Type Here to Get Search Results !

लाचखोर पोलीस अधिकारी अटकेत; बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी मागितली लाच

म. टा. खास प्रतिनिधी, : बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी सात लाख रुपयांची घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने बेड्या ठोकल्या. सोमवारी या केली. भरत मुंढे असे या लाचखोर उपनिरीक्षकाचे नाव असून, तो सध्या ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. लोअर परळ येथील ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात एका तरुणाच्या नातेवाईकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक भरत मुंढे याने या तरुणाकडे ३७ लाख रुपयांची मागणी केली. यातील पाच लाख स्वतःसाठी, दोन लाख वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसाठी आणि ३० लाख तक्रारदार तरुणीला देण्यात येतील, असे मुंढे याने या तरुणाला सांगितले. इतकी मोठी रक्कम आणणार कुठून? असा प्रश्न पडल्याने या तरुणाने मुंढे याला होकार देतानाच त्यांच्या विरोधात एसीबीच्या वरळी येथील कार्यालयात लेखी तक्रार केली. एसीबीच्या पथकाने या तरुणाने दिलेल्या तक्रारीची शहानिशा केली आणि त्यानुसार सोमवारी सापळा रचला. या तरुणाकडून सात लाख रुपये घेताना भरत मुंढे याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पकडले. मुंढे याच्याविरोधात एसीबीने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणात अधिक चौकशी सुरू असल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/cudYEiA
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

ADVERTISEMENT