Type Here to Get Search Results !

'हिंदू तरुणांनो, हातात तलवारही ठेवा'; साध्वी सरस्वती यांचे वादग्रस्त विधान

धुळे: धुळ्यात प्राचीन राम मंदिराजवळ रामनवमीनिमित्त आयोजित धर्मसभेत विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या यांनी खळबळजनक विधान केले आहे. 'द कश्मीर फाइल्स', या चित्रपटाच्या विषयाला अनुसरून साध्वी सरस्वती यांनी, 'धुळ्यात देखील दुसऱ्या कश्मीर फाइल्सची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी एक लाख रुपयाचा मोबाईल, लॅपटॉप हातात बाळगणाऱ्या हिंदू तरूणांनी एक हजार रुपयाची तलवार देखील हातात ठेवावी', असे विधान केले आहे. अस्त्र-शस्त्र ठेवणे हे तर आपल्या हिंदूंची शान आहे, असेही त्या पुढे म्हणाल्या. (Sadhvi Saraswati has made a controversial statement in that Hindu youth should also carry a sword) क्लिक करा आणि वाचा- धुळ्यात रामनवमी चा उत्साह मोठ्या जल्लोषात पार पडला. रामनवमीच्या कार्यक्रमानिमित्त शहरातील प्राचीन राम मंदिराजवळ आयोजित धर्मसभेत साध्वी सरस्वती यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. उपस्थितांना संबोधित करताना साध्वी सरस्वती यांनी द काश्मीर फाइल्स या चित्रपटात दाखवलेल्या स्थितीवर भाष्य केले. आम्हालाही आमच्या घरातून हाकलून लावण्याची स्थिती येईल असा वेळेची आपण वाट पाहत आहोत का?, काश्मीरमधील स्थिती पाहून लोक विचारतात की अरे हिंदूंनो, अरे ब्राह्मणांनो तुम्ही तलवार का उचलली नाही? तुम्ही तुमच्या हक्कांसाठी लढाई का केली नाही?, तुम्ही युद्ध का केले नाही?... अरे तीच स्थिती आज आमचीही झालेली आहे. हेच लक्षात घेत मी आपल्याला सांगत आहे की पुन्हा कश्मीर फाइल निर्माण होता कामा नये. तुमच्या धुळ्यात देखील अशी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी जर तुम्ही १-१- लाखाचे मोबाईल फोन खरेदी करता, १-१- लाखाचे लॅपटॉप खरेदी करता, तर मग १-१ हजाराची तलवार खरेदी करून जरूर हातात बाळगा. क्लिक करा आणि वाचा- साध्वी सरस्वती पुढे म्हणाल्या की, मी येथे दंगल व्हावी यासाठी आलेली नाही. मात्र अस्त्र-शस्त्र बाळगणे ही आमच्या हिंदूंची आन-बान-शान आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/hgL08JI
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

ADVERTISEMENT