Type Here to Get Search Results !

Maharashtra Times

https://maharashtratimes.com https://maharashtratimes.com/lifestyle-news/college-club/articlelist/14099388.cms mr Wed, 10 Nov 2021 12:25:58 GMT <![CDATA[ गेम डिझाइनिंग आणि डेव्हलपर क्षेत्रात करा करिअर ]]> https://maharashtratimes.com/career/college-club/game-designing-and-developer-field-know-the-complete-details-of-the-course/articleshow/87628785.cms
and Developer: आता प्रत्येक काम कॉम्प्युटर, मोबाईल आणि विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होते म्हणून आजच्या काळाला डिजिटल युग म्हटले जाते. या डिजिटायझेशनमुळे खेळ आणि खेळण्याची पद्धतही बदलली आहे. पूर्वी मुलं मित्रांसोबत रस्त्यावर किंवा घराबाहेर पार्कमध्ये गेम खेळायचे पण आजच्या काळातील मुलं मित्रांसोबत घरी बसून स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर सीओडी, जीटीए, फिफा, पब्जी किंवा डोटा सारखे गेम खेळत असतात. मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर गेम खेळण्याच्या या तंत्राला डिजिटल गेमिंग म्हणतात. डिजिटल गेमिंग खेळणाऱ्यांची संख्या जगभरात वाढतेय. म्हणूनच डिजिटल गेमिंग क्षेत्रात चांगले करिअर करण्याची संधी आहे. यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, अनुभव याची सविस्तर माहिती जाणून घ्या. गेम डिझायनिंगमध्ये सर्टिफिकेट लेव्हल कोर्स करण्यासाठी तुम्ही दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट लेव्हल कोर्स करण्यासाठी तुम्ही बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी, तुमच्याकडे कोणत्याही टेक्निकल क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे. प्रमुख अभ्यासक्रम गेमिंग इंडस्ट्रीत येण्यासाठी आजच्या काळात अनेक कोर्सेस आहेत. यातून तुम्ही तुमच्या आवडीनुसार अभ्यासक्रम निवडू शकता. सर्टिफिकेट लेव्हल कोर्सेस करायचे असतील तर गेमिंगमधील सर्टिफिकेट कोर्सेस, गेम आर्ट आणि डिझाइनमधील सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्ध आहेत. डिप्लोमासाठी डिप्लोमा इन गेम डिझाईन आणि इंटिग्रेशन, प्रोफेशनल डिप्लोमा इन गेम आर्ट, डिप्लोमा इन अॅनिमेशन, गेमिंग आणि स्पेशल इफेक्ट्स, अॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन गेम आर्ट आणि थ्रीडी गेम कंटेंट क्रिएशन यासारखे कोर्स करता येऊ शकतात. ग्रॅज्युएशनसाठी तुम्ही ग्राफिक्स, अॅनिमेशन आणि गेमिंगमध्ये बॅचलर ऑफ सायन्स (B.Sc.), डिजिटल फिल्ममेकिंग आणि अॅनिमेशनमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स (BA), कॉम्प्युटर सायन्स आणि गेम डेव्हलपमेंटमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी-टेक) हे कोर्स करु शकता. अॅनिमेशन गेम डिझाईन आणि डेव्हलपमेंटमध्ये बॅचलर ऑफ सायन्स कोर्स करता येईल. तसेच तुम्हाला या विषयांमध्ये पदव्युत्तर स्तराचा अभ्यासक्रमही मिळू शकेल. गेम डिझायनर आणि डेव्हलपरमधील करिअर गेम डिझायनिंग आणि डेव्हलपमेंट ही एक अवघड प्रक्रिया आहे. ज्यामध्ये अनेक व्यावसायिक गेम तयार करण्यासाठी एकत्र काम करतात. त्यानंतर तो गेम स्क्रीनवर पोहोचतो. कोणताही खेळ तयार करण्यासाठी अनेक प्रक्रियांचा पार पाडल्या जातात. त्यामुळे गेमिंग क्षेत्रातील प्रोफेशनल्सना नेहमीच मोठी मागणी असते. या क्षेत्रात तुम्ही गेम डिझायनर आणि डेव्हलपर म्हणून उत्तम करिअर करू शकता. लोकं ऑनलाइन गेमकडे वळत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात करिअरची नवी दारे उघडत आहेत. येथे तुम्ही अॅक्शन, स्पोर्ट्स, फॅन्टसी इत्यादी अनेक प्रकारचे गेम्स तयार करू शकता. कोरोनापासून भारतातील गेमिंग उद्योग तेजीत आला आहे. त्यामुळे गेमिंगचे चाहते किंवा चाहत्यांना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत. तुम्हाला गेम डिझायनर, गेम प्रोड्युसर, अॅनिमेटर, ऑडिओ प्रोग्रामर, ग्राफिक प्रोग्रामर आणि गेम रायटर सारख्या जॉब प्रोफाइल मिळू शकतात. पगार कोर्स पूर्ण केल्यानंतर, तुम्ही गेम डिझायनर आणि डेव्हलपर म्हणून ४ ते ५ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज सहज घेऊ शकता. त्याचबरोबर काही वर्षांच्या अनुभवानंतर तुमच्या टॅलेंटच्या जोरावर तुम्ही महिन्याला लाखो रुपये पगार घेऊ शकता. अभ्यासक्रमासाठी प्रमुख संस्था माया अकॅडेमी ऑफ अॅडव्हान्स्ड सिनेमॅटिक (MAAC), मुंबई अरेना अॅनिमेशन, नवी दिल्ली भारती विद्यापीठ, पुणे आय पिक्सिओ अॅनिमेशन कॉलेज, बंगळूर एनीमास्टर अॅकेडमी- कॉलेज ऑफ एक्सलन्स इन अॅनिमेशन, बंगळूर अॅनिमेशन आणि गेमिंग अकादमी, नोएडा झी इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह आर्ट्स, बंगळूर
]]> https://maharashtratimes.com/career/college-club/game-designing-and-developer-field-know-the-complete-details-of-the-course/articleshow/87628785.cms Sat, 21 Aug 2021 06:43:20 GMT <![CDATA[ अन्न प्रक्रिया उद्योगात 'टेस्टी' करिअर ]]> https://maharashtratimes.com/career/college-club/tips-to-choose-career-in-food-technology/articleshow/85509721.cms
आनंद मापुस्कर आंब्याचा मोसम नसताना अगदी ताजा वाटेल असा आमरस, मटारांचा मोसम नसतानाही उपलब्ध होणारा पिशवीबंद उत्तम मटार, नारळाचं दूध काढण्याच्या त्रासातून सुटका करून देणारं पॅकबंद नारळाचं दूध, अजिबात साफ करण्याची आवश्यकता नसलेले चिकन/ मटण...अशा अनेक पदार्थांनी आता स्वयंपाकघरात महत्त्वाचं स्थान मिळवलंय. आजच्या धावपळीच्या युगात स्वयंपाकासाठी मिळणारा वेळ कमी कमी होत असताना, अशा रेडी टू कूक, रेडी टू इट पदार्थांनी काम खरोखरच सुकर बनत आहे. अशात उपयुक्त अन्नपदार्थाची निर्मिती करणारं शास्त्र म्हणजे ! नाशिवंत अन्नपदार्थ टिकाऊ बनावेत या दृष्टीने त्यावर प्रक्रिया करणं. पण हे करताना अन्नपदार्थांमधली पोषणद्रव्यं, गुणवत्ता, रंग-रूप यांचंही जतन करणं ही तारेवरची कसरत कुशलतेने करणाऱ्या फूड टेक्नॉलॉजिस्टचं व्यवसाय क्षेत्र आज खूपच विस्तारलं आहे. शहरात होणाऱ्या नवनवीन मॉल्समुळे तयार बाजारपेठही निर्माण होत आहे. फक्त शहरातच नाही, तर ग्रामीण भागातही फूड टेक्नॉलॉजी हे महत्त्वाचं क्षेत्र आहे. शेतात तयार होणाऱ्या फळं, धान्य इत्यादींवर योग्य ती प्रक्रिया करून त्यांचं आर्थिक मूल्य वर्धित करणं हे फूड टेक्नॉलॉजीनेच शक्य आहे. उदाहरणार्थ, स्ट्रॉबेरी नुसतीच विकण्यापेक्षा थोडीशी साखर आणि प्रिझव्‍‌र्हेटिव्ह वापरून त्याचा जॅम, क्रश किंवा सिरप बनविल्यास तिचं आर्थिक मूल्य कितीतरी पटीने वाढतं. आपल्या शेतांमधल्या फळांवर, अन्नधान्यांवर प्रक्रिया करून असं मूल्य वाढविल्यास ग्रामीण आर्थिक व्यवस्थेवरही त्याचा निश्चितच चांगला परिणाम होईल. कृषिमालावर प्रक्रिया करणारा उद्योग हा भविष्यात वेगाने वाढणारा आणि जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणारा असेल, असे म्हटले जात आहे. त्यामागे ही सगळी पार्श्वभूमी आहे. साहजिकच फूड टेक्नॉलॉजी हा करिअरचा चांगला पर्याय ठरू पाहतो आहे. फूड टेक्नॉलॉजीचे स्वरूप : या फूड प्रोसेसिंग उद्योगामध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान तसंच अभियांत्रिकी अशा अनेक विद्याशाखांचा समन्वय आवश्यक ठरतो. या उद्योगात उत्पादन व गुणवत्ता नियंत्रण (क्वालिटी कंट्रोल) असे दोन विभाग पडतात. उत्पादनाचं काम फूड टेक्नॉलॉजिस्ट करतात. अन्नावरील प्रक्रिया ठरवून दिल्याप्रमाणे होत आहे ना, याकडे त्यांना लक्ष द्यावे लागते. याशिवाय अन्नावरील प्रक्रिया करण्याच्या तसेच प्रिझव्‍‌र्हेशनच्या नवीन पद्धती शोधणे, प्रत्यक्ष प्रक्रिया करत असताना भेसळ होत नाही ना वा अन्नपदार्थ खराब होत नाही ना, हे पाहणे हेही त्यांना करावे लागते. फूड टेक्नॉलॉजिस्टना साखर, अल्कोहोल, बेकरी, डेअरी, तेल, फळं, भाजीपाला इत्यादी क्षेत्रात स्पेशलायझेशन करता येते. गुणवत्ता नियंत्रणाचे काम केमिस्ट किंवा फूड टेक्नॉलॉजिस्ट करतात. यात कच्च्या मालाचा दर्जा तपासणे, विक्रीसाठी तयार मालाच्या नमुन्यांची चाचणी घेणे, पॅकिंग तपासणे, कारखान्यात आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे इत्यादींचा समावेश होतो. या व्यवसायात ऑरगॅनिक केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, अ‍ॅनालिटिकल केमिस्ट्री तसेच इंजिनीअरिंगच्या विविध शाखांतील तज्ज्ञांची गरज असते. फूड टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था तुलनेने कमी आहेत. बी.एस्सी. (फूड टेक्नॉलॉजी/ फूड सायन्स) किंवा बी.ई./ बी.टेक्. (फूड टेक्नॉलॉजी/ फूड सायन्स) आदी अभ्यासक्रमांसाठी १२ वी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक असते.
]]> https://maharashtratimes.com/career/college-club/tips-to-choose-career-in-food-technology/articleshow/85509721.cms Tue, 27 Jul 2021 05:02:49 GMT <![CDATA[ प्रवेशाचे 'इंजिनीअरिंग': अभियांत्रिकीला प्रवेश घेण्याआधी 'ही' तयारी नक्की करा ]]> https://maharashtratimes.com/career/college-club/engineering-admission-2021-students-should-prepare-before-admission/articleshow/84784333.cms
- डॉ. श्रीराम गीत इंजिनीअर होणे हे सध्या कधी नव्हे इतके सोपे झाले आहे. त्यात येत्या काळातील येऊ घातलेल्या बदलांमुळे अधिकाधिक सोपेपण येणार आहे; मात्र इंजिनीअर झाल्यावर () काय करायचे, या प्रश्नाचे उत्तर सापडणे जास्तच कठीण होत चालले आहे. या साऱ्यावर नेमकेपणाने; पण गांभीर्याने आपण या आठवड्यात माहिती करून घेणार आहोत. मी लिहित असलेली कोणतीही बाब पालकांनी व विद्यार्थ्यांनी किमान तीन व्यक्तींकडून जरूर तपासून घ्यावी, ही विनंती. अखेरच्या वर्षात शिकणारी त्याच शाखेतील विद्यार्थी/विद्यार्थिनी ही पहिली व्यक्ती. तिच्याकडून महाविद्यालय, अभ्यासक्रम, अडचणी, कॅम्पस प्लेसमेंट, अध्यापक या साऱ्याची किमान माहिती नक्की मिळते. ज्या शाखेत आपल्याला प्रवेश घ्यावासा वाटतो, त्या शाखेतून पास झालेला आणि सध्या नोकरी/व्यवसाय करीत असलेला इंजिनीअर ही दुसरी व्यक्ती. येथे 'काम करणारा इंजिनीअर' असे मुद्दाम नमूद करीत आहे. 'जीआरई'ची तयारी करणारा (GRE), एमबीए प्रवेश परीक्षेसाठी (MBA) क्लास लावलेला किंवा 'गेट'ची (GATE) तयारी करणारा, अशा पदवीधराशी ही चर्चा नको; कारण यातील सारेच तुम्हाला सहज उपलब्ध होतील! गेल्या आठवड्यात कम्प्युटरबद्दल लिहिलेच होते. त्या शाखेची पदवी घेऊनही लाखभर रुपये फी भरून सीडॅक, एम्बेडेड, सायबर सिक्युरिटी आदी कोर्स करणारे सहज भेटतात. आपण भेटले पाहिजे, अशी तिसरी व्यक्ती म्हणजे आपण शिक्षण घेत असलेल्या शाखेत पाच-सहा वर्षे अध्यापन करत असलेले शिक्षक. ही व्यक्ती कदाचित घडाघडा किंवा कदाचित हात राखून माहिती देईल. इंजिनीअरिंगची पदवी हाती आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात काम करण्याचे स्वप्न फार कमी लोकांना पडते, असा माझा गेल्या काही वर्षांतील करिअर कौन्सेलिंगचा अनुभव सांगतो; मात्र या व्यक्तींकडून त्या क्षेत्रातील संधींबद्दल अगदी खरी माहिती मिळेल, हे नक्की. ज्यांना इंजिनीअर व्हायचे आहे, नंतर अमेरिकेत जायचे आहे किंवा जमले, तर आयटीत शिरायचे आहे, त्यांनी या सर्व खटाटोपाला पूर्णविराम द्यावा; कारण त्यांच्यासाठी सीईटी, कॉलेजात प्रवेश, हातातील पदवी, जीआरईचा क्लास आणि एमएससाठी परदेशी प्रयाण असा सरळसोट रस्ताच उपलब्ध असतो. शेवटचे; पण अत्यंत महत्त्वाचे म्हणजे जे खरोखर तैलबुद्धीचे व अत्यंत हुशार, अभ्यासू आहेत, त्यांनीच केवळ पदवी शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा विचार करावा. ज्या पालकांकडे खर्च करण्याची मोठी ताकद आहे, असे सोडून अन्य विद्यार्थ्यांसाठी तो रस्ता धोक्याचा ठरू शकतो. (लेखक ज्येष्ठ करिअर काऊन्सेलर आहेत.)
]]> https://maharashtratimes.com/career/college-club/engineering-admission-2021-students-should-prepare-before-admission/articleshow/84784333.cms Sat, 24 Jul 2021 07:31:15 GMT <![CDATA[ करिअरमधील 'मिक्स अँड मॅच' ]]> https://maharashtratimes.com/career/college-club/career-tips-mix-and-match-combo-in-career-courses/articleshow/84707313.cms
सुचित्रा सुर्वे, ग्रोथ सेंटर एका विषयात पदवी शिक्षण घेतलेले दुसऱ्याच क्षेत्रात कार्यरत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. जसे की, बीए (इतिहास), कम्प्युटर कोर्स केलेले एखाद्या कंपनीच्या एचआर विभागात कार्यरत आहेत किंवा प्राणीशास्त्रातील बीएससी पदवी आणि एखाद्या कंपनीच्या विपणन विभागात काम करतात. सध्या 'मिस अँड मॅच'चा ट्रेंड वाढताना दिसत आहे. पण या सगळ्यात एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे आपले दुर्लक्ष होते आहे, तो म्हणजे नोकरीच्या क्षेत्राशी पूर्णपणे किंवा अंशतः संबंधित कोर्सचा अभ्यास करण्यास काय हरकत आहे? लक्षात घ्या, इथे मी जॉब-ओरिन्टेड कोर्सबाबत बोलत नसून अशा 'इंटर-रिलेटेड' किंवा 'कॉम्बिनेशन' कोर्सेसबाबत बोलत आहे. यामुळे स्पर्धात्मक काळात दुसऱ्यांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्यास मदत होईल. असे हे 'इंटर-रिलेटेड' किंवा 'कॉम्बिनेशन' कोर्स करण्याचे विविध फायदे समजून घेऊ या... ० स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी... केवळ पदवीवर उत्तम नोकरी मिळवण्याचा काळ राहिलेला नाही. लक्षात घ्या, सध्याची वाढती लोकसंख्या बघता आणि स्वतःचे वर्चस्व, अस्तित्व टिकवण्यासाठी बऱ्याच कंपन्यांनी हायर अँड फायर या धोरणाचा स्वीकार केलेला आहे. अशा परिस्थितीत एकाच क्षेत्रात पारंगत असलेल्या व्यक्तींपेक्षा बहु-प्रतिभावान व्यक्ती टिकून राहण्याची शक्यता अधिक आहे. उदाहरणार्थ, सध्या कम्प्युटरचे ज्ञान हे अतिरिक्त शैक्षणिक पात्रता म्हणून पाहिले जात नाही. पण कोणत्याही उद्योगात ती आवश्यक पात्रता आहे. - कामाशी संबंधित नसलेल्या विषयाचा अभ्यास करण्यापेक्षा इंटर-रिलेटेड विषय/कोर्स नेहमीच फायदेशीर ठरतो. - आधी नमूद केल्याप्रमाणे घेतलेले शिक्षण आणि त्या शिक्षणाचा संबंध नसलेल्या क्षेत्रात काम करण्यापेक्षा इंटर-रिलेटेड कोर्स हे यशस्वी कारकीर्द बनवण्याचा मार्ग नक्कीच सोपा करतात. - एका विषयातील ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या विषयाच्या पायाबांधणीसाठी होतो. इंटर-रिलेटेड कोर्सचा अजून एक फायदा म्हणजे एका विषयातील ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या विषयात करता येतो. जसे की, भाषेवरील प्रभुत्व (उदारणार्थ, मराठी भाषा) आणि पत्रकारितेचा अभ्यासक्रम एकमेकांना पूरक आहे. कारण भाषेचा पाया मजबूत असल्यामुळे पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाशी जुळवून घेणे अधिक सोपे होते. अशा प्रकारे एका कोर्सचे ज्ञान दुसऱ्या कोर्सच्या कामकाजात सहजपणे लागू केले जाते. 'जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ वन' ही म्हण सगळ्यांच्या परिचयाची असेल. पण आजच्या अटीतटीच्या स्पर्धेत जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ वनची गरज अधिक आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सखोल ज्ञान असल्यामुळे वस्तुनिष्ठ विश्लेषण, योग्य नियोजन आणि उत्तम कामगिरी करण्याची शक्यता अजून वाढते. विषय, उद्योग, ग्राहकांचा कल याबाबत सखोल ज्ञान असल्यामुळे व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळीवर भरभराट होण्यास मदत होतेच, पण त्याचबरोबर निष्काळजीपणा, तक्रारी, गैरजसमजदेखील कमी होण्यास मदत होते. ० दुसऱ्यांपेक्षा 'भिन्न' आणि 'ज्ञात' असणे इंटर-रिलेटेड कोर्स केल्याचे संभाव्य फायदे आपण वरती पाहिलेच. याशिवाय अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा व्यक्तींना त्या क्षेत्रातील गुंतागुंतीच्या गोष्टी तसेच त्यांचे निराकरण करणे सहज जमते. हाच गुणधर्म त्यांना दुसऱ्यांपेक्षा 'भिन्न' आणि 'ज्ञात' बनवतो आणि याचा फायदा त्यांच्या करिअर कारकिर्दीत होतो. केवळ ट्रेंडचा पाठपुरावा करून कोर्स करण्यापेक्षा तुमची बुद्धिमता, रुची, कार्यक्षेत्र इत्यादींचा विचार करून अशा कोर्सची निवड करा. ज्याचा तुम्हाला दीर्घकाळ फायदा होईल, पण त्याचबरोबर कंपनीत किंवा उद्योगात तुमचे वेगळे स्थान निर्माण होण्यास मदत होईल.
]]> https://maharashtratimes.com/career/college-club/career-tips-mix-and-match-combo-in-career-courses/articleshow/84707313.cms Mon, 14 Jun 2021 03:51:33 GMT <![CDATA[ Engineering Admission: १२ वी नंतर इंजिनीअरिंग करायचेय? सर्व माहिती जाणून घ्या.... ]]> https://maharashtratimes.com/career/college-club/engineering-admission-all-you-need-to-know-about-engineering-admissions-in-maharashtra/articleshow/83503838.cms
डॉ. दिनेश भुतडा राज्यात तीनशेहून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये ( college) आहेत आणि सत्तरपेक्षा जास्त शाखा प्रवेशाकरीता उपलब्ध आहेत. ही प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलच्या माध्यमातून सीईटी व जेईई-मेनच्या (CET, JEE Main) पर्सेंटाइल गुणांवर आधारित असते. ही प्रक्रिया ( 2021) मागील वर्षी संपूर्णपणे ऑनलाइन राबविण्यात आली होती. या प्रवेश प्रक्रियेचे तीन प्रमुख टप्पे म्हणजे एमएचटी-सीईटीचा निकाल (MHT CET Result) आल्यानंतर रजिस्ट्रेशन, कागदपत्र छाननी (डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन) आणि तिसरा टप्पा म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या फेरीकरता ऑप्शन फॉर्म भरणे (विकल्प नोंदविणे). मागील वर्षी कोव्हिडमुळे संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन व घरूनच करता येईल, अशी व्यवस्था सरकारने सीईटी सेलद्वारे केली होती. बहुधा या वर्षीसुद्धा ती पूर्णपणे ऑनलाईन होऊ शकते. यामध्ये दोन फेऱ्या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. शेवटची फेरी ही रिक्त जागांकरिता महाविद्यालय स्तरावर घेण्यात आली होती. जेईई-मेनच्या माध्यमातून राज्याच्या खासगी महाविद्यालयांमध्ये पंधरा टक्के कोटा असतो व एमएचटी-सीईटी च्या माध्यमातून राज्याच्या खासगी महाविद्यालयांमध्ये ८५ टक्के जागा भरल्या जातात. राज्यातील सरकारी किंवा सरकारी स्वायत्त (ऑटोनॉमस) महाविद्यालयांचे प्रवेश, हे प्रामुख्याने एमएचटी-सीईटीच्या माध्यमातून १०० टक्के होतात. उदाहरणादाखल सीओईपी, पुणे येथे शंभर टक्के जागा या एमएचटी-सीईटीच्या माध्यमातूनच भरल्या जातात. तेथे 'जेईई मेन'साठी कोटा नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी; तसेच प्रक्रियेकरीता आरक्षणाचे सर्व नियम लागू आहेत. शिवाय 'होम युनिव्हर्सिटी' (एचयू) व 'अदर दॅन होम युनिव्हर्सिटी'च्या (ओएचयू) माध्यमातून जागा भरल्या जातात. उदाहरणार्थ पुणे, नगर व नाशिक येथील विद्यार्थ्यांकरीता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये ७० टक्के जागा राखीव असतात. नागपूर, कोल्हापूर, नांदेड, जळगाव, मुंबईमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत ३० टक्के जागा उपलब्ध असतात. स्वाभाविकच ३० टक्क्यांच्या जागांमध्ये स्पर्धा जास्त असते. नोंदणी प्रक्रियेमध्ये सर्व कागदपत्रे आपल्या प्रवर्गाप्रमाणे; तसेच अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल) हे प्रामुख्याने महत्त्वाचे असतात व ते आपल्याला अपलोड करायला लागतात. छाननी प्रक्रियेत जर काही कमतरता आढळल्यास आपणास 'लॉगिन'मधून त्याविषयी माहिती देण्यात येते. यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे गुणवत्ता यादी. अनेक प्रकारचे गुणवत्ता (मेरीट) क्रमांक आपल्याला लॉगिनमधून पाहायला मिळतात व त्यानंतर आपल्याला पहिल्या फेरीसाठी पर्याय नोंदविण्याची म्हणजेच 'ऑप्शन फॉर्म' भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. 'जेईई मेन' व 'एमएचटी-सीईटी'च्या माध्यमातून एकच ऑप्शन फॉर्म भरावयाचा असतो व आपण ३०० पर्याय तिथे नोंदवू शकतो. 'सीओईपी'मधील 'कम्प्युटर सायन्स' हा एक पर्याय, असे अनेक पर्याय आवडीनुसार उतरत्या क्रमात आपण या फॉर्ममध्ये नोंदवू शकतो. मागील वर्षी 'एमएचटी-सीईटी'ची परीक्षा सप्टेंबरमध्ये झाल्याने ही प्रवेश प्रक्रिया खूप लांबली होती व या वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत ती सुरू होती. २०२१ मध्ये ही प्रवेश प्रक्रिया एमएचटी-सीईटीचा निकाल आल्यानंतर सुरू होणे अपेक्षित आहे. सरकारी शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती घेऊन वेळीच त्या कागदपत्रांसाठी अर्ज करणे शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी उपयुक्त ठरेल. देशातील खासगी विद्यापीठांमधील प्रक्रिया भारतात अनेक खासगी विद्यापीठांतून अभियांत्रिकीचे शिक्षण दिले जाते. यात प्रामुख्याने बिट्स पिलानी, व्हीआयटी वेल्लोर, एसआरएम, मणिपाल या विद्यापीठांचा समावेश होतो. या सर्व विद्यापीठांद्वारे त्यांची वैयक्तिक प्रवेश प्रक्रिया; तसेच फेऱ्या घेण्यात येतात. त्यापैकी बऱ्याच सध्या सुरू आहेत किंवा त्यांची दुसरी फेरी होणार आहे. या प्रवेश प्रक्रियांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे या विद्यापीठांच्या विविध कॅम्पस; तसेच उपलब्ध शाखांचे पर्याय नोंदवावे लागतात. त्या माध्यमातून मिळालेल्या पर्यायासाठी नोंदणी करून प्रवेश निश्चित करण्यात येतो. या विद्यापीठांचे स्थळ, शुल्क, प्लेसमेंट तसेच तेथे असणारी भाषा, संस्कृती, खाद्यसंस्कृती, हॉस्टेल व इतर सुविधा या सर्वांचा सारासार विचार करून निर्णय घेता येऊ शकतो. महाराष्ट्रातील व या विद्यापीठांमधील पर्याय यात तुलना करून निर्णय घ्यायला हवा. हेही वाचा: राज्यातील प्रक्रिया अनेक नामांकित संस्थांना २०१७ नंतर राज्य सरकारतर्फे खासगी विद्यापीठांचा दर्जा देण्यात आला. यात राज्यातील एकोणवीस खासगी विद्यापीठांचा सहभाग आहे. अनेक विद्यापीठांच्या माध्यमातून अभियांत्रिकीचे शिक्षण देण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र सीईटी, जेईई मेन; तसेच खासगी विद्यापीठांची स्वतंत्र सीईटी (उदा. डब्ल्यूपीयू एमईईटी, सेट इ.) व सर्व खासगी विद्यापीठांची एकत्रित 'पेरा सीईटी' अशा अनेक पर्यांयामधून प्रवेश देण्यात येतो. या खासगी विद्यापीठांच्या प्रवेशासाठी त्यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या प्रवेशप्रक्रियेसाठी त्यांच्या वेबसाइटवर वेगळी नोंदणी करणे गरजेचे असते. सीईटी सेलच्या माध्यमातून ही प्रवेश प्रक्रिया होत नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी; तसेच या विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रिया या सरकारच्या प्रवेश प्रक्रियेच्या आधी होतात, त्यामुळे त्यांच्या संकेतस्थळावर वेळापत्रकावर लक्ष देणे गरजेचे असते. एकूणच अभियांत्रिकीसाठी उपलब्ध पर्यांयांपैकी योग्य निवड केल्यास यश संपादन करणे शक्य होऊ शकते. (लेखक एमआयटी विश्वशांती विद्यापीठामध्ये सहयोगी प्राध्यापक आहेत.)
]]> https://maharashtratimes.com/career/college-club/engineering-admission-all-you-need-to-know-about-engineering-admissions-in-maharashtra/articleshow/83503838.cms Thu, 20 May 2021 04:17:38 GMT <![CDATA[ विद्यार्थ्याने टिपले ५० हजार फ्रेम्समधून चंद्राचे सुस्पष्ट छायाचित्र! ]]> https://maharashtratimes.com/career/college-club/pune-boy-prathamesh-jaju-captures-the-clearest-picture-of-moon-by-processing-50000-images-photo-goes-viral/articleshow/82791490.cms
म. टा. प्रतिनिधी, पुणे पुण्यातील सोळा वर्षीय या विद्यार्थ्याने ५० हजार फ्रेम वापरून काढले आहे. या छायाचित्रात दिसणारी विवरे, पठारे, दऱ्यांसह विविधरंगी खनिजांनीयुक्त चंद्राचा भूप्रदेश पाहून प्रथमेशवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रथमेशने विद्या भवन हायस्कूलमधून नुकतीच दहावी पूर्ण केली असून, तो पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा सभासद आहे. गेली तीन वर्षे संस्थेमध्ये तो खगोलीय छायाचित्रणाचे प्रशिक्षण घेत आहे. संस्थेचा पाच इंची व्यासाचा सेलेस्ट्रॉन टेलिस्कोप आणि झेडडब्ल्यूओ एएसआय १२० एमसी या सीसीडी कॅमेराच्या साह्याने त्याने कौतुकाचा विषय ठरलेले चंद्राचे छायाचित्र काढले आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना प्रथमेश म्हणाला, 'चंद्रावरील तपशील स्पष्ट दिसावेत यासाठी एका छायाचित्राऐवजी अनेक छायाचित्रांच्या एकत्रिकरणातून चंद्राचे एक स्पष्ट छायाचित्र विकसित केले आहे. त्यासाठी टेलिस्कोप आणि सीसीडी कॅमेराच्या साह्याने चंद्राच्या विविध ३८ भागांचे आणि प्रत्येकी सुमारे दोन हजार फ्रेम्स असलेले चार तासांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. या रेकॉर्डिंगमधून ५० हजार चांगल्या फ्रेम्स निवडून त्यांतून चंद्राच्या ३८ विविध भागांची छायाचित्रे तयार केली. या ३८ छायाचित्रांना एकत्र जोडून चंद्राचे अखंड आणि तपशीलवार छायाचित्र तयार झाले. चंद्राचे एक छायाचित्र बनवण्यासाठी सुमारे १८६ जीबीच्या छायाचित्रांचा डेटा वापरण्यात आला असून, सॉफ्टवेअरमध्ये त्याच्यावर प्रक्रिया होऊन एक छायाचित्र तयार होण्यासाठी सलग ४० तासांचा कालावधी लागला. मात्र, या सर्व प्रयत्नांतून तयार झालेला फोटो पाहून खूप आनंद झाला. या छायाचित्रात चंद्राच्या पृष्ठभागावरील बारीकसारीक तपशील तर दिसत आहेतच; पण साध्या डोळ्यांना न जाणवणारे चंद्रावरील विविध रंगांचे भूप्रदेशही दिसत आहेत.' प्रथमेशने चंद्राचे हे छायाचित्र 'रेडिट' आणि 'इन्स्टाग्राम'वर पोस्ट केले आणि लगेचच ते जगभर व्हायरल झाले. अनेक खगोलशास्त्रज्ञ आणि छायाचित्रकारांनी या छायाचित्रासाठी प्रथमेशचे कौतुक केले आहे. माध्यमांनीही चंद्राच्या या अनोख्या छायाचित्राला मोठी प्रसिद्धी दिली. चंद्राचे छायाचित्र काढण्यासाठी ज्योतिर्विद्या परिसंस्थेतील वरिष्ठ सभासदांसोबत जगभरातील अनेक खगोलीय छायाचित्रकारांचे मार्गदर्शन लाभल्याचे प्रथमेशने सांगितले. खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रातच करिअर करायची प्रथमेशची इच्छा आहे.
]]> https://maharashtratimes.com/career/college-club/pune-boy-prathamesh-jaju-captures-the-clearest-picture-of-moon-by-processing-50000-images-photo-goes-viral/articleshow/82791490.cms Wed, 21 Apr 2021 05:04:44 GMT <![CDATA[ करिअरच्या पर्यायांचा करा विचार ]]> https://maharashtratimes.com/career/college-club/ssc-exam-cancelled-2021-students-should-study-different-career-options/articleshow/82227240.cms
सुचित्रा सुर्वे, मागील वर्षापासून अनेक गोष्टी झपाट्याने बदलत आहेत आणि प्रत्येक जण 'न्यू नॉर्मलशी' आपापल्यापरीनं जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेक पिढ्यांची प्रार्थना खरी ठरावी आणि विद्यार्थ्यांना काहीशी दिलासादायक बातमी मिळावी ती म्हणजे रद्द झालेल्या परीक्षा! अनिश्चितता आणि तारखांमधील सततच्या बदलांमुळे 'बोर्ड एक्साम्सच्या' गांभीर्यापेक्षा 'बोअर्ड ऑफ एक्साम्स' अशी काहीशी विद्यार्थ्यांची मनस्थिती निर्माण झाली आहे. खरंच परीक्षेची किती तयारी झाली आहे यापेक्षा लवकरात लवकर परीक्षा देऊन टाकू, जेणेकरून अभ्यास करायचा की नाही करायचा हा गोंधळ तरी संपेल असं जवळजवळ प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असेल. या बदलाची सुरुवात केवळ एका बोर्डाच्या निर्णयानं जरी झालेली असली तरी बोर्ड परीक्षा रद्द होण्याची कल्पना वास्तवात येईल असं खरंच कोणाला वाटलं नव्हतं. या निर्णयामुळे विद्यार्थ्यात स्वातंत्र्याची भावना निर्माण झाली. तसंच ताबडतोब पुस्तकांची जागा गॅजेट्सनी घेतली. पुढील प्रवेशप्रक्रिया कशी आणि कधी होणार, सध्याच्या लॉकडाउनमुळे मुलांना गॅजेटमुक्त वातावरणात कसं ठेवलं पाहिजे इत्यादी विचारांनी पालकांच्या चिंतेत आणखी भर पडली. संख्या जरी लहान असली तरी या लॉकडाउनच्या काळात देखील शिस्तबद्ध जीवन व्यतीत केलेल्या, मौजमजा करण्यापेक्षा आपली स्वप्नं साकार करण्यासाठी अभ्यासाची चांगली तयारी करणाऱ्या विदयार्थ्यांना हा निर्णय अनुचित वाटला असेल. उत्तम कामगिरी करण्याची संधी अशी अचानक हिरावून घेतल्यामुळे निराशाजनक वाटणं स्वाभाविक आहे. तेव्हा आपले सगळे प्रयत्न वाया गेले असा विचार करण्यापेक्षा आपली आधीच तयारी झाली आहे असा विचार करा. दुसरीकडे परीक्षा अचानक रद्द केल्यामुळे कमी झालेला ताण, उत्तम कामगिरी करण्याचं ओझं उतरल्यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पण लक्षात घ्या ही केवळ एकच परीक्षा रद्द झालेली असून ज्या संकल्पनांची तुमची पुरेशी तयारी झाली नाही अशा संकल्पना पुढे कधीच उपयुक्त ठरणार नाहीत असं नाही. त्यामुळे रद्द झालेल्या परीक्षांच्या परिणामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू नका. परीक्षांकडे जीवनात पुढे घेऊन जाणाऱ्या चरणापेक्षा केवळ उत्तम कामगिरी करणं महत्त्वाचं आहे या दृष्टिकोनातून पहिलं जातं, मनावर कायम बिंबवलं जातं. याचा परिणाम म्हणजे भीती, यश, अपयश, दबाव, तणाव इत्यादी जणूकाही परीक्षा या संकल्पनेचे समानार्थी शब्द बनले आहेत. गुणांच्या चढाओढीमुळे वर्षभर शिकलेले विविध विषय, संकल्पना यावर एखाद्याचे प्रभूत्व किती आहे हे सिद्ध करण्याचं साधन म्हणून परीक्षांकडे पाहण्यास कधीही प्रोत्साहित केलं गेलं नाही. लक्षात घ्या, संकल्पना किती समजली आणि पुढील स्तरावरील अभ्यास करण्यास विद्यार्थी किती तयार आहेत हे समजून घेण्यासाठी परीक्षा हे नक्कीच प्रभावी साधन आहे. म्हणूनच करिअरचा पाया घालण्यासाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम शिकण्याची आपली किती तयारी झाली आहे हे विद्यार्थ्यांनी अत्यंत बारकाईने तसेच वस्तूनिष्ठपणे समजून घेणे आवश्यक आहे. ज्यांची अजूनही विषयांची नीट तयारी झालेली नाही अशा विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, भविष्यात परीक्षा आयोजित केल्या जातील तसेच तुम्ही आत्तापर्यंत जे काही शिकलात त्याचा परिणाम पुढील शिक्षणावर होणार आहे. परीक्षा रद्द झाल्यामुळे आनंदी वाटणं साहजिक आहे पण यामुळे शिक्षणाचं महत्त्व कमी होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. काही कालावधीनंतर पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात करा, पुढील करिअरसाठी आवश्यक पावलं उचला. छोटासा ब्रेक घेणं योग्य आहे, पण शक्य तितक्या लवकर विविध गोष्टी शिकण्याच्या मार्गावर परत जा. लक्ष केंद्रित करा. तुम्हाला तुमच्या कारकिर्दीबद्दल विचार करण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे. तेव्हा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अधिक पर्याय आजमावून बघा. स्वत:ला अधिक जाणून घ्या आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी योजना आखा. लक्षात ठेवा, केवळ परीक्षा रद्द झाल्या आहेत, शिक्षण आणि शिकणं नाही!
]]> https://maharashtratimes.com/career/college-club/ssc-exam-cancelled-2021-students-should-study-different-career-options/articleshow/82227240.cms Thu, 22 Apr 2021 14:58:30 GMT <![CDATA[ विद्यार्थ्यांना कॉलेज, विद्यापीठात लस; ३६ लाख विद्यार्थ्यांना लाभ ]]> https://maharashtratimes.com/career/college-club/vaccination-students-will-be-get-covid-vaccine-in-universities-and-colleges-says-uday-samant/articleshow/82227234.cms
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशातील १८ पेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नागरिकांना दिनांक १ मे पासून लस () दिली जाणार आहे. यात राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या सुमारे ३६ लाख ८७० विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि कॉलेजांमध्ये लस दिली जाईल असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत () यांनी सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांना लसीकरण दिलासा मिळणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंसोबत कॉलेज आणि विद्यापीठीय परीक्षांबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनुसार राज्यातील १८ वर्षावरील नागरिकांना लास देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ज्याची अंमलबजावणी १ मे पासून होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता १८ वर्षावरील विद्यार्थ्यांना लस मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेऊन हे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असे सामंत यांनी सांगितले. शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्यात येणार असून याबाबत येत्या १५ दिवसात निर्णय घेण्यात येईल. सर्व परीक्षा घेत असताना एकही विद्यार्थी करोना बाधित होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येईल. विद्यार्थ्यांचे आरोग्य हे सर्वांच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे, असेही ते यावेळी म्हणाले. उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, तंत्रशिक्षण संचालक अभय वाघ, सीईटी सेल आयुक्त चिंतामणी जोशी, कला संचालक राजीव मिश्रा, सर्व अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू व संबंधित उपस्थित होते.
]]> https://maharashtratimes.com/career/college-club/vaccination-students-will-be-get-covid-vaccine-in-universities-and-colleges-says-uday-samant/articleshow/82227234.cms Sat, 24 Apr 2021 04:35:34 GMT <![CDATA[ NSS विद्यार्थी बनला कोविड रुग्ण आणि कुटुंबांसाठी देवदूत ]]> https://maharashtratimes.com/career/college-club/nss-student-at-dahisar-started-covid-helpline-to-help-corona-patients-and-quarantined-families/articleshow/82227226.cms
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई दहिसर येथील ठाकूर रामनारायण कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकणारा आणि राष्ट्रीय सेवा योजनेचा (एनएसएस) विद्यार्थी गोपाल रायठठ्ठा या विद्यार्थ्याने संपूर्ण मुंबई महानगर परिक्षेत्रासाठी एक हेल्पलाइन सुरू केली आहे. या माध्यमातून जेवणाचे डबे पोहोचवण्यापासून ते ऑक्सिजनची उपलब्धता करून देण्याची सुविधा पुरविण्यात येते. यामुळे अल्पावधीतच या विद्यार्थ्याचा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे. मागील वर्षी करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला तेव्हा मुंबई विद्यापीठाच्या एनएसएसच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सहभागी असणारा गोपाल हा 'माय ग्रीन सोसायटी' या पर्यावरणावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचा कार्यकर्ताही होता. त्यावेळी लोकांना वेगवेगळ्या स्तरावर मदत करताना त्याला आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्यांना असे जाणवले की लोकांना एकच नाही तर अनेक समस्या आहेत. त्यावर आपण काही उपाय काढणे आवश्यक आहे. यातून त्यांनी सुरुवातीला गृह विलगीकरणात असलेल्यांना जेवण पुरविण्याची सुविधा सुरू केली. त्यासाठी फोन करणाऱ्यांकडून कधी औषधे, कधी प्लाझ्मा इतर गोष्टींची मागणी होऊ लागली. मग 'माय ग्रीन सोसायटी' आणि गोपालच्या पुढाकाराने विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे एक पॅनल तयार करण्यात आले. शिवाय विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली. यात डॉक्टर, प्लाझ्माविषयी ज्ञान असलेले तज्ज्ञ अशांचा समावेश आहे. यातून विविध संस्थांच्या माध्यमातून निधी उभारून एक हेल्पलाइन सुरू करण्यात आली. या हेल्पलाइनवर तुम्ही फोन केला असता तुम्हाला जी सेवा हवी आहे तो क्रमांक निवडायचा. यानंतर तुम्हाला संस्थेतून फोन येतो आणि तुमची मागणी पुरविली जाते. 'सध्या दिवसाला ३०० ते ४०० फोन येत असून यामध्ये ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे', असे गोपाल सांगतो. ती मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. शुक्रवारी संस्थेच्या माध्यमातून मिरा-भाईंदर पालिकेला जम्बो ऑक्सिजन सिलिंडर पुरविण्यात आले. आज, शनिवारी सेव्हन हिल्स रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर पुरविण्यात येणार असल्याचे गोपालने सांगितले. 'एनएसएसमध्ये काम करत असताना निर्माण झालेल्या सामाजिक जाणीवेतून आम्ही हे सर्व उभे केले आहे. आम्हाला आणखी मोठा पल्ला गाठायचा असून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायचे आहे', अशी इच्छा देखील त्याने व्यक्त केली. सरकारी योजनांबाबत मार्गदर्शन रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी वारंवार फोन येत असतात. सुरुवातीला आम्ही जिथे उपलब्ध आहेत तेथून रुग्णापर्यंत पोहोचवत होतो. मात्र आता नवीन नियमांनुसार रुग्णालयात रुग्णाला ते कसे मिळवता येऊ शकतात? रुग्णालय प्रशासनाला काय ई-मेल पाठवावा? याबाबतचे मार्गदर्शन केले जात असल्याचे त्याने सांगितले. शिवाय इतर सरकारी योजनांबाबतही मार्गदर्शन केले जात असल्याचे गोपाल म्हणाला. हेल्पलाइन क्रमांक : ०२२-४१६६७४६६ हेही वाचा:
]]>
https://maharashtratimes.com/career/college-club/nss-student-at-dahisar-started-covid-helpline-to-help-corona-patients-and-quarantined-families/articleshow/82227226.cms
Tue, 16 Feb 2021 06:36:09 GMT <![CDATA[ अकरा महिन्यांनी गजबजली राज्यातील महाविद्यालये ]]> https://maharashtratimes.com/career/college-club/colleges-reopend-in-maharashtra-after-almost-11-months-gap-during-corona-outbreak/articleshow/80981388.cms
म. टा. प्रतिनिधी, पुणे अकरा महिन्यांच्या कालावधीनंतर सोमवारी शहरातील महाविद्यालयांचे आवार पुन्हा विद्यार्थ्यांमुळे गजबजले. सुरक्षेचे निकष पाळत दीर्घकाळानंतर प्राध्यापक, मित्र-मैत्रिणींशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. वाणिज्य आणि कला शाखेच्या तुलनेत विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती अधिक होती. दरम्यान, प्राध्यापक- कर्मचाऱ्यांनी करोना चाचणी पूर्ण न झाल्याने काही महाविद्यालये अद्याप सुरू झालेली नाहीत. करोनासंदर्भातील नियम पाळून सुरुवातीला नववी ते बारावी आणि नंतर पाचवी ते सातवीच्या शाळाही सुरू करण्यात आल्या. मात्र, महाविद्यालये बंदच असल्याने किमान प्रात्यक्षिकांसाठी तरी ती सुरू करा, अशी आग्रही भूमिका ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सातत्याने लावून धरली. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही जानेवारी महिन्यातच महाविद्यालये सुरू करण्याची तयारी केली होती. मात्र, उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आदेशामुळे ही तारीख पुढे गेली. शेवटी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार आणि महापालिकेच्या परवानगीनंतर सोमवारपासून पुण्यातील महाविद्यालये अखेर खुली झाली. करोनाचे संकट कायम असल्याने पन्नास टक्के विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश देण्याची मुभा आहे. त्यानुसार महाविद्यालयांनी चक्रवार नियोजन केले आहे. अभ्यासक्रमातील ‘थिअरी’चा भाग ऑनलाइन पद्धतीने शिकवून झाल्याने सुरुवातीच्या टप्प्यात प्रात्यक्षिकांवर भर देण्यात आला आहे. सुरुवातीला पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना बोलविण्यात आले असून, त्यानंतर टप्याटप्याने अन्य अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. करोनाचे संकट कायम असल्याने महाविद्यालयांना मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करणे बंधनकारक आहे. त्यानुसार महाविद्यालयातील वावराविषयी विद्यार्थी आणि पालकांना ऑनलाइन मिटिंगद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. सोमवारी प्रवेशद्वारापाशी शारीरिक तापमानाची नोंद घेऊन, ऑक्सिजनची पातळी तपासून, मास्क लावलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला. महाविद्यालयाच्या आवारात सुरक्षित वावरासाठी पट्टे आखण्यात आले असून, सॅनिटायझरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर एक आड एका बाकावर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. अशा नवसाधारण वातावरणातच सोमवारी महाविद्यालयांचा पहिला तास रंगला.
]]>
https://maharashtratimes.com/career/college-club/colleges-reopend-in-maharashtra-after-almost-11-months-gap-during-corona-outbreak/articleshow/80981388.cms
Tags

You may like these posts

Show more

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

ADVERTISEMENT