Type Here to Get Search Results !

युक्रेनच्या राजदुतांनी रशियाच्या हल्ल्याची तुलना केली मुघलांशी, म्हणाले... , KD News

नवी दिल्ली : रशियाचा युक्रेनवरील हल्ला तीव्र ( ) होत असून आज हे युद्ध भारतासाठीही वाईट बातमी घेऊन आले आहे. युक्रेनमधील खारकीव्ह येथे रशियाच्या बॉम्ब हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. भारताने या घटनेचा निषेध केला असून रशियासह युक्रेनच्या राजदूतानाही बोलावले होते. युक्रेनचे भारतातील राजदूत डॉ. इगोर पोलिखा यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. रशियाचा हल्ला हा नरसंहार आहे आणि मुघलांनी राजपूतांसोबत जे केले होते तसेच हे आहे, पोलिखा म्हणाले. रशियाचा युक्रेनवरचा हल्ला म्हणजे भारताच्या इतिहासात मुघलांनी राजपूतांच्या केलेल्या नरसंहारासारखे आहे. पुतीनना युक्रेनवर हल्ला करण्यापासून रोखण्यासाठी सर्व संसाधनांचा वापर करा, असे पंतप्रधान मोदींसह जगातील सर्व प्रभावशाली नेत्यांना आमचे आवाहन आहे, असे पोलिखा म्हणाले. खारकीव्ह येथील हल्ल्यात ठार झालेल्या नवीन या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने संपूर्ण देशात शोक आहे. नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना पोलिखा यांनी नवीनचा उल्लेख केला. त्यांनी नवीनच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केवा. नवीनच्या निधनाबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो. पूर्वी लष्करी ठिकाणांवर हल्ले केले जात होते. पण आता हे हल्ले नागरी भागातही केले जात आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी रशियावर केला. या हल्ल्यात ठार झालेल्या युक्रेनच्या नागरिकांबद्दल सहानुभूती व्यक्त करताना अनेक देश रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याला विरोध करत आहेत. दिल्लीतील युक्रेनच्या दूतावासाबाहेर नागरिकांनी मेणबत्त्या पेटवून रशिया-युक्रेन युद्धात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. युक्रेनचे भारतातील राजदूतही यावेळी उपस्थित होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/lbN2LUA
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

ADVERTISEMENT