Type Here to Get Search Results !

'मुख्यमंत्री ठाकरेंनी मला फोन केला आणि म्हणाले...; चौकशीनंतर राणेंचा खळबळजनक दावा

मुंबई: केंद्रीय मंत्री (Narayan Rane) आणि त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे (Nitesh rane) या दोघांची दिशा सालियन मृत्यूप्रकरणी (Disha Salian Death Case) तब्बल ९ तास चौकशी केल्यानंतर मालवणी पोलिसांनी राणे पिता-पुत्रांना घरी सोडले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री राणे यांनी (CM Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केला. घटनास्थळी एका मंत्र्याची गाडी होती असे बोलू नका, तुम्हालाही मुले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला फोन करून सांगितल्याचा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी केला. आमची चौकशी ही राजकीय हेतूने प्रेरित झालेली असून आम्ही अन्यायाविरुद्ध आवाज उठवतच राहणार, आमचा आवाज कोणीही दाबू शकणार नाही, असे राणे यांनी म्हटले आहे. (after 9 hours of interrogation union minister made serious allegations against ) राणे पिता-पुत्र ९ तासांनंतर पोलिस ठाण्याबाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांच्य प्रतिनिधींनी त्यांना एकच गराडा घातला. ९ तास झालेल्या चौकशीबाबत बोलताना राणे म्हणाले की, मला दोन दिवसांपूर्वी मालवणी पोलिस ठाण्यातून ४१- एची एक नोटीस आली. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी केलेल्या आरोपांच्या अनुषंगाने आपण आपले म्हणणे सांगण्यासाठी पोलिस ठाण्यात यावे अशी ती नोटीस होती. दिशा सालियनच्या आईने तक्रार केली होती. त्यावर तुमचे म्हणणे काय अशी पोलिसांनी विचारणा केली होती. मी आणि नितेश राणे जे पत्रकार परिषदतेत बोललो होतो की तिचे खरे आरोपी पकडले पाहिजेत. ती आत्महत्या नसून ती हत्या आहे. तिला न्याय मिळावा याच हेतूने आम्ही बोलत होतो. क्लिक करा आणि वाचा- महापौर किशोरी पेडणेकरांवर राणेंचा गंभीर आरोप दिशा सालियन यांच्या आईने आमच्या विरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आम्हाला चौकशीसाठी बोलावले. महापौर किशोरी पेडणेकर या दिशा सालियन यांच्या मातोश्रींना जाऊन भेटल्या. त्यानंतर त्यांनी त्यांना आमच्या विरोधात तक्रार करायला प्रवृत्त केले. राणे पिता-पुत्रांनी दिशा सालियन आणि आमच्या कुटुंबाची बदनामी केली अशी तिच्या आईची तक्रार आहे. मात्र ही खोटी तक्रार असल्याचे राणे म्हणाले. आम्हाला पोलिसांनी ९ तास बसवले. मी केंद्रीय मंत्री आहे आणि नितेश राणे हे आमदार आहेत. कोणावर अन्याय होत असेल त्याला न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे असे आम्ही पोलिसांना वारंवार सांगत होतो.शेवटी आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन केला. नंतर आम्हाला सोडले. या प्रकरणी आम्ही अटकपूर्व जामीन घेतला आहे. क्लिक करा आणि वाचा- 'मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोन आला' या प्रकरणी आम्ही जे सुरुवातीपासून बोलत होतो तेच सांगितले. दिशा सालियनची हत्या ८ जूनला आणि सुशांतची हत्या १३ जूनला हत्या झाली. आमच्या वक्तव्यानंत मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोन आला. मंत्र्याची गाडी होती असे बोलू नका. तुम्हाला पण मुले आहेत. तुम्ही असे काय करू नका. हे मी माझ्या जबाबात सांगितले मात्र हे वाक्य वगळले जबाबातून वगळण्यात आले आहे. हे आजचे प्रकरण हे राजकीय हेतूने प्रेरित आहे. आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. आम्ही अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. पोलिसांनी ९ तास घेतले म्हणजे फार काही मिळवले नाही, असे राणे यांनी म्हटले आहे. दिशा सालियनचे प्रकरणाची फाईल बंद करण्यात येत असून हे सरकार गुन्हेगारांना संरक्षण देत आहे, असा आरोपही राणे यांनी यावेळी केला. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/cVOEx9f
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

ADVERTISEMENT