Type Here to Get Search Results !

इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून अचानक गेला तोल; २५ वर्षीय तरुणीने गमावला जीव!

: इमारतीचे काम सुरू असताना सहाव्या मजल्यावर पाणी मारताना तोल जाऊन खाली कोसळल्याने २५ वर्षीय तरुणीने जीव गमावला आहे. रुक्मिणी पिराजी बोळे असं मृत तरुणीचं नाव आहे. रुक्मिणी बोळे ही ध्रुवनगरमधील एका इमारतीमध्ये काम करत होती. अचानक तोल गेल्याने तिच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी ठेकेदारासह इतर संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. () गंगापूर शिवारातील ध्रुवनगरमध्ये राजेंद्र पंडित सोनजे यांच्या इमारतीचे काम सुरू आहे. तिथे कार्यरत कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचं घडलेल्या घटनेवरून स्पष्ट झालं आहे. मंगळवारी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर पाणी मारण्याचे काम सुरू होते. त्यावेळी कामगार रुक्मिणी पाणी मारत असताना तिचा तोल गेला. रुक्मिणी सहाव्या मजल्यावरून खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाली. तिला सुपरवायझर जितेंद्र रामकृष्ण माने यांनी त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र जिल्हा रुग्णालयातील डॉ. शिंदे यांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, याप्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. सोनजे आणि माने यांसह इतर संबंधितांबाबत चौकशी सुरू आहे. हलगर्जीपणामुळे कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी बुधवारी जबाब नोंदणी सुरू राहिली. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ZeXjolP
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

ADVERTISEMENT