Type Here to Get Search Results !

बाबा, जीवन फार क्रूर आहे, पण... शेन वॉर्नसाठी त्याच्या लाडक्या लेकीने लिहिला अखेरचा मेसेज

नवी दिल्ली : शेन वॉर्नच्या अचानक निधनाने सर्वांनाच जोरदार धक्का बसला. दुसरीकडे वॉर्नची लाडकी लेक ब्रुक ही त्याच्या निधनाची बातमी ऐकल्यावर कोलमडली होती. आपल्या लाडक्या बाबासाठी आता ब्रुकने अखेरचा मेसेज लिहिला आहे. ब्रुकची ही सोशल मीडियातील पोस्ट जगभरात व्हायरल झाली आहे. ब्रुकने वॉर्नसाठी इन्स्टाग्रामवर एक खास मेसेज लिहिला आहे. यामध्ये ब्रुकने म्हटले आहे की, " बाबा, तुमच्या जाण्याने मला मोठा धक्का बसला आहे. मला अजूनही तुम्ही आमच्यामध्ये आता नाही, हे खरं वाटत नाही. आमच्याबरोबर अजूनही तुम्ही आहात, असंच मला वाटत आहे. तुम्ही फार लवकर आम्हाला सोडून गेलात, ही गोष्ट चांगली झाली नाही. जीवन हे भरपूर क्रूर आहे, पण आयुष्यभर तुमच्या आठवणींच्या संचितावर मी जगत राहीन. तुमच्या आठवणी कायम माझ्या ह्रदयात राहतील. आपण बऱ्याचदा भरपूर धमाल करायचो, हसायचो, मजा-मस्करी करायचो, या सर्व गोष्टी मी विसरूच शकत नाही. आपण दोघे बऱ्याच अंशी एकसारखेच होतो. आपला स्वभावही सारखाच होता. मी तुम्हाला नेहमीच गमतीने सांगायची की, तुमचेच गुण माझ्यामध्ये उतरलेले आहेत. तुम्ही असताना हे बोलताना मला गर्व वाटायचा, पण आता असं होणार नाही. पण ही हे नेहमीच बोलत राहीन, कारण माझ्यासाठी ते फारच विशेष आहे. मी त्यासाठी स्वत:ला नशिबवान समजते. मला नेहमीच या गोष्टीचा गर्व वाटेल की, मी तुमची मुलगी होती. मी नेहमीच तुमच्यावर प्रेम करत राहीन आणि तुमची आठवण येणार नाही, असा एकही दिवस असणार नाही. तुमची आठवण नेहमीच मला येत राहील." ब्रुक ही वॉर्नची सर्वात मोठी मुलगी आहे. वॉर्न आणि ब्रुक यांचा स्वभाव जवळपास सारखाच होता. हे दोघे जेव्हा एकत्र यायचे, तेव्हा त्यांची भन्नाट धमाल-मस्ती चालायची. पण आता हे सर्व ब्रुकला करता येणार नाही. ब्रुकने जी सोशल मीडियावर पोस्ट लिहीली आहे, ती चांगलीच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/k2RrTH1
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

ADVERTISEMENT