या ई-चलानद्वारे गुरुनाथ यांना आकारण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा- सुरुवातीला मोबाईलवर या दंडासंबंधी माहिती आल्यानंतर रिक्षा चालक गुरुनाथला धक्काच बसला, त्यांनी या प्रकरणी कल्याण वाहतूक पोलिसांना विचारणा केली असता त्यांना ठाण्याला जाण्यासाठी सांगण्यात आले. मात्र माझी चूक नसताना मी ठाणे येथे का जावे, वाहतूक पोलिसांनी केलेली चूक त्यांनी सुधारून द्यावी, अशी मागणी गुरुनाथ यांनी केली आहे. क्लिक करा आणि वाचा- या सगळया प्रकरणामुळे गुरुनाथला मानसिक त्रास झाला आहे. आता या प्रकरणात लवकरात लवकर आपल्याला आलेला दंड आणि नोटीस रद्द करण्याची मागणी रिक्षा चालकाने केली आहे. तर वाहतूक पोलिसांनी आपल्या ई-चलान पध्दतीत काम करताना निदान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यालाच दंड आकारला जातो आहे का? याची माहिती नीट तपासून संबंधिताच्या मोबाईल फोनवर दंड पाठवावा, अन्यथा अनेकांना या ई-चलान प्रणालीचा नाहक त्रास होणार असल्याचे प्रतिक्रिया रिक्षा चालकाचे नातेवाईक मदन चिकणकर यांनी दिली आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/jg8eAyN
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

ADVERTISEMENT