
अहमदनगर : आईसह तीन लेकरांचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा येथे शुक्रवारी दुपारी घडली. यामध्ये आई स्वाती बाळासाहेब ढोकरे (वय २८), तिची मुलगी भाग्यश्री बाळासाहेब ढोकरे (५ वर्ष), माधुरी बाळासाहेब ढोकरे (वय ३ वर्ष) आणि मुलगा शिवम बाळासाहेब ढोकरे (वय ४ महिने) या चौघांचा मृत्यू झाला आहे. खांडगेदरा शिवारात ही घटना घडली आहे. () याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खांडगेदरा येथील शेतकरी बाळासाहेब गणपत ढोकरे हे आपल्या पत्नी आणि तीन मुलांसह राहात होते. मात्र शुक्रवारी दुपारी घराशेजारीच असलेल्या विहिरीत त्यांच्या पत्नी स्वाती ढोकरे तीन मुलांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर चारीही मृतदेह विहिरीतून वर काढण्यात आले. तोपर्यंत घटनेची माहिती घारगाव पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस नाईक राजेंद्र लांघे यांनी घटनास्थळी धाव घेतली. खासगी रूग्णवाहिकेतून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेरच्या कुटीर रुग्णालयात हलवले. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनीही घटनास्थळी जात पाहणी केली. या प्रकरणी मच्छिन्द्र एकनाथ खांडगे यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील करत आहे. या धक्कादायक घटनेने खांडगेदरा व कोठे खुर्द गावावर शोककळा पसरली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/lYa2y0g
via IFTTT