
कल्याण : () यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) उमेदवारी चालली, भाजपच्या (BJP) दर आठवड्याला होणाऱ्या बैठकीला ते हजेरी लावायचे, मात्र शिवसेनेचे शिवधनुष्य त्यांना चालले नाही, हे आमचे दुर्दैव म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया खासदार (Vinayak Raut) यांनी व्यक्त केली आहे. खासदार राऊत आज कल्याण मध्ये आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी कल्याणात आले होते. (shiv sena mp criticizes chhatrapati sambhaji raje) शिवसेनेचे यांनी आज कल्याणमध्ये शिवसंपर्क अभियान कार्यक्रमात कल्याण पश्चिमेतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शाहू महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. क्लिक करा आणि वाचा- संभाजीराजे यांनी शिवसेनेवर केलेल्या आरोपानंतर त्यांचे वडील छत्रपती शाहू महाराज यांनी शिवसेनेने छत्रपती घराण्याचा अपमान केला नसल्याचे सांगत संभाजीराजे यांना खडेबोल सुनावले. तर याबाबत छत्रपती संभाजीराजे यांनी सत्य तेच बोललो, वडिलांचा मी आदर करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही असे ट्विट केले. याबाबत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना विचारलं असता त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचे आभार मानून वंदन करतो, असे सांगितले. क्लिक करा आणि वाचा- शाहू महाराज हे मोठ्या विचारांचे आहेत. शाहू महाराजांचे आम्हाला मार्गदर्शन लाभत आहे हे आमचे भाग्य असल्याचे सांगितले. शाहू महाराजांनी जे वक्तव्य केले ते योग्यच असून छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेची उमेदवारी देत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेची उमेदवारी देतो मात्र शिवबंधन बांधा असे सांगितले. ती जागा शिवसेनेची आहे. त्या जागेवरून शिवसेनेचा खासदार जाणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किमान दोन महिने आधीच स्पष्ट निर्णय दिला होता. मात्र दुर्दैवाने संभाजीराजे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी चालली, भाजपची उमेदवारी चालली, दर आठवड्याला होणाऱ्या भाजपच्या बैठकीला ते हजेरी लावायचे. मात्र, शिवसेनेच्या शिवधनुष्य त्यांना चाललं नाही हे आमचे दुर्दैव म्हणावे लागेल अशी खंत त्यांनी व्यक्त केली. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/oeYc4rX
via IFTTT