Type Here to Get Search Results !

दिल्लीवर विजय साकारत लखनौने पहिल्यांदाच पटकावले गुणतालिकेत मानाचे स्थान, तीन संघांना टाकले मागे

नवी मुंबई : लखनौ सुपर जायंट्सने दिल्लीवर अखेरच्या षटकात सहा विकेट्स राखत दमदार विजय साकारला. या विजयाचा फायदा लखनौच्या संघाला गुणतालिकेत झालेला आहे. या गुणतालिकेत लखनौच्या संघाने मोठी झेप घेतली असून त्यांनी मानाचे स्थान पटकावले आहे. दिल्लीवर विजय साकारच लखनौने कितवे स्थान पटकावले, पाहा...लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सने या सामन्यापूर्वी तीन सामन्यांमध्ये दोन विजय मिळवले होते. त्यामुळे गुणतालिकेत ते पाचव्या स्थानावर होते. पण या विजयानंतर मात्र लखनौच्या संघाने गुणतालिकेत दमदार झेप घेतली आहे. आज दिल्लीवर साकारलेला त्यांना तिसरा विजय होता. आतापर्यंतच्या चार सामन्यांमध्ये त्यांनी हा तिसरा विजय मिळवला आहे. त्यामुळे लखनौच्या संघाचे आता सहा गुण झाले आहे. गुणतालिकेमध्ये केकेआर आणि लखनौ या दोघांचेही समान असे सहा गुण झाले आहे. पण जास्त रनरेट असल्यामुळे केकेआरने आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे. दुसरीकडे लखनौचा संघ यापूर्वी पाचव्या स्थानावर जरी असला तरी त्यांनी या विजयासह दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. यावर्षी पहिल्यांदाच आयपीएलमध्ये उतरलेल्या लखनौने राहुलच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत आयपीएल गाजवणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांना आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये एकही विजय साकारता आलेला नाही. त्यांच्या तुलनेत लखनौची कामगिरी ही नक्कीच चांगली झाली आहे. गुणतालिकेत आता केकेआर सहा गुणांसह पहिल्या आणि लखनौ दुसऱ्या स्थानावर आहे. गुणतालिकेत चार संघांचे समान असे ४ गुण झालेले आहेत, पण रनरेटनुसार राजस्थान रॉयल्सने तिसरे, गुजरात लायन्सने चौथे, पंजाब किंग्सने पाचवे आणि आरसीबीने सहावे स्थान पटकावले आहे. आजच्या सामन्यात पराभव पत्करावा लागलेला दिल्लीचा संघ हा गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. त्यानंतर आठव्या स्थानावर चेन्नई, नवव्या स्थानावर मुंबई आणि अखेरच्या स्थानावर सनरायझर्स हैजराबादचा संघ आहे. त्यामुळे आता आयपीएलची रंगत दिवसेंदिवस वाढत असून गुणतालिकेमध्येही रंजकता वाढायला लागली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/wrINhcF
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

ADVERTISEMENT