
कोल्हापूर : शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने शिवसेनेची बुलंद तोफ () यांची कोल्हापुरात जंगी सभा पार पडली. कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक संजय पवार (Sanjay Raut) यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह संचारला आहे. राऊतांच्या भाषणावेळी शिवसैनिकांचा हाच उत्साह चर्चेचं कारण ठरला. कारण राऊत भाजपवर टीकेची झोड उठवत असताना कार्यकर्त्यांमधून 'चंपा चंपा'चा आवाज आला. त्यावरून संजय राऊतांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना टोला हाणला. 'चंपाबाई आता कोल्हापुरात येत नाही असं कळलं', असं राऊत म्हणाले. आजपासून कोल्हापुरात शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे. खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी आयोजित सभेत राऊतांनी जोरदार बॅटिंग केली. संभाजीराजेंच्या खासदारकीच्या अनुषंगाने सेनेवर झालेल्या टीकेचा त्यांनी समाचार घेतला. तसेच महापालिका निवडणुकीसाठी सेना कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिले. "कोल्हापूरची महानगरपालिका आपल्याला जिंकायची आहे. कोल्हापुरात आपले सहा आमदार होते, आता एकच आहे, पाच का गेले? याचा विचार करा. पुढल्यावेळी सहाच्या सहा आमदार आले पाहिजेत. ते आघाडी वगैरे आपण नंतर बघू... जे आमचं गेलेलं आहे, ते आम्ही परत मिळवणार, हा निश्चय करा. आता ३ खासदार झाले आहेत. तेव्हा पुन्हा ६ आमदार इथे आले पाहिजे. त्यापूर्वी कोल्हापुरची महानगरपालिका मिळवायची आहे", असं सांगत संजय राऊतांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. फडणवीस आणि भाजप नेत्यांवर राऊत टीकेची तोफ डागत असताना त्याचवेळी कार्यकर्त्यांमधून चंपा, चंपा असा आवाज आला. त्यावर "तुमच्या कोल्हापूरचीच चंपाबाई ना... आता कोल्हापुरात चंपाबाई येत नाही असं मला कळलं... कोल्हापूरवाले हाकलून देतात", असा टोला राऊतांनी हाणला. भाजपवाल्यांनो आतातरी शहाणे व्हा आणि कपटी कारस्थाने बंद करा "आज छत्रपतींनी सांगितलं, सहाव्या जागेवरुन संभाजीराजेंच्या संदर्भाने जो वाद सुरु आहे तो निरर्थक आहे. शिवसेनेने छत्रपती घराण्याचा अजिबात अपमान केलेला नाही. शिवसेनेने कायमच छत्रपती घराण्याचा सन्मान केला आहे. छत्रपतींनी आजही मनाने शिवसैनिक असल्याचं गर्वाने सांगितलं. शाहूराजांचं सत्य म्हणजे आम्हाला अंबाबाईने दिलेला प्रसाद आहे, आशीर्वाद आहे, असं आम्ही मानतो. भाजपवाल्यांनो आतातरी शहाणे व्हा आणि कपटी कारस्थाने बंद करा. शिवसेनेने छत्रपतींची कोंडी केली, असं फडणवीस सांगत होते. पण आता त्यांचीच कोंडी झाली", असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपने कारस्थान रचलं "शिवसेनेची जागा होती. आम्ही त्यांना ऑफर दिली. सन्मानाने या आणि खासदारकी घ्या, असं आम्ही त्यांना सांगितलं. पण भाजपने कारस्थान केलं. सेनेला बदनाम करण्यासाठी भाजपने त्यांचा वापर केला. पण आज प्रत्यक्ष शाहू महाराजांनी त्यांचा मुखवटा फाडला", असं राऊत म्हणाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/zEiKk9A
via IFTTT