Type Here to Get Search Results !

मुंबई लोकलमधील धक्कादायक प्रकार; मोबाइल चोराचा प्रतिकार करत असतानाच ती...

मुंबई: लोकलमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोबाइल चोराचा प्रतिकार करत असताना एक महिला प्रवासी धावत्या लोकलमधून खाली पडली असून यात सदर महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. सायन रुग्णालय येथे या महिलेवर उपचार सुरू असून सध्या तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. दरम्यान, या घटेनेने मुंबई उपनगरीय लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ( ) वाचा : पश्चिम रेल्वे मार्गावरील येथे याच आठवड्यात ही घटना घडल्याची माहिती आता रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेत (४९) या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. त्यांना सायन रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे, असे सांगण्यात आले. वाचा : नेमकं काय घडलं? प्रियांका खडके या बदलापूर येथे राहणाऱ्या असून सांताक्रूझ येथील रेशन ऑफिसमध्ये क्लर्क आहेत. माहीम स्टेशन येथील प्लॅटफॉर्म क्र. २ जवळ त्या लोकलमधून खाली कोसळल्या. चोरट्याने त्यांच्या हातातील मोबाइल खेचला व लोकलमधून उडी मारली. त्याचा प्रतिकार करत असतानाच प्रियांका यासुद्धा खाली कोसळून जखमी झाल्या. यावेळी अन्य प्रवाशांनी आरडाओरडा केला असता स्टेशनवरील प्रवाशांनी मोठे धाडस दाखवत पाठलाग करून चोरट्याला पकडले व पोलिसांच्या हवाली केले. आरोपीची ओळख पटली असून रमझान उर्फ (२८) असे त्याचे नाव आहे. आरोपीकडून प्रियांका यांचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध मुंबई सेंट्रल जीआरपी स्टेशन येथे कलम ३९४ आणि ३३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यसीनुद्दीन हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचे स्पष्ट झाले असून याआधीही त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत, असे पोलिसांनी सांगितले. वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/C4EupjP
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

ADVERTISEMENT