मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन याच्याशी पंगा घेणारा व दाऊदला ठार मारण्याची शपथ घेणारा गँगस्टर याचा बहरीनमध्ये मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अली बुदेश हा मुंबईतील घाटकोपर येथे राहणारा होता. पोलीस व केंद्रीय यंत्रणांना गुंगारा देऊन तो विदेशात पसार झाला होता. गेली काही वर्षे बहरीनमध्ये त्याने आपले बस्तान बसवले होते. तो स्मगलिंगचे नेटवर्क चालवायचा. ( ) अली बुदेश हा गेल्या काही काळापासून आजारी होता व त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईत गुन्हेगारी कारवाया करणारा अली बुदेश हा एकेकाळी दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार होता. मात्र, नंतर अली बुदेश आणि दाऊद या दोघांमध्ये अनेक कारणांनी खटके उडाले. त्यातून ते एकमेकांचे कट्टर शत्रू बनले. अली बुदेश याने तर दाऊदला संपवण्याची शपथच घेतली होती, असे बोलले जायचे. पाकिस्तानात आश्रयाला असलेल्या दाऊद इब्राहिम आणि शकीलने २०२१ मध्ये मुंबईतल्या जान मोहम्मद नावाच्या गँगस्टरला अली बुदेशची हत्या करण्याची जबाबदारी दिली होती. त्यानुसार तो बहरीनला दाखलही झाला होता. मात्र, अली बुदेश त्याच्या हाती लागला नव्हता, असेही सांगितले जाते. दरम्यान, , आणि अली बुदेश हे तिघे दाऊदविरुद्ध एकत्र आले होते व त्यांनी दाऊदच्या अनेक हस्तकांना टिपले होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/1g9MzDG
via IFTTT
