Type Here to Get Search Results !

'नवनीत राणांनी महिला आयोगाकडे तक्रार करावी', आयोगाच्या सदस्याचा सल्ला

अहमदनगर: ‘ज्या महिला त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून आयोगाकडे तक्रार दाखल करतात, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न महिला आयोग करतो. त्यामुळे अमरावतीच्या खासदार (Navneet Rana) यांना स्वतःवर अन्याय झाल्यासारखे वाटत असेल तर त्यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करावी,’ असा सल्ला राज्य महिला आयोगाच्या सदस्य (Utkarsha Rupwate) यांनी दिला आहे. ( has advised mp to lodge a complaint) महिला आयोगाच्या सदस्य रुपवते आणि दीपिका चव्हाण अहमदनगरला आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राणा यांच्यासंबंधी राज्य महिला आयोगाच्या भूमिकेबद्दल रुपवते यांना विचारले असता त्या म्हणाल्या, ‘हा विषय खूप मोठा आहे. राणा यांनी ट्वीट केले आहे, लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे, बरेचसे व्हीडीओही आहेत. असे असतानाही एक महिला म्हणून त्यांना जर स्वतःवर अन्याय झाल्याचे वाटत असेल तर त्यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करावी. ज्या महिला त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून आयोगाकडे तक्रार दाखल करतात, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न महिला आयोग करतो. त्यामुळे राणा यांनाही त्यांच्यावर अन्याय झाल्याचे त्यांना वाटत असेल तर त्यांनीही तक्रार दाखल करावी, त्याची दखल आयोग घेईल,’ असे स्पष्ट भाष्य रुपवते यांनी केले. क्लिक करा आणि वाचा- ऑगस्टमध्ये पिंक बॉक्स उपक्रम शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना छेडछाड, लैंगिक छळ, फसवणूक वा अन्य कोणत्याही तक्रारी करण्यासाठी प्रत्येक शाळा-महाविद्यालयात पिंक बॉक्स ठेवला जाणार आहे. त्यात विद्यार्थिनी स्वतःच्या नावानिशी वा नावाविना तक्रार देऊ शकतात. या उपक्रमाचा आराखडा तयार केला जात असून, येत्या ऑगस्टपासून तो राज्यात सुरू होईल, असे रुपवते यांनी स्पष्ट केले आहे. क्लिक करा आणि वाचा- रुपवते पुढे म्हणाल्या, ज्या गावात बालविवाह होतील, त्या गावातील सरपंच व ग्रामसेवकाचे पद रद्द करण्याची शिफारस राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शासनास केली आहे. याशिवाय गावस्तरावर अंगणवाडी सेविकेद्वारे बालविवाहाचे दुष्परिणाम यावर ग्रामस्थांची समुपदेशन मोहीम राबवली जाणार आहे. सोशल मिडियाद्वारे मुलींच्या फसवणुकीचे प्रकार होत असल्याने मुले व मुलींसाठी संवाद उपक्रम आयोगाद्वारे घेतले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/pm2XtQ0
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

ADVERTISEMENT