Type Here to Get Search Results !

कौन्सील ऑफ एज्युकेशनची सर्वच पदे एकाच घरात; मगदूम कुटुंबाचा प्रताप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर देशभक्त यांनी सर्वसामान्य मुलांना शिक्षण मिळावे म्हणून ६५ वर्षापूर्वी स्थापन केलेल्या या कोल्हापुरातील नामांकित आणि मोठ्या संस्थेची अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव ही तीनही पदे एकाच घरात घेतल्याने शिक्षण क्षेत्रात उलटसुलट चर्चेला तोंड फुटले आहे. कुंभार यांच्या कन्या रजनीताई मगदूम अध्यक्षा, त्यांचे पती विश्वनाथ मगदूम सचिव तर मुलगा प्रसाद यास उपाध्यक्षपद दिले आहे. आपल्याच कुटुंबात सर्वच पदे घेण्याचा मगदूमांच्या निर्णयाने संस्थेच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडला आहे. (All the posts of the in Kolhapur went to the Magdoom family) पंचगंगा साखर कारखान्याची स्थापना करत शेतकऱ्याना मदत करण्याची भूमिका घेतल्यानंतर रत्नाप्पाणा कुंभार यांनी १९५७ ला कोल्हापुरात कौन्सील ऑफ एज्युकेशन या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. यावेळी त्यांना छत्रपती शहाजी महाराज, शा .कृ. पंत वालावलकर, शिरगावकर ,दाभोळकर, केळकर, गद्रे, के.डी. कामत, आर. जे. शहा यांच्यासह अनेकांनी मदत केली. बरीच वर्षे तेच या संस्थेचे अध्यक्ष होते. त्यानंतर या संस्थेची धुरा के.डी.कामत यांच्याकडे आली. क्लिक करा आणि वाचा- कामत यांनी राजीनामा दिल्यानंतर अण्णांच्या कन्या रजनीताई मगदूम या अध्यक्षा झाल्या. यापूर्वी प्रसाद कामत हे उपाध्यक्ष तर व्ही.एन. पाटील हे पाटील हे सचिव होते. दोन दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत कामत आणि पाटील यांना दूर करून महत्त्वाची सर्वच पदे आपल्याच घरात घेण्याचा वादग्रस्त निर्णय घेण्यात आला. क्लिक करा आणि वाचा- मुलाला उपाध्यक्ष आणि पतीला सचिव करत रजनीताई मगदूम यांनी संस्थेचे सर्व निर्णय एकाच घरात होतील अशी व्यवस्था केली. याशिवाय अॅड. वैभव पेडणेकर व अ‍ॅड. अमित बाडकर हे दोन संचालक आहेत. पारदर्शक कारभाराचा आग्रह धरणाऱ्यांना कार्यकारिणीतून बाहेर काढल्याचा आरोप सध्या सुरू आहे. या संस्थेच्या कॉमर्स कॉलेज, नाईट कॉलेज व शहाजी लॉ कॉलेज अशा तीन शाखा आहेत. संस्थेच्या वतीने नर्सिंग कॉलेज काढण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. क्लिक करा आणि वाचा- कुंभार यांच्या काळात त्यांनी या संस्थेवर घरातील कोणत्याच व्यक्तीला संधी दिली नव्हती. आता मात्र एकाच घरात सर्वच पदे एकवटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/GJcOgPF
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

ADVERTISEMENT