
वर्धाः सोमवारी मध्यरात्री वर्धा जिल्ह्याच्या सेलसुरा येथे झालेल्या अपघातात सात वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृतक विद्यार्थी हे नेमके कुठे गेले होते. याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, आता एका सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हे सातही विद्यार्थी वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले असल्याचे उघड झालं आहे. सात विद्यार्थ्यापैकी एक असलेल्या पवन शक्ती या विद्यार्थ्यांचा त्यादिवशी वाढदिवस होता आणि वाढदिवस साजरा करण्याकरिता हे विद्यार्थी गेले होते. नागपूर तुळजापूर महामार्गवरील देवळी समोरील इसापुर जवळील एका हॉटेलमध्ये हे गेले असून तेथील सीसीटीव्ही हाती लागले आहे. तिरोडा येथील आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले, नीरज चौहान, नितेश सिंग, विवेक नंदन, प्रत्युश सिंग, शुभम जयस्वाल आणि पवन शक्ती हे नितेश सिंग यांच्या वाहनाने पवन शक्तीचा वाढदिवस साजरा करायला निघाले होते. हे सर्व सोमवारी संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी नागपूर तुळजापूर महामार्गवरील इसापुर जवळील 'माँ की रसोई' या हॉटेलमध्ये पोहचले. दरम्यान यांच्या हातात केक सुद्धा होता ते हॉटेलच्या बाजूला असलेल्या गार्डन मध्ये बसले होते. सुरवातीला केक कापून हॉटेलमध्ये जेवले. त्यानंतर ११ वाजून २७ मीनिटाने पवन याने ऑनलाइन पद्धतीने बिल दिलं. यानंतर रात्री ११ वाजून ३८ मिनिटांनी ते येथून निघून गेल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. त्यानंतरच त्यांच्या वाहनाचा अपघात झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. वाचाः या घटनेनंतर हे सर्व विद्यार्थी नेमके गेले कुठे होते याबाबत चर्चा सुरु होती. मात्र या सीसीटीव्ही नंतर हे सर्व यवतमाळ जिल्ह्यात नसून वर्धा जिल्ह्यातच गेले असल्याच समोर आलं आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे शवविच्छेदन झाले असून मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत. वाचाः

बुलडाणाः राज्यात करोना संसर्गाचा कहर अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळं राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. तसंच, करोना संसर्ग पाहता शाळा देखील ऑनलाइन घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. मात्र, स्थानिक परिस्थितीनुसार शाळा पुन्हा सुरु करण्याचे होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. मात्र, त्यापूर्वीच बुलडाणा जिल्ह्यातील एका शाळेत २२ शिक्षकांना करोनाची लागण झाली आहे. एकाच शाळेतील २२ शिक्षकांना करोनाची लागण झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगावमधील अरजण खिमजी शाळेतील २२ जणांना एकाच वेळी करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळं शाळेतील विद्यार्थ्यांसह पालकांचेही टेन्शन वाढलं आहे. एकाच वेळी २२ जणांना करोनाची लागण झाल्यामुळं शाळा प्रशासनाच्याही चिंतेत वाढ झाली आहे. या २२ शिक्षकांबरोबरच आणखी कोणाला करोनाची बाधा झालीये का हे तपासण्यासाठी शाळेतील इतर कर्मचाऱ्यांचीही करोनाची चाचणी करण्यात आली आहे. त्यामुळं एकूण ११३ शिक्षक कर्मचाऱ्यांचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत. वाचाः बुलडाणा जिल्ह्यातील ही मोठी शाळा असून या शाळेत १ ते १२वी पर्यंतचे एकून ५ हजार ५०० विध्यार्थी आहेत. तर १५० शिक्षक आहेत. उद्यापासून म्हणजे २८ जानेवारीपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करोनाचे नियम पाळून जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर शिक्षकांना शाळा सुरू होण्याआधी करोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. म्हणून या शाळेतील १५० शिक्षकांपैकी सुरुवातीला पहिल्या टप्प्यात ३५ शिक्षकांनी RTPCR चाचणी केली असता ३५ पैकी २२ शिक्षक करोनाबाधित असल्याचं निष्पन्न झाल्याने अजून ११३ शिक्षकांचा करोना चाचणी अहवाल प्रलंबित आहे. त्यामुळे उद्यापासून शाळा कशा सुरू कारायच्यात असा प्रश्न उपस्थित झाला आहे? एकाच शाळेत जर इतके शिक्षक करोनाबाधित असतील तर मुलांच्या सुरक्षेचं काय? असाही प्रश्न पालकांना पडला आहे. वाचाः

प्रसाद रानडे| रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर राज्यातील , आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुरू केलेले चक्काजाम आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री यांच्या आदेशानंतर संबंधित अधिकारी लेखी आश्वासन देणारे पत्र घेऊन आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ९० किलोमीटरचे रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन सुरू केले होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते महामार्गावर जमले होते. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशानंतर संबंधित अधिकारी पत्र घेऊन आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले. ३१ जानेवारीपर्यंत काम सुरू होईल, असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते उदय सावंत यांनी यासंबंधीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर अधिकारी पत्र घेऊन आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले. या आंदोलनात खासदार विनायक राऊत, उदय सामंत, आमदार शेखर निकम, चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. गडकरी यांचे आदेश घेऊन अधिकारी पोहोचले मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केल्यानंतर त्याची गडकरी यांनी तात्काळ दखल घेतली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिल्यानंतर ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले. रस्त्याचे काम ३१ जानेवारीपर्यंत सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तूर्त स्थगित केले आहे. यासंबंधी उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलनाचा दोनच दिवसांपूर्वी इशारा दिला होता. त्यानंतर केंद्रातील अधिकाऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तीन-चार वर्षांपासून हे रस्त्याचे काम रखडले होते. अधिकारी लेखी आश्वासन देणारे पत्र घेऊन आले. त्यांनी त्यात नितीन गडकरी यांचाही उल्लेख केला आहे. त्यांनी आदेश दिल्यानंतर आल्याचे सांगितले. रस्त्याचे काम रखडण्यास ठेकेदार जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका गडकरी यांनी घेतली आहे, असे सामंत यांनी सांगितले. या रस्त्याचे काम मे-जून २०२३ पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन देण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, हा रास्ता रोको संयमाने करण्यात आला. जर काम वेळेत झाले नाही तर, रत्नागिरीत यापेक्षा मोठे आंदोलन बघायला मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला.

: कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथील नितीन अंकुश पोटरे (वय ३५) या बेपत्ता तरुणाचा त्याच्याच दोन मित्रांनी कालव्याच्या पाण्यात बुडवून खून केल्याचं उघड झालं आहे. आरोपी मित्रांनी सुरुवातीला मृत तरुणाच्या कुटुंबियांकडे उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांपुढे या आरोपींचा बनाव फार काळ टिकला नाही. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. मात्र, खुनाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. घटनेच्या दिवशी तिघा मित्रांनी एकत्र दारू प्यायली होती. पोलिसांनी तपास करून आनंद बबन परहर व जावेद अब्बास शेख (दोघे रा पिंपळवाडी ता. कर्जत ) यांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. () नितीन अंकुश पोटरे हा २३ जानेवारीपासून बेपत्ता झाला होता. मित्रांसोबत गेलेला तो परतलाच नव्हता. त्यानंतर मित्र उडावाउडवीची उत्तरे देत होते. शोधाशोध केल्यावर पोटरे याचा मृतदेह आढळून आला. पुढे तपासात त्याच्या मित्रांनीच त्याचा खून केल्याचं उघड झाल्याने त्यांना बुधवारी रात्री अटक करण्यात आली. यासंबंधी महेश अंकुष पोटरे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, घटनेच्या दिवशी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नितीन पोटरे घराबाहेर पडला. मी आनंद परहर व जावेद शेख या दोन मित्रांकडे जाऊन येतो, असं त्याने घरी सांगितलं होतं. मात्र रात्री तो परत आलाच नाही. त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क झाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी संजय पोटरे व इतर नातेवाईकांनी नितीन याचा सर्वत्र शोध घेतला मात्र काहीही हाती लागले नाही. दरम्यान जावेद शेख यांनी नितीन याची मोटरसायकल घरी आणून लावली. त्याने पोटरे यांच्या घरच्यांना सांगितलं की, मी नितीन व आनंद असे तिघेजण रात्री बरोबरच होतो. आम्ही तिघेही दारू प्यायलो होतो. त्यानंतर मी नितीनची गाडी घेऊन पुढे आलो आहे. तो खूप दारू प्यायला असल्यामुळे तो आनंद परहर याच्यासोबत होता. त्याच्याबद्दल मला अधिक काही माहिती नाही. शेख याच्या या सांगण्यामुळे संशय वाढला. त्यामुळे पोटरे याच्या नातेवाईकांनी दुसरा मित्र आनंद परहर याच्याकडे चौकशी केली. त्याने सांगितलं की रात्री नऊ वाजता मी नितीन याला जावेद शेख याच्या घराजवळ सोडलं आहे. तेथून पुढे काय झालं, मला माहिती नाही. यामुळे गूढ आणि संशयही वाढत गेला. पोटरे याच्या नातेवाईकांनी पोलीीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. दोन दिवसांनी तळवडी शिवारामध्ये येसवडी कुकडी कॅनॉलच्या पाण्यामध्ये नितीन पोटरे यांचा मृतदेह आढळून आला. त्याचा चेहरा ओळखता येणार नाही, असा झाला होता. नातेवाईकांच्या मदतीने त्याची ओळख पटवण्यात आली. दरम्यान, पोलीस निरीक्षक यादव यांनी तपासाची सूत्रे हलवली. मुख्य संशयित त्याचे दोन मित्र होते. ते उडाउडवीची उत्तरे देत होती. असंबंध माहिती देत होते. अखेर पोलिसी खाक्यासमोर त्यांचे हे खोटे दीर्घकाळ टिकले नाही. त्यांनी खून केल्याचं उघड झाल्याने पोलिसांनी दोघांनाही अटक केली. मात्र, त्यांनी पोटरे याचा खून का केला, हे अद्याप स्पष्ट झालं नाही.

औरंगाबाद : नागरिकांच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त डबलडेकर इलेक्ट्रिक बससारख्या पर्यावरणपुरक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्याची सूचना पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद महानगर पालिकेला दिल्या आहेत. आदित्य ठाकरे हे दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर असून, बुधवारी पत्रकारांशी संवाद साधत असताना ते म्हणाले. औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनी बुधवारी शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन केले. तसेच स्मार्ट सिटी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत महानगर पालिकेच्या विकास कामांच्या आढावा घेतला. यावेळी बोलताना सूचना देतांना ठाकरे म्हणाले की, मुंबईच्या धर्तीवर शहरात पर्यावरणपुरक अशा डबलडेकर इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यास प्रवास क्षमता दुपटीने वाढून खर्चात कपात होईल. याकरिता महानगर पालिकेने पर्यावरणपुरक अशा या बस करीता लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याबाबत भर द्यावा. जेणेकरुन विकासाच्या दृष्टीने शहराच्या चिरंतन वाढीसाठी ही संकल्पना नक्कीच उपयोगी ठरेल. तर याचवेळी आदित्य ठाकरे यांनी शहरातील वातावरणीय बदल या संदर्भातील डब्लुआरआयचे कार्यक्रम अधिकारी आशा ढवल यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर औरंगाबाद शहरात होत असलेले वातावरणातील बदल यासंदर्भात सविस्तर चर्चा करत काही सूचना सुद्धा दिल्या. अमित देशमुखांना उत्तर... मंगळवारी औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व औरंगाबाद जिल्ह्याचे काँग्रेसचे संपर्कमंत्री अमित देशमुख यांनी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याचा आरोप केला होता. त्यांच्या याच आरोपाला आता पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. 'देशमुख काय म्हणाले हे मी पाहिलं नाही. मात्र महाविकास आघाडी सरकारच काम चांगलं सुरू असल्याचं म्हणत, एका ओळीत अमित देशमुखांच्या आरोपाला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं.

मुंबई: मुंबईतील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून सुरू झालेला वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. '' नामकरणावरून भाजप लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे, अशी टीका मलिक यांनी केली. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या पुढाकाराने मालाड येथील क्रीडा संकुल तयार करण्यात आले आहे. या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यात येणार असल्याचे फलक परिसरात लागले होते. त्याचवेळी अस्लम शेख यांनी या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यात काहीही गैर नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून भाजप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी क्रीडा संकुलाबाहेरील परिसरात आंदोलनही केले होते. आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. टिपू सुलतानच्या नावावरून भाजप लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे. टिपू सुलतान ब्रिटिशांशी लढले. त्या काळी ते ब्रिटिशांशी लढताना शहीद झाले. ते ब्रिटिशांना कधीही शरण गेले नाहीत. ब्रिटिश साम्राज्याला त्यांनी त्याकाळी हादरवून सोडले होते, असे मलिक म्हणाले. याआधी २०१३ मध्ये भाजप नगरसेवकांनी अशाच प्रकारे टिपू सुलतानचे नाव देण्याची भूमिका घेतली होती, ही बाबही मलिक यांनी निदर्शनास आणून दिली. वाद कशावरून? मालाडच्या मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या एका क्रीडा संकुलाला ‘वीर टिपू सुलतान क्रीडा संकुल’ असे नाव देण्यावरून हा वाद निर्माण झाला. काँग्रेसचे नेते तथा शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आमदार निधीतून हे सर्व काम पूर्णत्वास येत आहे. याचा लोकार्पण सोहळा होणार असल्याचे फलक मालवणी परिसरात लावण्यात आले होते. त्यामुळे या परिसरात वातावरण तापायला सुरुवात झाली होती. टिपू सुलतानचे नाव क्रीडा संकुलाला देण्यास आमचा विरोध आहे. हे नामकरण त्वरित थांबविण्यात यावे, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली.

मुंबई: मालाडच्या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानाचे नाव देण्याच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या भाजप नेत्यांना गुरुवारी खासदार संजय राऊत () यांनी प्रत्युत्तर दिले. भाजपचा टिपू सुलतानाच्या नावाला विरोध असेल तर त्यांना सर्वप्रथम राष्ट्रपती यांचा राजीनामा घ्यावा लागेल. रामनाथ कोविंद यांनी कर्नाटकच्या विधानसभेत टिपू सुलतानाचा गौरव केला होता. हा महान योद्धा आणि प्रशासक असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे या मुद्द्यावरुन भाजप राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यायला तयार आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी टिपू सुलतानाच्या नावावरुन राजकारण करणाऱ्या भाजपला चांगलेच फटकारले. टिपू सुलतानाचं काय करायचं हे राज्य सरकार आणि महापालिका बघून घेईल. तुम्ही म्हणजे इतिहासाचे ठेकेदार नाहीत, हे लक्षात ठेवा. टिपू सुलतान, श्रीरंग पट्टणम, हैदरअली यांच्याविषयी आम्हालाही माहिती आहे. कोणी काय अत्याचार केलेत, हेदेखील आम्ही जाणतो. पण भाजप सगळा जुना इतिहास पुसून नवा इतिहास रचण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीत आपण ते पाहतच आहोत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. तसेच मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपु सुलतानाचे नाव देण्याचा निर्णय मागे न घेतल्यास महाराष्ट्र पेटवू, असा इशारा देणाऱ्या भाजप नेत्यांनाही संजय राऊत यांनी सज्जड इशारा दिला. या मुद्द्यावरुन राज्यभरात आंदोलन पेटवू, ही भाषा कोण करत आहे, ते आम्हाला माहिती आहे. तुमच्यात हिंमत असेल तर महाराष्ट्रात दंगली करुनच दाखवा, याठिकाणी ठाकरे सरकार आहे, हे लक्षात ठेवा, असे संजय राऊत यांनी म्हटले. मालाडमध्ये भाजप आणि हिंदुत्वावादी संघटनांचं आंदोलन मालाडच्या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानाचे नाव देण्याच्या विरोधात बुधवारी मुंबईत भाजप आणि हिंदुत्वावादी संघटनांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी मालाड परिसरातील रस्ते वाहतूक रोखून धरली होती. आंदोलकांनी बेस्टच्या बसेस आणि पोलिसांच्या गाडीतील हवा काढून टाकल्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. टिपू सुलतान सुलतान हिंदूविरोधी होता. त्याने हिंदूंची अनेक मंदिरे उध्वस्त केली, हजारो हिंदूंचे धर्मांतरण केले तसेच अनेक हिंदूंची क्रूरपणे हत्या केली आहे. अशा क्रूर आणि हिंदू विरोधी टिपू सुलतानचे नाव क्रीडा मैदानास देण्यास आमचा विरोध आहे, अशी भूमिका भाजपने घेतली आहे.

: प्रसिद्ध लेखक आणि कलावंत तसंच व्यसनमुक्तीसाठी आयुष्य वेचलेले सामाजिक कार्यकर्ते डॉ. यांचे प्रदीर्घ आजाराने पत्रकारनगर येथे राहत्या घरी आज सकाळी निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. ( Anil Avchat Passes Away) मराठी साहित्यामध्ये डॉ. अनिल अवचट यांनी मोलाचं योगदान दिलं. दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. त्यांच्या पश्चात विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय आणि मोठा मित्रपरिवार आहे. पत्रकारनगर येथे आज दुपारी २ वाजेपर्यंत डॉ. अवचट यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार केले जातील. डॉ. अनिता आणि अनिल अवचट यांच्या व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील कार्याचा वसा यापुढे असाच पुढे सुरू राहील, असं मुक्तांगणचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. अनिल अवचट यांचे कार्य : अनिल अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. त्यांनी एम.बी.बी.एस ची पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. महाविद्यालयीन जीवनात डॉक्टरांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक ‘पूर्णिया’ प्रसिद्ध केले. तेव्हापासून अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले. महाराष्ट्र राज्य व देशपातळीवर डॉ. अनिल अवचट यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी आहे. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक होते. डॉ. अवचट स्वत: पत्रकार असले तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली. मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी तसेच विविध प्रश्नांवर लढा देताना आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या प्रश्नासाठी खर्च करणाऱ्या कार्यकर्त्यांविषयीही लिखाण केलं. सर्व सामाजिक लढ्यांमागच्या चांगल्या गोष्टी त्यांनी नेहमीच अधोरेखित केल्या. डॉ. अवचट हे केवळ लेखक व सामाजिक कार्यकर्ते नव्हते तर ते एक कलाकारही होते. त्यांची चित्रे, लाकडातील शिल्पे, छायाचित्रे,ओरिगामी, बासरी वादन यांतून त्यांच्या अंगभूत गुणांची ओळख पटते. अवचट यांच्या ‘सृष्टीत गोष्टीत’ या पुस्तकाला साहित्य अकादमीतर्फे उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार तसंच त्यांना महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार मिळालेला आहे.

वर्धा : सेलसुरा येथे झालेल्या अपघातात सात वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अपघातात निधन झालं होतं. यात तिरोडा - गोरेगाव मतदारसंघातील भाजपा आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार याचंही निधन झालं होतं. मंगळवारी अविष्कारवर गोंदिया जिल्ह्याच्या खमारी या मुळगावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलाच्या निधनानंतर आमदार विजय रहांगडाले यांनी फेसबुकवर कविता शेअर करत आपलं दुःख व्यक्त केलं आहे. अविष्कार हा आमदार विजय रहांगडाले यांचा एकुलता मुलगा होता. या घटनेनंतर या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावर मुलाला 'आज काळीज फाटलं, त्यानं आकाश गाठलं' या कवितेच्या माध्यमातून श्रद्धांजली दिली आहे. आमदारांची भावनिक पोस्ट काय झालं होतं नेमकं?देवळी येथून वर्धाला येत असताना सेलसुरा जवळ हा अपघात झाला. वाहनावर नियंत्रण सुटल्यामुळे जवळील नदीच्या पुलावरून वाहने थेट खाली पडलं. जवळपास ४० फूट लांब व रुंद चारचाकी वाहन खाली पडल्याने भीषण अपघात झाला. गंभीर म्हणजे मृतांमध्ये सर्वच जवळपास २५ ते ३५ वयोगटातील आहेत. रात्री एक वाजताच्या जवळपास हा अपघात झाला. चार वाजेपर्यंत मृत्यूदेह बाहेर काढण्याचं काम सुरू होतं.

नवी दिल्ली : , 27 January 2022 : सततचे हवामानातील बदल काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. गेल्या काही दिवसांपासून देशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे तर काही ठिकाणी कडाक्याची थंडी पाहायला मिळते. खरंतर, आणखी काही दिवस हवामानात असेल बदल होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. भारताचा बहुतांश भाग सध्या थंडीने गारठला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा सतत घसरत आहे. अशावेळी भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवस थंडीचा जोर कायम असेल, अशी शक्यता वर्तविली आहे. ( Maharashtra weather news ) पुढील २ दिवसांता गारठा वाढणार भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, पुढील २ दिवसांत विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात राज्यात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांत आताच पारा घसरून हूडहुडी भरू लागली आहे. मंद वाऱ्यांमुळे थंडी असह्य झाली आहे. अशावेळी हवामान विभागाने दिलेला ताजा अलर्ट महाराष्ट्राच्याही काळजीत भर टाकणारा ठरला आहे. पुढील ३-४ दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात थंडीची लाट कायम राहील. तर आज, रात्री आणि उद्या सकाळी हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील एकाकी ठिकाणी दाट धुक्याची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ते कमी होईल. पंजाब आणि उत्तराखंडच्या काही भागात आज सकाळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातही थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे, तर राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात थंड ते तीव्र थंडीची लाट असेल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या काही भागात थंडीचे दिवस राहण्याची शक्यता आहे. (weather forecast today 27 January 2022 up Punjab Haryana cold wave) 'या' ठिकाणी पावसाची शक्यता 'स्कायमेट वेदर'ने दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. सिक्कीम आणि ईशान्य भारताच्या इतर भागांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो तर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे. IMD ने फक्त दिल्लीच नाही तर संपूर्ण उत्तर-पश्चिम भारतात थंडीची लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे. पुढील दोन दिवसांत उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागात आणि पुढील चार-पाच दिवसांत मध्य प्रदेशात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. (weather forecast today 27 January 2022 Maharashtra weather news up Punjab Haryana cold wave)

पुणे : मुंबई, ठाणे, वर्धा, अकोला आणि नाशिकच्या तुलनेत महाराष्ट्रातील सर्वात जोखीम असलेल्या शहरांमध्ये म्हणजेच पुण्यात कोविडचा (COVID) साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) ४९.९ टक्के असल्याचं समोर आलं आहे. हा दर गेल्या आठवड्यात नोंदवलेल्या राज्याच्या सरासरी २४ टक्क्यांच्या दुप्पट आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचं पालन करून आपली काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. सरकारी आकडेवारीनुसार, १७ ते २४ जानेवारी दरम्यान झालेल्या RT-PCR चाचणीद्वारे एकूण ८४,९०२ लोकांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. इतकंच नाहीतर रॅपिड अँटीजेन टेस्ट (RAT) तसेच RT-PCR साठी एकूण २.२२ लाख नमुने तपासण्यात आले. ज्यामध्ये ९७,८३८ लोक पॉझिटिव्ह आढळले. अशात एकूण आकडेवारी पाहता पुणे शहरातील करोनाचे प्रमाण चिंताजनक आहे. हे थांबवण्यासाठी नागरिकांनी नियमांचं पालन करत आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. तुम्हाला सर्दी-तापाची साधी लक्षणं असतील तर घरीच उपचार घ्या, अशाही सूचना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. दरम्यान, ओमिक्रॉनमुळेच हे घडत असून, येत्या दहा दिवसांपर्यंत हीच परिस्थिती राहू शकते, असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या काळात लोकांनी खूप काळजी घ्यावी आणि घरातच राहावे. १०-१५ दिवसांनी केसेस कमी होण्यास सुरुवात होईल, अशी आमची अपेक्षा आहे असं पीएमसीचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले.

ठाणे : विटभट्टीवर लागणारा कोळसा कंटेनर (ट्रक) मधून खाली करत असतांना ट्रकच्या ट्रॉलीचा शॉकऑप्सर अचानक तुटल्याने कोळश्याने भरलेला कंटेनर वीटभट्टी मजुराच्या गवताच्या घरावर कोसळला. संपूर्ण कोळसा घरावर पडल्याने घरात राहणारी सर्व सदस्य गाडले गेले. घटनेची माहिती तात्काळ स्थानिकांना लागताच स्थानिकांनी तात्काळ कोळश्याच्या ढिगा-याखालून सर्वांना बाहेर काढले. मात्र, या दुर्घटनेत तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. भिवंडी तालुक्यातील टेंभिवली गावात राहणाऱ्या बालाराम वळवी हे कुटुंबियांसह आपल्या घरात झोपले असताना ट्रकच्या ट्रोलीतील वीट भट्टीसाठी लागणारा कोळसा त्यांच्या घरावर पडून घरातील सर्व सदस्य या कोळश्याच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यांच्या घराजवळ असलेल्या विट भट्टीसाठी लागणारा कोळसा ट्रकने आणला होता आणि तो खाली करत असताना ट्रकच्या ट्रॉलीचा शॉकऑप्सर अचानक तुटल्याने कोळश्याने भरलेल्या कंटेनरमधील कोळसा त्यांच्या घरावर पडून ही दुर्घटना घडली. बाळाराम वळवी हे आपली पत्नी एक लहान मुलगा आणि तीन मुलींसोबत या ठिकाणी राहत होते. त्यामुळे याआधी देखील वळवी यांनी अनेक वेळा या विटभट्टीसाठी कोळसा घराजवळ उतरवण्यास विरोध केला होता. मात्र कोळसा घराशेजारीच उतरवला जात होता. ही दुर्घटना घडली त्यावेळी वळवी त्यांची पत्नी आणि लहान मुलाला यांना बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आलं. परंतु, इतर तीन मुली कोळसाच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्याने बाहेर काढल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर होती. पुढील उपचाराकरता मुलींना भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्घटनेमध्ये वळवी यांची तिन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . तर दुसरीकडे संतप्त जमावाने कंटेनर (ट्रकची) ची तोडफोड केली आहे. सध्या भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. तर वीटभट्टी मालक, ट्रक मालक त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ठाणे : मिरा-भाईंदर शहरात काशिमिरा परिसरातील आरक्षण क्रमांक ३६४ मध्ये मीरा भाईंदर महानगर पालिकेकडून झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. परिसरातील झोपडीधारकांनी याची तक्रार राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे केली. या संदर्भात मंत्री आव्हाड यांनी तत्काळ पालिकेचे उपयुक्त स्वप्नील सावंत यांना फोन करून त्यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी पुनर्वसन न करता कारवाई कशी केली असा प्रश्न उपस्थित करत. हे राज्य कायद्याचे आहे हिटलरशाही चालणार नाही असा दम उपायुक्त यांना फोनवरून दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड हे मीरा भाईंदर येथे आले असता त्यांनी महापालिकेच्या उपायुक्तांना चांगलेच झापले. मीरा भाईंदर मधील काशीमीरा परिसरातील आरक्षण क्रमांक ३६४ या जागेवर असलेल्या अनेक झोपडपट्टीवर मीरा भाईंदर महापालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली. त्यानंतर या परिसरातील होप फाऊंडेशनचे अध्यक्ष साहिल मिश्रा यांच्या सहित २० ते २५ महिलांनी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची कार्यक्रमादरम्यान भेट घेऊन लेखी निवेदन दिले आणि आपल्या व्यथा आव्हाडांसमोर मांडल्या. या परिसरातील नागरिक हे १९९० ते १९९५ च्या काळापासून या जागेवर राहतात. मागील वीस ते पंचवीस वर्षापासून घरपट्टी देखील आम्ही भरली असून अचानकपणे बाजूला असलेल्या विकासकाच्या फायद्यासाठी आमच्यावर कारवाई केली असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी मंत्री आव्हाड यांना दिली. होप फाऊंडेशनच्या या लेखी निवेदनाची गंभीर दखल घेत आव्हाड यांनी तात्काळ पालिकेचे उपायुक्त स्वप्नील सावंत यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून चांगलाच समाचार घेतला. फोनवरून उपायुक्तांशी संवाद साधताना आव्हाड यांनी ही जागा पालिकेची असली तरी त्याच्या जागेवर गोरगरीब जनता राहत आहे. ९५ च्या अगोदरचे स्थानिक त्याठिकाणी आहेत तर त्यांना २६८ अन्वये नोटीस का दिली नाही? १५ दिवसांत कागदपत्रे सादर करण्यास का सांगितले नाही? असा सवाल यावेळी आव्हाड यांनी उपयुक्तांसमोर उभा केला. थेट बेधडक कारवाई कोणाच्या बोलण्यावर केली, जरी आयुक्तांचा आदेश असला तरी बेकायदेशीर आदेशाचे आपण पालन करणार का? असा जाब त्यांनी उपायुक्तांना विचारला. यापुढे त्या जागेवर राहणाऱ्या रहिवाशांच्या घरांवर जर बुलडोजर चढवला तर त्या जागेवर मी स्वतः येईल असा सज्जड दम मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला. अगोदर त्यांचे पुनर्वसन करा त्यांच्या हातात चाव्या द्या त्यानंतर झोपड्या तोडा अशी सूचना गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी उपायुक्त स्वप्नील सावंत यांना केली.

मुंबई: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी सात कोटी किंमतीच्या दोन हजार रुपयांच्या जप्त केल्या आहेत. गुन्हे शाखेने दहिसर येथे सापळा रचून ही कारवाई केली आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने सात जणांना अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (the mumbai police crime branch on wednesday seized rs 2000 counterfeit worth of 7 crores rs) काही लोक दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा घेऊन मुंबईत येणार आहेत, अशी माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती. ही माहिती मिळताच मुंबई गुन्हे शाखेचं एक पथक दहिसर येथे थडकले. गुन्हे शाखेने दहिसर येथे सापळा रचला. आरोपी येत असलेल्या गाडीला थांबवून त्यांची विचारपूस केली. तपासामध्ये आरोपींच्या गाडीतून पाच कोटी रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. या गाडीत या सर्व नोटा दोन हजार रुपयांच्या २५ हजार नोटा होत्या. क्लिक करा आणि वाचा- या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून इतर आरोपींचीही माहिती मिळाली. हे सर्व हॉटेल अम्फा येथे थांबले होते. ही माहिती मिळताच मुंबई गुन्हे शाखेनं हॉटेलवर छापा टाकला. येथून पोलिसांनी दोन हजार रुपयांच्या दहा हजार बनावट नोटा जप्त केल्या. या नोटांची किंमत दोन कोटी रुपये इतकी आहे. क्लिक करा आणि वाचा- ७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त या कारवाईत मुंबई गुन्हे शाखेने बुधवारी एकूण सात कोटी रुपये किंमतीच्या दोन हजाराच्या बनावट नोटा जप्त केल्या. शिवाय एकूण सात आरोपींना अटक केली. या सर्व आरोपींना गुन्हे शाखेनं न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस या आरोपींची कसून चौकशी करत आहेत. या नोटा नेमक्या आल्या कुठून? यामध्ये कोण कोण संबंधित आहे? याचा तपास पोलिस करत आहेत. क्लिक करा आणि वाचा-

श्रीवर्धन: श्रीवर्धनमधील येथील श्रीकृष्ण सहकारी मत्यव्यवसायिक संस्थेतील लक्ष्मी विजय नौकेला (IND MH 3 MM 4192) २३ जानेवारी रोजी जलसमाधी मिळाली होती. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्या नौकेतील चार खलाशी मुत्यूशी झुंज देत बालंबाल बचावले होते. ही बुडालेली नौका ५०० मच्छिमारांनी एकीचे बळ दाखवत कोणत्याही शासकीय मदतीशिवाय समुद्रातून बाहेर काढली. या ५०० मच्छिमारांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. (Hundreds of showed their strength and pulled out the sunken ) अनिकेत रघुवीर यांची ही नौका होती. ही नौका बुडून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. शासनाकडून मिळणाऱ्या भरपाईसाठी अनेक दिवस पाठपुरावा करुनही तुटपुंजी रक्कम मिळते. त्यामुळे रघुवीर कुटुंबीयांच्या चिंता वाढल्या होत्या. क्लिक करा आणि वाचा- कशी घडली घटना? रविवारी दुपारनंतर अचानक समुद्रामध्ये दक्षिणेकडून सोसाट्याचे वादळ वारे वाहायला सुरुवात झाली. त्यामुळे मच्छीमार भयभीत होऊन आपापल्या नौका व जीव मुठीत धरून नौका मुळगाव येथील खाडीमध्ये सुरक्षित ठिकाणी नेऊ लागले. वाऱ्याचा प्रचंड वेग व समुद्राने घेतलेल्या रौद्ररुपापुढे मच्छीमार हतबल झाले. त्यामध्येच अनिकेत लक्ष्मण रघुवीर यांची 'लक्ष्मी विजय' नौकेचे सुकाणू तुटल्याने नौका भरकटली व दगडावर आदळल्याने नौकेला दांडा तरीबंदरटोका जवळ जलसमाधी मिळाली. त्या नौकेमधील बाळकृष्ण रघुवीर, जयेश रघुवीर, गणेश कुलाबकर हे समुद्राच्या पाण्याजवळ झुंज देत बालंबाल बचावले. मात्र अनिकेत रघुवीर यांची नौका लक्ष्मी व जाळी, पकडून सुमारे १२ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नौकेचे मालक अनिकेत रघुवीर आर्थिक संकटात सापडले होते. क्लिक करा आणि वाचा- सदर बुडालेली लक्ष्मी विजय नौका बाहेर काढण्यासाठी जीवना कोळीवाडा येथील येथील सर्वच मच्छीमार व भरडखोल येथील शेकडो मच्छीमार असे पाचशेहून अधिक मच्छीमार आपल्या छोट्या मोठ्या नौका घेऊन मदतीला गेले होते. जीवाची पर्वा न करता आपली बाजी लावून चार ते पाच तास अथक परिश्रम घेऊन ती नौका काढण्यात त्यांना यश प्राप्त झाले. अखेर ती नौका जीवना बंदर या ठिकाणी आणल्यानंतर ती समुद्राच्या पाण्यातून वर काढण्यासाठी शेकडो महिलांनी सहकार्य केले. त्यामुळे एका मच्छीमार बाधंवाची बुडालेली नौका कोणत्याही शासकिय मदतीविना काढून एकीच्या मेहनतीचे बळ काय असते याचे उत्तम उदाहरण मच्छिमार बांधवांनी घालून दिले आहे. क्लिक करा आणि वाचा-