Type Here to Get Search Results !

पालकमंत्री गुलाबराव पाटील हफ्ते..., नव्हे भत्ते घेतात; भाजप खासदाराचा टोला

जळगाव: सध्या जिल्ह्यात एकीकडे राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे (), तर दुसरीकडे भाजपचे नेते गिरीश महाजन () यांच्या आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच शिवसेनेचे नेते आणि जळगावचे पालकमंत्री (Gulabrao Patil) व भाजपचे खासदार (Unmesh Patil) यांच्यातील शाब्दिक संघर्ष चांगलाच पेटला आहे. त्यामुळे जिल्हयातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. माझ्यामुळे उन्मेश पाटील हे खासदार झाले, या पालकमंत्री पाटील यांच्या वक्तव्यावर उन्मेश पाटील यांनी जोरदार उत्तर दिले आहे. पालकमंत्री हप्ते घेतात, असेही म्हणायला खासदार यावेळी विसरले नाही. नंतर लक्षात आल्यानंतर खासदार उन्मेश पाटील यांनी आपल्याला भत्ते असे म्हणायचे असल्याचेही न सांगताच स्पष्टीकरणही पत्रकारांना दिले. (bjp mp criticizes guardian minister of jalgaon ) जळगावातील जीएम फाउंडेशनमध्ये भाजपतर्फे सोमवारी पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी २२ एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यातील विविध महामार्गांच्या कामांच्या उद्घाटनासाठी, तसेच भूमीपूजनासाठी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी खासदार उन्मेश पाटील यांच्यासोबत आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांचीही उपस्थिती होती. पत्रकार परिषदेनंतर खासदार उन्मेश पाटील पत्रकारांशी बोलत होते. क्लिक करा आणि वाचा- 'मंत्री पाटील माझ्यावर बोलून तोंडसुख घेताहेत' खासदार उन्मेश पाटील पुढे बोलतांना म्हणाले की, माझे अस्तित्व पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच तळागाळातील जनता ठरवेल. मात्र आता ही वेळ नाही, जनता अंधारात आहे, तो प्रश्न आधी महत्वाचा आहे. विजेवर बोला, असे सांगतानाच कॅबिनेटच्या बैठकीत पालकमंत्री झोपा काढतात, असा पुनरुच्चारही यावेळी खासदार पाटील यांनी केला. कॅबिनेटला नियोजन करायचे नाही, मग काय हप्ते घ्यायला, म्हणजेच भत्ते घ्यायला मंत्री कॅबिनेटमध्ये जातात का?, असे म्हणत हा माझा नाही तर जनतेच्या मनातील प्रश्न असल्याचे खासदार पाटील यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- जे शेतकऱ्यांसाठी शिंगाडा हातात घेवून आंदोलन करत होते, ते पालकमंत्री गुलाबराव पाटील कुठे गेले हे जनतेच्या मनातले मी त्यांच्या लक्षात आणून देत असल्याचेही खासदार पाटील म्हणाले. प्रश्न शेतकऱ्यांचा आहे, प्रश्न विजेचा आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष करत माझ्यावर बोलून तोंडसुख घ्यायचे काम पालकमंत्री करत असून, यातून त्यांना काय मिळते, हे देव जाणे, असाही टोला यावेळी खासदार उन्मेश पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना लगावला. क्लिक करा आणि वाचा- 'नुसतेच मंत्री झालात, जरा लक्ष घाला साहेब' खासदार उन्मेश पाटील यांनी कोळसा आणला असता, तर त्यांचा जाहीर सत्कार केला असता, असे वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते. यावर खासदार पाटील यांना विचारले असता, सत्ता तुम्ही भोगायची, नियोजन तुम्ही करायचे नाही, आणि उन्मेश पाटील यांनी कोळसा आणला नाही, अशी टीका करायची, याला काही अर्थ नाही. त्यामुळे मंत्री पाटील यांनी कॅबिनेटमध्ये लक्ष घातले, तर त्यांना सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, असेही जोरदार प्रत्युत्तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना खासदार उन्मेश पाटील यांनी दिले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/HBhyZsd
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

ADVERTISEMENT