Type Here to Get Search Results !

फडणवीसांनी पुन्हा येण्याची तारीख सांगितली, म्हणजेच...., जयंत पाटलांची भाजपला बोचणारी तुफान टोलेबाजी , KD News

मुंबई : 'मी पुन्हा येईन' म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी कधी येणार, याचा सस्पेन्स अखेर आज संपवला. नागपुरात बोलताना २०२४ साली भाजपचं पुन्हा बहुमताने सरकार येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हाच धागा पकडत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री यांनी फडणवीसांना पर्यायाने भाजपला बोचणारी टोलेबाजी केली. फडणवीसांनी पुन्हा येण्याची तारीख सांगितली म्हणजेच २०२४ सालापर्यंत महाविकास आघाडीचं सरकार यशस्वीपणे काम करेल, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांना टोला लगावला. जयंत पाटलांची टोलेबाजी "भाजप वारंवार सरकार पडण्याचे दावे करत आहे. पण आज फडणवीसांनी पहिल्यांदा मान्य केलं की सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. मी महाविकास आघाडीच्या वतीने विरोधी पक्षनेते यांचं आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो", असं म्हणत असताना जयंत पाटील यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. एकंदरित त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने त्यांनी फडणवीसांना चिमटे काढले. नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाबाबत मुंबईत राष्ट्रवादीची बैठक पार पडली. बैठकीनंतर सगळ्याच मंत्र्यांचा जरा गंभीर सूर होता. पण मलिकांबाबत झालेले निर्णय सांगताना आणि पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना जयंत पाटलांनी गंभीर स्वर बाजूला सारत नेहमीच्या स्टाईलने फटकेबाजी करत भाजपला टोले लगावले. फडणवीस काय म्हणाले होते? येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आणणार तसंच राज्यात २०२४ साली भाजपचंच पूर्ण बहुमताचं सरकार मी आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये बोलताना म्हटलं. ज्या क्षणी महाराष्ट्रात निवडणुका होतील तेव्हा भाजप नंबर १ राहील आणि भाजपा आपल्या भरवशावर सरकार आणणार म्हणजे आणणारच.... नागपूर असो किंवा मुंबई पालिका निवडणूक असो आम्ही नेहमीच तयार आहे. महाराष्ट्रात आमची शक्ती वाढलीच आहे. आगामी सर्व निवडणुकीत ती ताकद पाहायला मिळेल,' असंही फडणवीस म्हणाले होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Ty3nRY9
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

ADVERTISEMENT