Type Here to Get Search Results !

मराठी भाषेसाठी मनसे पुन्हा आक्रमक; 'या' मॉलमध्ये धडक देत दिला इशारा

डोंबिवली: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी भाषेचा मुद्दा हाती घेत डोंबिवलीतील एक्सपिरिया मॉलला जाब विचारला. सिनेमागृहात तिकीट आरक्षित करण्यासाठी पीव्हीआर या सिनेमा कंपनीच्या आयव्हीआर (कॉलसेंटर) मध्ये उपलब्ध नाही हे लक्षात आल्यानंतर या कंपनीमध्ये अन्य सर्व भाषा समाविष्ट असताना मराठी भाषा का उपलब्ध नाही?, असा प्रश्न मनसेने आज विचारला आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी डोंबिवली जवळील एक्सपिरिया मॉलमध्ये प्रवेश करत संबंधित यंत्रणेला जाब विचारला आहे. मराठी भाषा लवकरात लवकर समाविष्ट न झाल्यास याचे परिणाम वाईट होतील असा इशाराच मनसेचे पीव्हीआर दिला आहे. ( warned xperia mall in dombivali for ) मराठी भाषा गौरव दिन हा नुकताच राज्यात साजरा करण्यात आला. मात्र महाराष्ट्रात मराठी भाषा किती कंपन्या जतन करत आहेत, हे पाहणे शासनाचे देखील काम आहे. मात्र असे असताना संपूर्ण देशभरात पीव्हीआर ही कंपनी सिनेमासाठी तिकीट आरक्षित करून प्रेक्षकांना देत असते. मात्र या कंपनीच्या आयव्हीआर (कॉलसेंटर) मध्ये मराठी भाषा उपलब्ध नसल्याचे एका व्यक्तीने उघड केले. क्लिक करा आणि वाचा- फक्त मराठी वगळता इतर भाषा त्यात दिसत होत्या. दरम्यान त्या व्यक्तीने यासंदर्भात मराठी भाषा उपलब्ध का नाही? असा जाब देखील विचारला. मात्र कंपनीच्या प्रशासनाने यावर उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्या व्यक्तीने मनसेच्या कार्यकर्त्यांना याबाबत तक्रार केली आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी लगेच एक्सपीरिया मॉल गाठले आणि पीव्हीआर कंपनीच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. क्लिक करा आणि वाचा- तसेच संबंधित आयव्हीआरमधून कॉल मराठी भाषेनेच सुरू झाला पाहिजे, असे मनसेचे ठणकावून सांगितले. यावेळी मनसेचे डोंबिवली शहर संघटक योगेश पाटील, डोंबिवली शहर सचिव अरुण जांभळे, विभाग अध्यक्ष रक्षित रायकर यांसह अन्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. दरम्यान, येत्या काही दिवसात हा बदल दिसून आला नाही तर पुढील आंदोलनाला पीव्हीआर सिनेमाच जबाबदार असेल असा सज्जड दमच मनसेचे या कंपनीला दिला आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/FXZ63xA
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

ADVERTISEMENT