Type Here to Get Search Results !

मुरबाडचा शुभम युक्रेनमध्ये अडकला; जेवण दूरच, बर्फ वितळवून पाणी पिण्याची आली वेळ

मुरबाड: मुरबाडचा हा विद्यार्थी युक्रेनच्या सुमी शहरात अडकून पडलाय. गेल्या काही दिवसांपासून शुभमचे प्रचंड हाल होत असून अक्षरशः खायला अन्न आणि प्यायला पाणी देखील नाहीये. त्यामुळं इथून लवकरात लवकर बाहेर काढण्याची शेवटची विनंती आणि त्याच्यासह अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी केली आहे. ( from is stranded in sumi of and facing many serious problems) युक्रेनच्या सुमी शहरात तब्बल ९०० भारतीय विद्यार्थी अडकून पडलेत. या शहरात दर तासाला रशियाकडून बॉम्बहल्ले होत असल्यानं विद्यार्थी धास्तावलेत. या विद्यार्थ्यांना अन्न तर सोडाच, पण साधं प्यायला पाणीही नसल्यानं रस्त्यावर पडलेला बर्फ वितळवून पाणी पिण्याची वेळ त्यांच्यावर आलीये. याच विद्यार्थ्यांमध्ये मुरबाडच्या शुभम म्हाडसे या एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचाही समावेश आहे. सुमी शहरात सध्या दर तासाला बॉम्ब हल्ले होत असून त्यामुळं विद्यार्थी राहत असलेल्या हॉस्टेलमध्ये वीज, अन्न, पाणी याचा पुरवठा बंद झालाय. त्यामुळं आम्हाला इथून वाचवा, अशी शेवटची विनवणी शुभम आणि त्याच्यासह अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी भारत सरकारला केली आहे. क्लिक करा आणि वाचा- या सगळ्या परिस्थितीत शुभमच्या कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागलाय. त्याच्या आईला तर अश्रू अनावर झाले आहेत. शुभमसोबत बोलणं होत असून तिथली परिस्थिती कळतेय, त्याची खुशाली कळतेय. पण आमच्या मुलांना अक्षरशः खायला प्यायलाही मिळत नसून त्यांना लवकरात लवकर बाहेर काढा, आणि भारतात परत आणा अशी विनवणी शुभमच्या आईने केली आहे. क्लिक करा आणि वाचा- युक्रेनमधील सुमी शहरापासून रशियाची सीमा ही अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर आहे. तर, सध्या जिथून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे त्या हंगेरी, रोमानिया, पोलंड या सर्व सीमा मात्र शेकडो किलोमीटर दूर आहेत. त्यामुळं या विद्यार्थ्यांना रशियाच्या दिशेनं तरी बाहेर काढावं, अशी विनंती शुभमच्या कुटुंबीयांनी भारत सरकारला केली आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Gq7OJnt
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

ADVERTISEMENT