
मुंबई : इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्ससाठी एकूण पाच विजेतेपदे जिंकली आहेत. दुसरीकडे रोहितने तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून त्याच्या नेतृत्वाखाली संघाने एकही सामना गमावलेला नाही. मुंबई इंडियन्सचा क्रिकेट संचालक आणि टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने रोहितचे एक महान कर्णधार म्हणून वर्णन केले आहे आणि त्याच्या गुणवत्तेचेही कौतुक केले आहे, ज्यामुळे तो सर्वोत्कृष्ट कर्णधारांच्या श्रेणीत मोडतो. वाचा- स्पोर्ट्सस्टारशी बोलताना जहीर म्हणाला, 'रोहित हा खेळाडूंचा कर्णधार आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्ससाठी कर्णधार आणि खेळाडू म्हणून तो चमकदार कामगिरी करत आहे. तो प्रत्येक खेळाडूला वेळ देतो आणि प्रत्येकासाठी त्याला भेटणे खूप सोपे राहते. हा गुण त्यांना आदर्श तर बनवतोच, शिवाय एक उत्तम नेता बनतो. आम्ही नेहमीच युवा क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देणारा संघ राहिलो आहोत.' वाचा- जहीर पुढे म्हणाला, 'आम्ही युवा क्रिकेटपटूंना मोकळेपणाने खेळण्याचे स्वातंत्र्य देतो, रोहितचा अनुभव आणि त्याच्या अॅटिट्यूडच्या जोरावर आम्ही संघात अनेक कर्णधार तयार करू, असा विश्वास आहे.' २०२१ टी-२० विश्वचषकापूर्वी विराट कोहलीने टी-२० कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर रोहितला पूर्णवेळ टी-२० कर्णधार बनवण्यात आले होते. यानंतर त्याच्याकडे एकदिवसीय आणि कसोटी संघाचीही कमान देण्यात आली. वाचा- असा आहे मुंबईचा संघ - (कर्णधार), जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, ईशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, बासिल थम्पी, मुरुगन अश्विन, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, मोहम्मद अरशद, रायली मेरिडिथ, टिम डेव्हिड, टायमल मिल्स, डॅनियल सॅम्स, जोफ्रा आर्चर, तिलक वर्मा, संजय यादव, अनमोलप्रीत सिंह, रामदीप सिंह, राहुल बुद्धी, शोकीन, फॅबियन ऐलन, अर्जुन तेंडुलकर, आर्यन जुयाल
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/lK9Rkur
via IFTTT