Type Here to Get Search Results !

ब्रिटनच्या महाराणीचं विमान वादळात फसलं, वैमानिकानी मार्ग बदलल्यानं संकट टळलं

लंडन : ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं विमान वादळात अडकल होतं. वैमानिकांनी विमानाचा मार्ग बदलत समयसूचकता दाखवल्यानं अनर्थ टळला. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या कारभाराची ७० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होत्या. उत्तर पश्चिम लंडनमध्ये असताना वादळ आलं त्यामुळं वैमानिकांनी समयसूचकता दाखवत मार्ग बदलला. डेली मेलच्या बातमीनुसार बंकिंगघम पॅलेसच्या प्रवकत्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय याचं विमान विमानतळावर उतरत असताना त्यांना वादळाचा फटका बसला. त्यामुळं वैमानिकांना मार्ग बदलावा लागला. वैमानिकांनी १५ मिनिटे लंडनला हवाई फेऱ्या मारल्या आणि वातावरण पूर्ववत झाल्यानंतर विमान उतरवण्यात आलं. एलिझाबेथ द्वितीय यांचं सध्याचं वय ९६ वर्ष आहे. ब्रिटनच्या इतिहासात सर्वाधिक काळ गादीवर राहणाऱ्या शासक म्हणून त्यांची नोंद झाली आहे. एलिझाबेथ द्वितीय यांचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम इतिहासातील पहिला कार्यक्रम ठरणार आहे. या कार्यक्रमात लाखो लोक सहभागी होणार असून टीव्हीच्या माध्यमातून देखील प्रक्षेपण करण्यात येत आहे. येत्या रविवारी देखील या संदर्भातील कार्यक्रम होणार आहे. लंडनमध्ये १० हजार लोक त्या कार्यक्रमात सहभागी होतील. संगीत आणि नाट्य प्रयोगांचं देखील आयोजन केलं जाणार आहे. १९५२ मध्ये एलिझाबेथ द्वितीय यांनी कारभार स्वीकारला होता तेव्हापासून आतापर्यंत झालेलं बदल देखील दाखवण्यात येतील. येत्या रविवारी आयोजित कार्यक्रमात एड शीरान हे गॉड सेव्ह द क्वीन या गीताचं गायन करणार आहेत. राजकुमारी एलिझाबेथ या ६ मार्च १९५२ मध्ये महाराणी एलिझाबेथ द्वितीय बनल्या. तेव्हापासून त्या ब्रिटनच्या शासक म्हणून काम करत आहेत. त्यांच्या कार्यकाळात ब्रिटनमध्ये १४ पंतप्रधानांनी काम केलं आहे. आता एलिझाबेथ यांच्या कार्यकाळाला ७० वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्तानंन विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/lYOGTR9
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

ADVERTISEMENT