Type Here to Get Search Results !

योगी आदित्यनाथ घेणार यूपीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ! कधी आणि कुठे? वाचा सविस्तर

लखनऊ: उत्तर प्रदेशचे पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. शपथविधी सोहळ्याची तारीख जवळपास निश्चित झाली आहे. शुक्रवारी 'ANI' या वृत्तसंस्थेने यासंबंधी ट्विट केलं आहे. योगी आदित्यनाथ हे २५ मार्च रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. योगी हे संध्याकाळी चार वाजता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. पाच वर्षांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आली आहे. भाजपने उत्तर प्रदेशात विजय मिळवून इतिहास रचला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भाजपचं दुसऱ्यांदा सरकार आलं आहे. आता हा शपथविधी सोहळा २५ मार्च रोजी शहीद पथावरील इकाना स्टेडियममध्ये होईल. या सोहळ्यात मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यासह अन्य मंत्रीही शपथ घेणार आहेत, असे सांगितले जात आहे. मंत्रिमंडळात महिला आणि तरूणांना प्राधान्य दिले जाईल, असे दिसते. संध्याकाळी हा सोहळा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह केंद्र सरकारमधील अनेक मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, आरएसएस आणि भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. इकाना स्टेडियममध्ये या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झालेली असल्याचे सांगितले जात आहे. मंत्रिमंडळाचे स्वरूप कसे असेल, याबाबत योगी आदित्यनाथ यांची पक्षनेतृत्वासोबत चर्चा झालेली आहे. उत्तर प्रदेशात सरकार स्थापनेसंबंधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांना अनुक्रमे पर्यवेक्षक आणि सहपर्यवेक्षकाची जबाबदारी दिली होती. या शपथ सोहळ्याला बसप प्रमुख मायावती, समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यादव, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांमधील लाभार्थ्यांना यावेळी निमंत्रित करण्यात येईल. त्यात महिलांची संख्या मोठी असेल, असे सांगण्यात येत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/alkC4X9
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

ADVERTISEMENT