Type Here to Get Search Results !

कचऱ्यात आढळली स्त्री जातीची ५ मृत अर्भके, नागपुरात खळबळ, पोलिसही हादरले

नागपूर : शहरातील लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका कचऱ्याच्या ढिगात स्त्री जातीची पाच मृत अर्भके सापडली आहेत. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी दुपारी ४च्या सुमारास टेलिफोन एक्स्चेंज चौक ते अनील हॉटेलकडे जाणाऱ्या मार्गावर उघडकीस आली. या परिसरातील केटी वाईन शॉपसमोर असलेल्या कचऱ्याच्या ढिगात पाच मृत अर्भके आढळून आली. यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. ही माहिती तातडीने लकडगंज पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनीही घटनास्थळ गाठले. एकदम चार अर्भक आढळून आल्याने एखाद्या रुग्णालयातूनच ते फेकण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. जानेवारी महिन्यात वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील कदम रुग्णालयाच्या परिसरातही मृत अर्भक आढळून आले होते. पोलिस चौकशी दरम्यान या परिसरात एकूण १२ मानवी कवट्या आणि ५४ हाडे आढळून आली होती. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. त्यानंतर आता विदर्भात परत अशी घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/MEvcpPf
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

ADVERTISEMENT