Type Here to Get Search Results !

श्रीलंकेत भाऊबंदकी, पंतप्रधान महिंदा राजपक्षेंना हटवण्याची राष्ट्रपती भावाची तयारी

कोलंबो : श्रीलंकेतील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रपती () आणि () यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी आंदोलन सुरु केलेलं आहे. आता राष्ट्रपतींनी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना पदावरुन हटवण्यास सहमती दर्शवली आहे. श्रीलंकेच्या पंतप्रधान पदावर भावाच्या जागी दुसऱ्या नेत्याची नियुक्ती करण्यास तयार असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रपतींच्या या खेळीमुळं आंदोलक शांत होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. माजी राष्ट्रपतींसोबत बैठक आणि महिंदा राजपक्षेंची गच्छंती निश्चित श्रीलंकन माध्यमातील रिपोर्टनुसार गोतबाया राजपक्षे यांनी माजी राष्ट्रपती आणि खासदार मैत्रीपाला सिरीसेना यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रपतींनी पंतप्रधानांच्या नावासह राष्ट्रीय परिषद जाहीर करण्याचं आश्वासन दिलं. या परिषदेकडून नव्या मंत्रिमंडळाची स्थापना केली जाईल, त्यामध्ये सर्व राजकीय पक्षांना स्थान देण्यात येईल, असं गोतबाया राजपक्षेंनी सांगितलं आहे. तर, सिरीसेना यापूर्वी श्रीलंकेतील सत्ताधारी पक्षामध्ये होते. मात्र, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी ४० खासदारांसह पक्ष सोडला. 1948 मध्ये स्वतंत्र झाल्यानंतर श्रीलंका पहिल्यांदा आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. श्रीलंकेनं परकीय देश आणि संस्थांकडून घेतलेलं कर्ज परतफेड करणं थांबवलं आहे. यावर्षी श्रीलंकेला ७ अब्ज अमेरिकन डॉलरचं कर्ज परत करायचं आहे. तर, २०२६ पर्यंत २५ अब्ज अमेरिकन डॉलरचं कर्ज परत करायचं आहे. दुसरीकडे श्रीलंकेकडील परकीय गंगाजळी १ अब्ज डॉलरपर्यंत घसरील आहे. परदेशी कर्ज देण्याएवढे पैसे देखील नसल्याचं समोर आलं आहे. परकीय चलन कमी असल्यानं श्रीलंकेची आयात घटली आहे. खाद्यपदार्थ, इंधन तेल, गॅसच्या किमती देखील भडकल्या आहेत. महिंदा राजपक्षे आणि गोतबाया राजपक्षे यांच्या कुटुंबाचं गेल्या २० वर्षापासून श्रीलंकेवर राज्य आहे. त्यामुळं आर्थिक संकटाला श्रीलंकन नागरिकांनी राजपक्षे कुटुंबाला जबाबदार धरलं आहे. गेल्या रविवारी आंदोलकांनी पंतप्रधान निवास आणि राष्ट्रपती निवासाबाहेर आंदोलन केलं होतं. करोना विषाणू संसर्गाच्या काळात पर्यटन व्यवसाय बंद राहिल्याचा श्रीलंकेला फटका बसला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ELWToag
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

ADVERTISEMENT