Type Here to Get Search Results !

Maharashtra Times

 

Careers News in Marathi: Latest Career Updates in Marathi | Maharashtra Times https://maharashtratimes.com/career/career-news/articlelist/2499216.cms Career News and Marathi Employment News in Marathi Language from Maharashtra Times mr Thu, 27 Jan 2022 07:38:50 GMT <![CDATA[ बुलडाण्यात खळबळ; शाळा सुरू होण्यापूर्वीच २२ शिक्षकांना एकाचवेळी करोनाची लागण ]]> https://maharashtratimes.com/career/career-news/22-teachers-found-positive-in-buldhana-school/articleshow/89152456.cms
बुलडाणाः राज्यात करोना संसर्गाचा कहर अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळं राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. तसंच, करोना संसर्ग पाहता शाळा देखील ऑनलाइन घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. मात्र, स्थानिक परिस्थितीनुसार शाळा पुन्हा सुरु करण्याचे होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. मात्र, त्यापूर्वीच बुलडाणा जिल्ह्यातील एका शाळेत २२ शिक्षकांना करोनाची लागण झाली आहे. एकाच शाळेतील २२ शिक्षकांना करोनाची लागण झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगावमधील अरजण खिमजी शाळेतील २२ जणांना एकाच वेळी करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळं शाळेतील विद्यार्थ्यांसह पालकांचेही टेन्शन वाढलं आहे. एकाच वेळी २२ जणांना करोनाची लागण झाल्यामुळं शाळा प्रशासनाच्याही चिंतेत वाढ झाली आहे. या २२ शिक्षकांबरोबरच आणखी कोणाला करोनाची बाधा झालीये का हे तपासण्यासाठी शाळेतील इतर कर्मचाऱ्यांचीही करोनाची चाचणी करण्यात आली आहे. त्यामुळं एकूण ११३ शिक्षक कर्मचाऱ्यांचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत. वाचाः बुलडाणा जिल्ह्यातील ही मोठी शाळा असून या शाळेत १ ते १२वी पर्यंतचे एकून ५ हजार ५०० विध्यार्थी आहेत. तर १५० शिक्षक आहेत. उद्यापासून म्हणजे २८ जानेवारीपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करोनाचे नियम पाळून जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर शिक्षकांना शाळा सुरू होण्याआधी करोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. म्हणून या शाळेतील १५० शिक्षकांपैकी सुरुवातीला पहिल्या टप्प्यात ३५ शिक्षकांनी RTPCR चाचणी केली असता ३५ पैकी २२ शिक्षक करोनाबाधित असल्याचं निष्पन्न झाल्याने अजून ११३ शिक्षकांचा करोना चाचणी अहवाल प्रलंबित आहे. त्यामुळे उद्यापासून शाळा कशा सुरू कारायच्यात असा प्रश्न उपस्थित झाला आहे? एकाच शाळेत जर इतके शिक्षक करोनाबाधित असतील तर मुलांच्या सुरक्षेचं काय? असाही प्रश्न पालकांना पडला आहे. वाचाः
]]> https://maharashtratimes.com/career/career-news/22-teachers-found-positive-in-buldhana-school/articleshow/89152456.cms Thu, 27 Jan 2022 07:59:34 GMT <![CDATA[ IGNOU MBA अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या ]]> https://maharashtratimes.com/career/career-news/ignou-mba-admissions-2022-the-date-of-application-for-mba-course-in-ignou-is-till-this-date-register-like-this/articleshow/89152043.cms
MBA Admissions 2022: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) जानेवारी २०२२ सत्राच्या मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (MBA) अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. इग्नू जानेवारी २०२२ एमबीए अभ्यासक्रमात प्रवेशासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट ignouadmission.samarth.edu.in वर नोंदणी करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांसाठी एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ३१ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज शुल्क जमा करता येणार आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विद्यापीठाचा ऑनलाइन एमबीए अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. इग्नूने हा अभ्यासक्रम ऑनलाइन माध्यमातून सुरू केला आहे. या ऑनलाइन अभ्यासक्रमला जानेवारीपासून सुरुवात होत आहे. अनेक विद्यार्थ्यांना वाढत्या जबाबदारीमुळे आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते. नोकरी-व्यवसायामुळे अभ्यासासाठी पूर्ण वेळ देता येत नाही. अशा विद्यार्थ्यांना इग्नूने सुरु केलेल्या ऑनलाइन एमबीए अभ्यासक्रमाचा फायदा घेता येणार आहे. ऑनलाइन एमबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांना प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना पदवी परीक्षेत ५० टक्के गुण मिळणे अनिवार्य आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ४५ टक्के गुणांसह कोणत्याही प्रवेश परीक्षेशिवाय थेट प्रवेश घेता येईल. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना इग्नूची अधिकृत वेबसाइट ignuiop.samarth.edu.in वर जा. उमेदवारांना ५ वेगळ्या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येणार आहे. ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट(Human Resource Management),फायनान्शियल मॅनेजमेंट (Financial Management), मार्केटींग मॅनेजमेंट (Marketing Management), ऑपरेशन्स मॅनेजमेंट (Operations Management), सर्व्हिस मॅनेजमेंट (Services Management)या अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. इग्नूतर्फे एकूण २८ अभ्यासक्रम चार सेमिस्टरमध्ये पूर्ण केले जाणार आहेत. जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार एमबीए ऑनलाइन प्रोग्रामसाठी अनेक प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल. या अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती डिजिटली काऊन्सेलिंग, मोबाइल अॅप, ई-मेल यांसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे दिली जाणार आहे. प्रवेश प्रक्रिया हा अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन पद्धतीने घेतला जाणार आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा असून कमाल कालावधी चार वर्षांचा आहे. अभ्यासक्रमाशी संबंधित अधिक तपशील अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. महागड्या फीमुळे कोर्स करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना या कोर्सचा लाभ घेता येणार आहे.
]]> https://maharashtratimes.com/career/career-news/ignou-mba-admissions-2022-the-date-of-application-for-mba-course-in-ignou-is-till-this-date-register-like-this/articleshow/89152043.cms Thu, 27 Jan 2022 07:09:03 GMT <![CDATA[ CSIR नेट परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, 'असे' करा डाऊनलोड ]]> https://maharashtratimes.com/career/career-news/csir-net-exam-2022-admit-card-released-on-official-website/articleshow/89150831.cms
CSIR 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने सीएसआयआर परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर उपलब्ध आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. सीएसआयआर नेट परीक्षा २९ जानेवारी आणि १५ ते १७ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे. उमेदवारांना अर्ज क्रमांक, जन्मतारीख भरुन सीएसआयर नेट २०२२ प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन देखील प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. सीएसआयर यूजीसी नेट २०२२ (CSIR UGC NET 2022) परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना परीक्षेवेळी प्रवेशपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. तसेच परीक्षा केंद्रावर जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल. करोना निर्देशांचे पालन करुन या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. परीक्षार्थींना सोशल डिस्टन्सिंग आणि इतर करोना निर्देशांचे पालन करावे लागेल. प्रवेशपत्र असे करा डाऊनलोड प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट csirnet.nta.nic वर जा. 'Combined CSIR-NET जूनसाठी प्रवेशपत्र डाउनलोड कराट या लिंकवर क्लिक करा. त्याच्या शेजारी बॉक्ससह एक नवीन पेज उघडेल. दिलेल्या बॉक्समध्ये CSIR NET 2022 अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड यासारखी क्रेडेन्शियल्स एंटर करा. UGC NET 2022 उमेदवाराचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील उपयोगासाठी सीएसआयआर यूजीसी नेट २०२२ प्रवेशपत्र डाऊनलोड करा. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे भारतातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये ज्युनियर फेलोशिप (JRF) आणि लेक्चरशिप/असिस्टंट प्रोफेसरसाठी उमेदवारांची राष्ट्रीय स्तरावरील पात्रता निश्चित करण्यासाठी सीएसआयआर परीक्षा २०२२ घेतली जाते. विज्ञान शाखेत मास्टर डिग्री असलेल्यांना सीएसआयआर नेट परीक्षा देता येते. यात सीबीटी माध्यमातून २ पेपर असून वस्तुनिष्ठ स्वरूपातील प्रश्न विचारले जातात.
]]> https://maharashtratimes.com/career/career-news/csir-net-exam-2022-admit-card-released-on-official-website/articleshow/89150831.cms Thu, 27 Jan 2022 05:03:48 GMT <![CDATA[ पिंपरी चिंचवड महापालिकेत शिक्षण विभागासाठी नव्याने पदनिर्मिती ]]> https://maharashtratimes.com/career/career-news/pune-pimpari-chinchwad-municipal-corporation-education-department-recruitment/articleshow/89148396.cms
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी महापलिका प्राथमिक शिक्षण विभागासाठी आठ क्षेत्रीय कार्यालयानुसार आठ सहायक प्रशासन अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. त्यासाठी सुधारित आकृतिबंधानुसार पद निर्मिती करण्यात येईल. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला दोन आणि मुख्य कार्यालयाला दोन असे एकूण १८ पर्यवेक्षक नेमले जाणार आहे. त्यापैकी सात पदे मंजूर आहेत. उर्वरित ११ पदांची निर्मिती केली जाणार आहे. महापालिका शिक्षण विभागाच्या अंतर्गत १०५ शाळा आहेत; तसेच शहरातील खासगी शाळांवर नियंत्रण ठेवावे लागते. महापालिका व खासगी शाळा यांची माहिती वेळोवेळी सरकारला लागणारी माहिती देणे, शाळांची गुणवत्ता वाढविणे, माहिती संकलित करणे आदी कामे महापालिका प्राथमिक विभागामार्फत वेळोवेळी तत्काळ करावी लागतात. या कामकाजात सुसूत्रता यावी; तसेच जलद निर्णय घेणे सोयीस्कर व्हावे यासाठी प्राथमिक शिक्षण विभागात क्षेत्रीय कार्यालयानुसार पदनिर्मिती केली जाणार आहे. नियमानुसार; तसेच सरकारकडून वेळोवेळी प्राप्त झालेल्या शासन निर्णयानुसार ही नियुक्ती करण्याचे नियोजन आहे. शिक्षकांना पदोन्नतीद्वारे संधी जिल्हा परिषदमध्ये शिक्षण विभागात शिक्षण विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी अशी पदे असतात. त्याच धर्तीवर क्षेत्रीय कार्यालयानुसार पदनिर्मिती होत आहे. याबद्दल शिक्षकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. हा आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर त्या ठिकाणी होणारी भरती सेवेत असलेल्या शिक्षकांमधून त्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्हता, अनुभव, शिक्षण क्षेत्रात योगदान; तसेच मनपाकडील शिक्षक कर्मचारी यामधून व्हावी. या पदनिर्मितीच्या निर्णयामुळे शिक्षकांनाही पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतील आणि शिक्षण विभागातही सुसूत्रता येईल, असे शिक्षकवर्गाकडून सांगण्यात आले.
]]> https://maharashtratimes.com/career/career-news/pune-pimpari-chinchwad-municipal-corporation-education-department-recruitment/articleshow/89148396.cms Thu, 27 Jan 2022 06:20:24 GMT <![CDATA[ CBSE टर्म २ परीक्षा आणि निकाल कधी? विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट ]]> https://maharashtratimes.com/career/career-news/cbse-term-2-date-sheet-2022-cbse-term-2-examinations-start-and-when-will-the-first-term-results/articleshow/89149724.cms
CBSE Term 2 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने(Central Board of Secondary Education, CBSE)दहावी, बारावी टर्म २ बोर्ड परीक्षा २०२२ मार्च-एप्रिलमध्ये होणार आहेत. सध्या सीबीएसईचे विद्यार्थी टर्म १ निकाल २०२२ ची वाट पाहत आहेत. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा वाढचा प्रादुर्भाव पाहता परीक्षा रद्द किंवा ऑनलाइन करा असे आवाहन काही विद्यार्थी सोशल मीडियामध्ये करत आहे. विद्यार्थी सध्या सीबीएसई बोर्ड टर्म २ परीक्षांच्या तयारीत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीएसई दहावी, बारावीच्या प्रॅक्टीकल परीक्षा फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. टर्म २ वेळापत्रक २०२२ देखील पुढील आठवड्यापर्यंत रिलीज होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टर्म २ बोर्ड परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक देखील तयार करण्यात आले आहे. सीबीएसई टर्म १ निकाल २०२२ सह टर्म २ वेळापत्रक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. याअंतर्गत प्रॅक्टीकल परीक्षेसोबत थ्योअरी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. सीबीएसईच्या एका अधिकाऱ्याने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, बोर्ड १५ फेब्रुवारीपासून प्रॅक्टीकल परीक्षा सुरू करू इच्छित आहे. मात्र, सध्या करोनाची परिस्थिती आणि ५ राज्यांतील निवडणुकांमुळे हे शक्य नाही. अशा परिस्थितीत आता फेब्रुवारीच्या अखेरीस प्रॅक्टीकल परीक्षा सुरू करण्याचा विचार सुरू आहे. टर्म २ ची थ्योअरी परीक्षा २० मार्च २०२२ पासून सुरू होण्याची शक्यता आहे. बोर्ड प्रथम मुख्य परीक्षा आणि नंतर लहान विषयांच्या परीक्षा घेणार आहे. परीक्षा झाल्यानंतर लवकरच निकाल जाहीर केला जाईल, असे सीबीएसई बोर्डाकडून परीक्षेपूर्वी सांगण्यात आले होते. सीबीएसईने टर्म १ च्या निकालाची तारीख जाहीर केली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, बोर्डातर्फे १५ जानेवारी २०२२ पर्यंत इयत्ता दहावी आणि बारावी टर्म १ च्या परीक्षांचे निकाल जाहीर करू शकतात. सीबीएसईतर्फे टर्म १ बोर्ड परीक्षांच्या मध्यावर मूल्यांकन धोरणातील बदल जाहीर करण्यात आला होता. १६ डिसेंबर २०२१ रोजी परीक्षेच्या तारखेलाच मूल्यांकन केले जाणार नाही, असे बोर्डाकडून शाळांना सांगण्यात आले. सीबीएसईच्या या निर्णयामुळे, किमान ७ विषयांचे (मेजर आणि मायनर) मूल्यमापन लांबले आणि त्यांचे मूल्यांकन शाळांनी बाह्य तपासणीसाठी बोर्डाकडे पाठवले. मूल्यमापन प्रक्रियेला जास्तीत जास्त ५ ते ७ दिवस लागतील, असे मानले जात होते. त्यामुळे सीबीएसई टर्म १ निकाल २०२१-२२ जाहीर होण्यास विलंब अपेक्षित होता.
]]> https://maharashtratimes.com/career/career-news/cbse-term-2-date-sheet-2022-cbse-term-2-examinations-start-and-when-will-the-first-term-results/articleshow/89149724.cms Thu, 27 Jan 2022 05:24:22 GMT <![CDATA[ MPSC Recruitment: पीएससी ग्रुप सी भरतीच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ ]]> https://maharashtratimes.com/career/career-news/mpsc-group-c-recruitment-2021-application-date-extended-for-maharashtra-psc-group-c-recruitment/articleshow/89148548.cms
Group C : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र ग्रुप सी पदांसाठी जाहीर केलेल्या रिक्त जागांच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना आणखी एक संधी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जारी केलेल्या सूचनेनुसार, आता उमेदवार २ फेब्रुवारीपर्यंत या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतील. याआधी एमपीएससीच्या रिक्त पदांसाठी ११ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करण्यात येणार होता. महाराष्ट्र ग्रुप सीच्या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया (MPSC Group C 2021) २२ डिसेंबर २०२१ पासून सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेले उमेदवार ( 2022) या पदासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना एमपीएससीची अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in वर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करावा लागेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या या रिक्त पदांद्वारे एकूण ९०० पदांची भरती केली जाणार आहे. MPSC Group C Recruitment 2021: असा करा अर्ज स्टेप्स १: अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- mpsc.gov.in वर जा. स्टेप २: होमपेजवरील ऑनलाइन अॅप्लिकेशन पोर्टलच्या लिंकवर जा. स्टेप ३: आता विविध ग्रुप सी पदांच्या ९०० रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाइन अर्जांच्या लिंकवर जा. स्टेप ४ : आता Apply Online च्या लिंकवर क्लिक करा. स्टेप ५: मागितलेला तपशील भरून नोंदणी करा. स्टेप ६: मिळालेल्या नोंदणी क्रमांकाच्या मदतीने अर्ज भरा. महत्वाच्या तारखा पूर्व परीक्षेची संभाव्य तारीख - ३ एप्रिल २०२२ मुख्य परीक्षेची तारीख - ६ ऑगस्ट २०२२ क्लर्क आणि टायपिस्ट पदांसाठी मुख्य परीक्षा - १३ ऑगस्ट २०२२ परीक्षेनंतर निकालाची तारीख जाहीर केली जाणार आहे. या पदांवर भरती या रिक्त पदांद्वारे उद्योग निरीक्षकासाठी (MPSC Industry Inspector) १०३, उपनिरीक्षकासाठी (MPSC Deputy Inspector)११४, तांत्रिक सहाय्यकासाठी (Technical assistant)१४, कर सहाय्यकांसाठी (Tax assistant) ११७, लिपिक टंकलेखक मराठी (Tax Assistant, Clerk-Typist, Marathi) आणि लिपिक-टीटी इंग्रजीच्या (Clerk-Typist, English) ७९ पदांवर भरती होणार आहे. (लिपिक-टंकलेखक, इंग्रजी). यासह इतर पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमाधारक असणे गरजेचे आहे.
]]> https://maharashtratimes.com/career/career-news/mpsc-group-c-recruitment-2021-application-date-extended-for-maharashtra-psc-group-c-recruitment/articleshow/89148548.cms Thu, 27 Jan 2022 04:20:29 GMT <![CDATA[ 'आरटीई'चे प्रवेश यंदाही लांबणीवर? शाळांची नोंदणी न झाल्याचा परिणाम ]]> https://maharashtratimes.com/career/career-news/rte-admissions-likely-to-be-delayed-this-year-too/articleshow/89147630.cms
म. टा. प्रतिनिधी, पुणे 'शिक्षण हक्क कायद्यां'तर्गत () देण्यात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशांसाठी अद्याप शाळांची नोंदणी सुरू न झाल्याने यंदाही '' प्रवेश लांबणीवर पडणार आहेत. शाळांची नोंदणी होऊ न शकल्याने एक फेब्रुवारीपासून सुरू होणारे प्रवेश आता एक ते दीड महिना लांबण्याची भीती आहे. 'आरटीई' प्रवेशांची शाळा नोंदणीची प्रक्रिया ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करायची होती. परंतु, अद्याप शाळांची नोंदणी सुरू न झाल्याने प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून सांगण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात २५ टक्के प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांची नोंदणी २८ डिसेंबर ते १७ जानेवारी २०२२ या कालावधीमध्ये करण्यात यावी; तसेच त्यासाठी जास्तीत जास्त १५ दिवसांचा वाढीव कालावधी देण्यात यावा, अशा सूचना संचालकांकडून देण्यात आल्या होत्या. परंतु, ही प्रक्रिया अजून पूर्णच झालेली नाही. जोपर्यंत सर्व शाळांची नोंदणी होत नाही, तोपर्यंत प्रवेशांच्या जागांची निश्चिती केली जात नाही. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पालक अर्ज करू शकत नाहीत. त्यामुळे शाळांची नोंदणी करायला इतकी दिरंगाई का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील आरटीई अंतर्गत पात्र असलेल्या शाळांची १०० टक्के नोंदणी पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी आणि प्रशासन अधिकारी यांची असेल, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर टेमकर यांनी स्पष्ट केले होते. अद्याप एकाही शाळेची नोंदणी झाली नसल्याने संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. जबाबदारीवरून टोलवाटोलवी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवणारी 'एनआयसी' संस्था प्रवेशाची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप प्राथमिक शिक्षण संचालनालयातील काही अधिकाऱ्यांनी केला आहे. प्रवेश प्रक्रियेची जबाबदारी असणारे काही अधिकारी आणि कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आले आहेत, असेही सांगितले जात आहे. यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या जबाबदारीवरून टोलवाटोलवी सुरू झाल्याचे चित्र आहे.
]]> https://maharashtratimes.com/career/career-news/rte-admissions-likely-to-be-delayed-this-year-too/articleshow/89147630.cms Thu, 27 Jan 2022 04:33:10 GMT <![CDATA[ आर्मी शाळांमध्ये ८ हजारहून अधिक पदांची भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या ]]> https://maharashtratimes.com/career/career-news/army-school-recruitment-2022-last-date-to-apply-for-tgt-pgt-and-prt-teacher-tomorrow/articleshow/89147635.cms
Recruitment 2022: आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी (Army Welfare Education Society, AWES)अंतर्गत देशातील विविध सैन्य शाळांमध्ये ८ हजारहून अधिक शिक्षक पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत टीजीटी, पीजीटी आणि पीआरटी पदांसाठी अर्ज प्रक्रिया २८ जानेवारी २०२२ रोजी बंद केली जाईल. शिक्षक म्हणून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी चालून आली आहे. या रिक्त पदांद्वारे एकूण ८७०० पदांची भरती केली जाणार आहे. या पदभरतीसाठी ()अद्याप अर्ज न केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वेबसाइटवर उपलब्ध असलेले नोटिफिकेशन पाहणे गरजेचे आहे. आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत देशभरातील शाळांमध्ये शिक्षक पदांच्या एकूण ८७०० जागा भरण्यात येणार आहेत. पीजीटी, टीजीटी आणि टीआरटी ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी परीक्षा, मुलाखत आणि शिकविण्याचे कौशल्य या ३ स्टेप्समधून भरती केली जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये ५० टक्के गुण असणे गरजेचे आहे. यासोबतच बीएड आणि किंवा एलिमेंट्री एज्युकेशनचा दोन वर्षांचा डिप्लोमा ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. असा करा अर्ज स्टेप्स १: अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- awesindia.com वर जा. स्टेप २: होमपेजवर What’s New या लिंकवर जा. स्टेप ३: आता नवीन नोंदणीच्या लिंकवर जा. स्टेप ४: आता Apply Online च्या लिंकवर क्लिक करा. स्टेप ५: मागितलेली तपशील भरून नोंदणी करा. स्टेप ६: नोंदणी क्रमांकाच्या मदतीने अर्ज भरा. फ्रेशर उमेदवारांसाठी ४० तर अनुभवी उमेदवाराचे वय ५७ वर्षांपेक्षा जास्त नसावे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. ७ जानेवारीला यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना २८ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. १० फेब्रुवारी २०२२ रोजी प्रवेशपत्र जाहीर होणार आहे. १९ आणि २० फेब्रुवारी २०२२ रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेचा निकाल २८ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर होणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
]]> https://maharashtratimes.com/career/career-news/army-school-recruitment-2022-last-date-to-apply-for-tgt-pgt-and-prt-teacher-tomorrow/articleshow/89147635.cms Wed, 26 Jan 2022 04:29:11 GMT <![CDATA[ राज्यातील महाविद्यालये १ फेब्रुवारीपासून होणार सुरू ]]> https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-college-reopening-colleges-are-opening-from-1st-february-2022/articleshow/89130415.cms
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यातील कॉलेजांचे वर्ग १ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष म्हणजेच ऑफलाइन सुरू होणार आहेत. मात्र, करोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये प्रत्यक्ष प्रवेश दिला जाणार आहे. मंगळवारी राज्य सरकारने परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. करोनामुळे मार्च, २०२०मध्ये बंद झालेली कॉलेजे १३ ऑक्टोबर, २०२१ रोजी ऑफलाइन सुरू झाली. त्यावेळी करोना लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजला येण्याची परवानगी होती. परंतु, पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने ५ जानेवारीपासून राज्यातील सर्व अकृषी, अभिमत, स्वायत्त विद्यापीठे, तंत्रनिकेतन आणि संलग्न कॉलेजांचे प्रत्यक्ष वर्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता रुग्णसंख्या घटू लागल्याने शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे लसीकरणही पूर्ण होऊ लागले आहे. यामुळे १ फेब्रुवारीपासून कॉलेजांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात येतील, असे शासन परिपत्रक मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांनी दोन लसमात्रा पूर्ण केल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांनाच कॉलेजांत तसेच विद्यापीठात प्रवेश दिला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसमात्रा पूर्ण झालेल्या नाहीत, अशांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करून लशीच्या मात्रा देण्यात येतील, असे परिपत्रकात म्हटले आहे. जे विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात येऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी ऑनलाइन वर्ग पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. १५ फेब्रुवारीपर्यंत व विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइनच घेण्यात याव्यात, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. यानंतरच्या सर्व परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने घेण्यात येतील. दरम्यान, कॉलेजे सुरू करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून विद्यापीठांनी नियोजन करायचे आहे. तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या संभाव्य अडचणी व शंकांचे निरसन करण्यासाठी विद्यापीठ, कॉलेजांनी हेल्पलाइनची व्यवस्था करावी आणि विद्यापीठांनी आपल्या वेबसाइटवर परीक्षांचा अभ्यासक्रम, नमुना प्रश्नसंच, हेल्पलाइन नंबर इत्यादी माहिती उपलब्ध करुन द्यावी, असेही सांगण्यात आले आहे. वसतिगृहे टप्प्याटप्प्याने सुरू राज्यातील सर्व वसतिगृहे टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत संबंधित विद्यापीठ, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण संचालक यांनी आढावा घेऊन व स्थानिक प्राधिकरणाशी विचारविनिमय निर्णय घ्यावा, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
]]>
https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-college-reopening-colleges-are-opening-from-1st-february-2022/articleshow/89130415.cms
Tue, 25 Jan 2022 11:58:30 GMT <![CDATA[ TMC Recruitment: टाटा मेमोरियल सेंटरमध्ये भरती, ७८ हजारपर्यंत मिळेल पगार ]]> https://maharashtratimes.com/career/career-news/tmc-recruitment-tata-memorial-hospital-mid-recruitment-mill-salary-up-to-78-thousand/articleshow/89117745.cms
TMC Recruitment: हॉस्पिटल मुंबई (, Tata Memorial Center Mumbai) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदभरती अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor), वैद्यकीय अधीक्षक (Medical Superintendent), नर्सिंग अधीक्षक ग्रेड II (Nursing Superintendent Grade II), वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ (Medical Physicist), वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistant), टेक्निशियन(Technician), स्टेनोग्राफर (Stenographer), सहाय्यक आहारतज्ज्ञ (Assistant Dietitian)ही पदे भरली जाणार आहेत. असिस्टंट प्रोफेसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून एमसीएच/डिएनबी/एमडी आणि संबधित कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७८ हजार ८०० रुपये पगार दिला जाणार आहे. मेडिकल सुप्रीडंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेतून एमडीपर्यंतचे शिक्षण आणि कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७८ हजार ८०० पर्यंत पगार देण्यात येईल. नर्सिंग सुप्रींटेंडट ग्रेड २ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे एमएससी पूर्ण आणि कामाचा अनुभव गरजेचा आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७८,८०० रुपये पगार दिला जाणार आहे. सायन्टिफिक ऑफिसर पदासाठी उमेदवाराकडे एमडी किंवा पीएचडीचे शिक्षण आणि संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असावा. या पदासाठी निवड झाल्यास दरमहा ४७ हजार ६०० रुपये पगार दिला जाईल. मेडिकल फिजिशियनिस्ट पदासाठी उमेदवारांनी एमएससी इन फिजिक्स किंवा रेडीओलॉजी फिजिक्समध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे. या पदासाठी दरमहा ५६ हजार १०० इतका पगार मिळेल. सायन्टिफिक असिस्टंट पदासाठी उमेदवाराकडे मेडिकल लॅबोरीटी टेक्नोलॉजीमध्ये बीएससी असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झाल्यास उमेदवाराला ३५ हजार ४०० रुपये पगार दिला जाईल. टेक्निशियन पदासाठी उमेदवाराकडे बारावी सायन्स आणि डिप्लोमा असणे गरजेचे असून निवड झालेल्या उमेदवारास दरमहा २५ हजार ५०० रुपये पगार देण्यात येईल. स्टेनोग्राफर पदासाठी ८० शब्द प्रति मिनिट शॉर्ट हॅण्ड, टाइपरायटरवर ४० शब्द प्रतिमिनिट प्रमाणपत्र आणि संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २५ हजार ५०० रुपये पगार दिला जाणार आहे. असिस्टंट डायटेशियन पदासाठी उमेदवाराकडे फूड सायन्स अॅण्ड न्यूट्रीशियन विषय घेऊन एमएससी असणे आवश्यक आहे. यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३५ हजार ४०० रुपये पगार देण्यात येणार आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. उमेदवारांनी आपला अर्ज टाटा मेमोरियल सेंटरची अधिकृत वेबसाइट https://tmc.gov.in/ वर पाठवायचा आहे. १८ फेब्रुवारी २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
]]>
https://maharashtratimes.com/career/career-news/tmc-recruitment-tata-memorial-hospital-mid-recruitment-mill-salary-up-to-78-thousand/articleshow/89117745.cms
Tue, 25 Jan 2022 10:44:19 GMT <![CDATA[ CBSE टर्म १ चा निकाल आज होणार जाहीर? बोर्डाने ट्विटरवरुन दिली 'ही' माहिती ]]> https://maharashtratimes.com/career/career-news/cbse-result-cbse-term-1-result-to-be-released-today-the-board-gave-this-clarification-on-twitter/articleshow/89116097.cms
Result: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) तर्फे दहावी आणि बारावी सीबीएसई टर्म १ निकालासंदर्भात (CBSE term 1 result) महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. सोशल मीडियामध्ये सध्या सीबीएसईच्या लेटरहेडसह परिपत्रक व्हायरल होत आहे. त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार दहावी आणि बारावी टर्म १ च्या परीक्षेचे निकाल बोर्डाकडून २५ जानेवारी २०२२ रोजी जाहीर केले जातील. पण सीबीएसईने ट्वीट करुन यावर स्पष्टीकरण दिले आहे. सीबीएसई बोर्डाच्या प्रवक्त्या रमा शर्मा यांनी व्हायरल परिपत्रकाबाबत माहिती दिली आहे. सीबीएसईने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल @cbseindia29 वर माहिती शेअर केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले परिपत्रक ज्यामध्ये सीबीएसई दहावी आणि बारावीचा निकाल २५ जानेवारीला जाहीर होणार असल्याचे म्हटले आहे, ते खोटे आहे. मंडळाने असे कोणतेही परिपत्रक जारी केलेले नाही अशी माहिती अधिकृतरित्या देण्यात आली आहे. असे असले तरी निकालाच्या निश्चित तारखेबाबतही बोर्डाने माहिती दिलेली नाही. मात्र २६ जानेवारीनंतर कधीही निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या संदर्भात नवीन अपडेट अधिकृत वेबसाइट CBSE cbse.gov.in किंवा cbseresults.nic.in वर देण्यात येणार आहे. सीबीएसई दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या उमेदवारांना डिजिलॉकर आणि उमंग अॅपवर टर्म १ चा निकाल पाहता येणार आहे. टर्म १ च्या निकालानंतर, सीबीएसई बोर्ड टर्म २ परीक्षा २०२२ ( Exam 2022) चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यासोबतच आणखी एक खोटे परिपत्रक व्हायरल होत आहे. हे परिपत्रक २२ जानेवारी २०२२ चे आहे. ज्यात असे म्हटले आहे की 'CBSE ने बोर्ड परीक्षा निकाल तपासण्याची पद्धत बदलली आहे. आता सीबीएसई निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या केंद्रांद्वारे यूजर आयडी आणि पासवर्ड दिला जाईल. यातून सीबीएसई वेब पोर्टलवर लॉगिन करून दहावी आणि बारावीचे निकाल पाहता येणार आहेत. पण बोर्डाने हे परिपत्रक देखील खोटे असल्याचे ट्विटरवर स्पष्ट केले आहे.
]]>
https://maharashtratimes.com/career/career-news/cbse-result-cbse-term-1-result-to-be-released-today-the-board-gave-this-clarification-on-twitter/articleshow/89116097.cms
Tue, 25 Jan 2022 09:56:43 GMT <![CDATA[ Republic आणि Independence या दोन्ही दिवसांमधील १० मोठे फरक जाणून घ्या ]]> https://maharashtratimes.com/career/career-news/republic-day-vs-independence-day-the-way-to-celebrate-26-january-is-different-from-15-august-these-are-10-big-differences-between-the-two/articleshow/89114790.cms
Vs Independence: प्रत्येक भारतीयासाठी १५ ऑगस्ट रोजी साजरा होणारा स्वातंत्र्यदिन आणि २६ जानेवारी रोजी साजरा होणारा हे दोन सर्वात महत्त्वाचे दिवस आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्यदिनी देशाला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. प्रजासत्ताक दिनी भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क मिळावेत यासाठी संपूर्ण भारतात संविधान लागू करण्यात आले. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन्ही विशेष दिवशी तिरंगा फडकवला जातो. पण हे दोन दिवस साजरे करण्याची पद्धत आणि नियम वेगळे आहेत. हे दोन दिवस वेगवेगळ्या नियमांनी कसे साजरे केले जातात ते जाणून घेऊया. प्रजासत्ताक दिनी, देशाचे प्रथम नागरिक म्हणजेच राष्ट्रपती या कार्यक्रमात सामील होतात आणि ध्वजारोहण करतात. हे राष्ट्रीय राजधानीतील राजपथावर साजरे केले जाते. त्यानंतर परेड, राज्य टॅबलेक्स, तोफखाना प्रदर्शन हे कार्यक्रम होतात. तर स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर समारंभ होतो आणि त्यानंतर पंतप्रधान ध्वजारोहण करतात आणि देशाला संबोधित करतात. दोन्ही दिवशी ध्वजारोहण करण्याचे नियम तिरंगा फडकवण्याच्या पद्धतीतही फरक आहे. १५ ऑगस्टला तिरंगा वर खेचून फडकवला जातो. २) १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण (Flag Hoisting) केले जाते. ३) प्रजासत्ताक दिनी ध्वज शीर्षस्थानी बांधला जातो, तो तेथे उघडला जातो आणि फडकवला जातो. ४) प्रजासत्ताक दिनाला ध्वज फडकावला जातो. त्या दिवसाला ध्वजारोहण म्हणत नाहीत. परंतु सर्वसाधारणपणे अनेकदा ध्वजारोहण शब्दप्रयोग केला जातो जो चुकीचा आहे. ५) प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींनी झेंडा फडकावतात. ६) स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान ध्वजारोहण करतात. ७) प्रजासत्ताक दिनी राजपथावर ध्वज फडकवला जातो. ८) स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले जाते. ९) राष्ट्रपती एक घटनात्मक पदावर असतात. आणि २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना लागू झाली. १०) पंतप्रधान राजकीय पदावर असतात. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्याहस्ते ध्वज फडकावला जातो. यामागचे कारण म्हणजे राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख असतात. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली. या दिवशी देशाला पहिले पंतप्रधान भेटले. देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ.राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली.
]]>
https://maharashtratimes.com/career/career-news/republic-day-vs-independence-day-the-way-to-celebrate-26-january-is-different-from-15-august-these-are-10-big-differences-between-the-two/articleshow/89114790.cms
Tue, 25 Jan 2022 09:48:02 GMT <![CDATA[ राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२२: महाराष्ट्राच्या चार बालकांचा गौरव ]]> https://maharashtratimes.com/career/career-news/pm-narendra-modi-confers-pm-rashtriya-bal-puraskar-on-29-children-out-of-which-four-from-maharashtra/articleshow/89114828.cms
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली मुंबईची जिया राय, पुण्याची जुई केसकर, जळगावची शिवांगी काळे आणि नाशिकचा स्वयम पाटील या महाराष्ट्राच्या चार कर्तृत्ववान बालकांचा सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी '' देऊन गौरव केला. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने आयोजित केलेल्या व्हर्चुअल समारंभात पंतप्रधान मोदी यांनी पुरस्कार विजेत्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल प्रमाणपत्र प्रदान करीत विजेत्यांशी संवाद साधला. कला व संस्कृती, शौर्य, नवसंशोधन, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा सहा श्रेणींमध्ये देशातील २९ मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२२'ने गौरविण्यात आले. विजेत्यांमध्ये २१ राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील १५ मुलगे आणि १४ मुलींचा समावेश आहे. पदक, एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधानांनी वर्ष २०२१च्या 'पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार' विजेत्या ३२ मुलांना डिजिटल प्रमाणपत्र प्रदान केले. अपंगत्वावर मात करत ओपन वॉटर पॅरास्विमिंग आणि ओपन वॉटर स्विमिंगमध्ये जागतिक विक्रम नोंदविणाऱ्या मुंबईच्या १३ वर्षीय दिव्यांग जिया रायला क्रीडा श्रेणीतील पुरस्काराने गौरविण्यात आले. धाडस आणि समयसूचकतेचा परिचय देत विजेच्या धक्क्यापासून आई व बहिणीचे प्राण वाचविणारी जळगावची सहा वर्षीय शिवांगी काळे मानाच्या शौर्य पुरस्काराची मानकरी ठरली. वयाच्या १०व्या वर्षी ५ किमी, तर १३व्या वर्षी १४ किमी अंतर पोहून जागतिक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या नाशिकच्या १४ वर्षीय स्वयम पाटीलला क्रीडा श्रेणीतील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर पार्किन्सन आजाराने ग्रासलेल्यांना उपयुक्त ठरतील असे मोजेसदृश 'जे ट्रेमर ३ जी' उपकरण तयार करणाऱ्या पुण्याच्या १५ वर्षीय जुई केसकरला नवसंशोधन श्रेणीतील पुरस्कार देण्यात आला. 'अपेक्षांतून प्रेरणा घ्या' 'देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात मिळालेला हा पुरस्कार विजेत्यांना आयुष्यभर स्मरणात राहील. या पुरस्कारामुळे सर्व विजेत्यांविषयी मित्र, कुटुंबीय, समाज अशा विविध स्तरांतून अपेक्षा वाढल्या आहेत. पण या अपेक्षांचे ओझे वाटून न घेता त्यातून प्रेरणा घ्या', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी विजेत्या मुलांशी संवाद साधताना म्हणाले. केंद्रीय महिला व बाल विकासमंत्री स्मृती इराणी आणि राज्यमंत्री डॉ. महेंद्रभाई मुंजपारा यावेळी उपस्थित होते.
]]>
https://maharashtratimes.com/career/career-news/pm-narendra-modi-confers-pm-rashtriya-bal-puraskar-on-29-children-out-of-which-four-from-maharashtra/articleshow/89114828.cms
Tue, 25 Jan 2022 09:14:34 GMT <![CDATA[ UCEED प्रोविजनल उत्तरतालिका जाहीर, 'या' तारखेपर्यंत नोंदवा आक्षेप ]]> https://maharashtratimes.com/career/career-news/uceed-answer-key-2022-uceed-provisional-answer-key-released-you-can-file-objection-till-27-january-2022/articleshow/89113790.cms
Answer Key 2022: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई (IIT Bombay) ने UCEED आणि CEED २०२२ परीक्षेची जाहीर केली आहे. UCEED आणि CEED २०२२ च्या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना आयआयटी मुंबईची अधिकृत वेबसाइटवर uceed.iitb.ac.in वर उत्तरतालिका पाहता आणि डाउनलोड करता येणार आहे. पोर्टलवर लॉगिन करून उमेदवार भाग-अ साठी त्यांचे वैयक्तिक प्रतिसाद पाहू शकतात. विद्यार्थ्यांनी हे देखील लक्षात घ्यावे की 31 जानेवारी 2022 रोजी रिलीज होणाऱ्या भाग-अ साठी सर्व प्रतिसादांचे अंतिम उत्तर की नुसार मूल्यमापन केले जाईल. UCEED आणि CEED 2022 भाग A उत्तर की उमेदवार पोर्टलवर उपलब्ध आहे. UCEED आणि CEED 2022 भाग A उत्तर की तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी आणि लॉगिन लिंकमध्ये लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकावा. बातमीत देण्यात आलेल्या स्टेप्स फॉलो करुन देखील उत्तरतालिका तपासता येणार आहे. UCEED, CEED 2022 च्या अधिकृत वेबसाइट uceed.iitb.ac.in वर जा. दिलेल्या UCEED आणि CEED २०२२ उमेदवार पोर्टल लिंकवर क्लिक करा. लॉगिनवर क्लिक करा आणि ईमेल आयडी आणि पासवर्ड टाका. UCEED आणि CEED २०२२ उत्तरतालिका तपासा आणि संदर्भासाठी डाउनलोड करा. जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार UCEED आणि CEED २०२२ उत्तरतालिका पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. उमेदवार २७ जानेवारी २०२२ पर्यंत उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवू शकतात. आक्षेप आणि दुरुस्त्यांवर आधारित, UCEED आणि CEED २०२२ अंतिम उत्तरतालिका जानेवारी २०२२ पर्यंत अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. UCEED आणि CEED 2022 चा निकाल १० आणि ८ मार्च २०२२ रोजी प्रसिद्ध होऊ शकतो. यासंदर्भात अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नसली तरी मार्चमध्ये निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
]]>
https://maharashtratimes.com/career/career-news/uceed-answer-key-2022-uceed-provisional-answer-key-released-you-can-file-objection-till-27-january-2022/articleshow/89113790.cms
Tue, 25 Jan 2022 07:20:34 GMT <![CDATA[ SSC HSC Exam 2022: दहावी-बारावीसाठी शाळांचा सराव परीक्षांवर भर ]]> https://maharashtratimes.com/career/career-news/ssc-hsc-exam-2022-schools-are-conducting-practice-exams-for-students/articleshow/89111496.cms
म. टा. प्रतिनिधी, पुणे दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तयारी आणि विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव व्हावा म्हणून शाळांमध्ये सराव परीक्षा घ्यायला सुरुवात करण्यात आली आहे. सर्व शाळांमध्ये तीन ते चार सराव परीक्षा घेण्याचा विचार असून, लिखाणाचा सराव होण्यासाठी या परीक्षांवर भर दिला जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यापासून दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षांपूर्वी विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव करवून घेतला जात आहे. त्यासाठी सराव परीक्षा सुरू करण्यात आल्या आहेत. शहर आणि जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये परीक्षा सुरू झाल्या आहेत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने परीक्षा वेळापत्रकानुसार होणार असल्याचे सूचित केल्याने सराव परीक्षांचे आयोजन केले जात आहे. या परीक्षांच्या दरम्यान विज्ञान आणि गणित या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याचे मत शिक्षकांकडून मांडण्यात येत आहे. भाषेचे विषय, इतिहास-भूगोल यांसारख्या विषयांमध्ये कोणतीही अडचण नाही. मात्र, विज्ञान आणि गणिताच्या अनेक संकल्पना विद्यार्थ्यांना समजल्या नसल्याचे शिक्षक सांगत आहेत. यामुळेच परीक्षांप्रमाणेच विद्यार्थ्यांचे काही जादाचे तास ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने घेतले जात आहेत. शहरी भागामध्ये शाळा बंद असल्याने ऑनलाइन वर्ग घेऊन गणित आणि विज्ञानाचे जादाचे वर्ग सुरू असल्याचे शिक्षकांनी सांगितले आहे. परीक्षा वेळेतच होणार दहावी-बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात कोणतेही बदल होणार नसल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पुन्हा स्पष्ट केले. परीक्षांच्या वेळ‌ापत्रकात बदल करण्यासंदर्भात कोणताही निर्णय नाही. तसा निर्णय झाल्यास विद्यार्थ्यांना कळवण्यात येईल. विद्यार्थ्यांनी जुन्या वेळापत्रकाप्रमाणेच परीक्षांची तयारी करावी, असे गोसावी यांनी स्पष्ट केले आहे. सराव परीक्षांवर भर देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याप्रमाणे शाळांमध्ये परीक्षाही सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव होणे गरजेचे आहे. ऑनलाइन शिक्षणाद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला आहे. तो प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना कळला का, याचाही अंदाज या परीक्षांच्या माध्यमातून घेता येईल. - चारुता प्रभुदेसाई, शिक्षिका, अहिल्यादेवी हायस्कूल शहरी आणि ग्रामीण भागात सराव परीक्षा घेण्यावर अधिक भर दिला जात आहे. परीक्षांचे आयोजन केल्याने विद्यार्थ्यांची प्रगती लक्षात येत असून, त्याप्रमाणे जे विषय फारसे समजले नसतील त्यांचे ज्यादाचे तास घेऊन विद्यार्थ्यांकडून तयारी करवून घेतली जात आहे. ग्रामीण भागातील काही भाग वगळला तर बहुतांश ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. - हरिश्चंद्र गायकवाड, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ
]]>
https://maharashtratimes.com/career/career-news/ssc-hsc-exam-2022-schools-are-conducting-practice-exams-for-students/articleshow/89111496.cms
Tags

You may like these posts

Show more

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

ADVERTISEMENT