
मुंबई: राज्यात सध्या राज्यसभेसोबतच विधान परिषद निवडणुकीचीदेखील रणधुमाळी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री विधान परिषदेसाठी उत्सुक आहेत. मी विधान परिषदेवर जावं ही कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे, असं विधान त्यांनी केलं आहे. जेव्हा जेव्हा येते, तेव्हा तेव्हा माझ्या नावाची चर्चा होते, असा काहीसा नाराजीचा सूरही त्यांनी आळवला. मुंडेंच्या विधानावर विरोधी पक्षनेते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे आमच्या मोठ्या नेत्या आहेत. आमच्याकडून त्यांच्या नावाला पूर्ण पाठिंबा आहे. अशा काही निवडणुका होतात, तेव्हा त्यांचं नाव चर्चेत येतं. ते साहजिकच आहे. त्यांचं नाव चर्चेत येणं यात काहीच वावगं नाही. त्या कोणत्याही पदासाठी पात्र आहेत. आमच्या त्यांच्या नावाला पाठिंबा आहे. आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहोत. याबद्दलचा निर्णय आमचे हायकमांड घेतील, असं फडणवीस म्हणाले. काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे? "मी जनतेच्या प्रश्नांवर गेली अनेक वर्ष लढत आहे. आता राज्यात विधान परिषदेच्या १० जागांवर निवडणूक पार पडत आहे. अशावेळी मला विधान परिषदेवर पाठवावं, ही कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे", असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. "पण शेवटी पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेत असतात. पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल", असंही सांगायला त्या विसरल्या नाहीत. विधान परिषदेचं गणित काय? महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जून रोजी निवडणूक होत आहे. विधानससभेतील संख्याबळानुसार भाजपचे ४, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी २, काँग्रेसचा एक आणि १० व्या जागेसाठी पुन्हा आणि मविआमध्ये चुरस होऊ शकते. तत्पूर्वी रिक्त होणाऱ्या १० जागांवर कुणाला संधी मिळू शकते तर विद्यमान आमदारांपैकी कुणाला डच्चू मिळू शकतो, याची चर्चा सुरु झाली आहे. पंकजांना विधान परिषदेत संधी मिळणार? राष्ट्रवादीचे नेते तत्कालिन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा जोरदार पराभव केला. त्या पराभवाला आता तीन वर्ष झाले आहेत. तेव्हापासून पंकजा मुंडे पक्षात एकट्या पडल्याचं चित्र आहे. मागील दसरा मेळाव्यात त्यांनी स्वपक्षीयांवर टीकेचे बाण सोडून मनातला राग व्यक्त केला. आपल्या मनातील खदखद व्यक्त केल्यानंतर काही दिवसांत त्यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. नंतरच्या काळात त्या पक्षात पुन्हा सक्रिय झाल्या. पाच राज्यांच्या झालेल्या निवडणुकीत देखील पंकजांनी पक्षाने सांगेल तिथे जाऊन प्रचार केला. मधल्या काळात पंकजांनी स्वपक्षियांशी जुळवूनही घेतलं. तर ओबीसींचं राजकीय आरक्षण कोर्टाने सध्या संपुष्टात आल्यानंतर सरकारला अडचणीत आणणारा ओबीसी चेहरा म्हणून पंकजांकडे भाजप पाहू लागलं. त्याच उद्देशातून ओबीसी आरक्षणाच्या कुठल्याही घडामोडींवर पंकजा माध्यमांत येऊन सरकारवर टीकेचे बाण सोडू लागल्या. ओबीसींच्या मुद्द्यावर सरकारविरोधात रोष निर्माण करायचा असेल तर पंकजा ती भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडू शकतात, त्याचमुळे त्यांना उमेदवारी देण्याचा पक्ष विचार करु शकतो, अशी शक्यता राजकीय जाणकारांनी बोलून दाखवली. गेल्या काही काळात पंकजा यांचा पक्षातला अॅक्टिव्हनेस चांगलाच वाढला आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्वपक्षीयांवर ताशेरे ओढण्याचं प्रमाण देखील त्यांनी कमी केलंय. अशा काळात भाजपने जर सदाभाऊ खोत आणि विनायक मेटे यांना डच्चू दिला तर पंकजा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाऊ शकतं, अशी शक्यता आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/FEfBeuj
via IFTTT