
म. टा. प्रतिनिधी, : आयुर्वेद महाविद्यालये व वैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्न हॉस्पिटलमधील विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेल्या आहेत. त्यामुळे ससून रुग्णालयाने औंध हॉस्पिटलमधील १९ परिचारिका आणि विद्यार्थ्यांना रविवारपासून कामावर बोलाविले आहे. या संपामुळे रुग्णांसेवा विस्कळीत झाली आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयांतील परिचारिका विविध मागण्यांसाठी २६ मे पासून संपावर गेल्या आहेत. त्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने त्या शनिवारपासून बेमुदत संपावर गेल्या आहेत. ससून शासकीय रुग्णालयातील जवळपास ८०० परिचारिकांनी संपात सहभाग घेतला आहे. तातडीची सेवा वगळता इतर परिचारिका संपात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे रुग्ण सेवेवर परिणाम झाला असून त्यांचे हाल होऊ लागले आहेत. याबाबत ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे म्हणाले की, रुग्णालयात सध्या एकूण परिचारिकांपैकी ६० टक्के परिचारिका संपावर गेल्या आहेत. तर, ४० टक्के परिचारिका सेवेत आहेत. तर, तातडीच्या शस्त्रक्रिया सध्या करण्यात येत असून नियोजित केलेल्या शस्त्रक्रिया परिचारिकेच्या अभावी नंतर करण्यात येणार आहेत. त्यामुळे औध हॉस्पिटलमधून १९ परिचारिका रविवारपासून ससून रुग्णालयात येणार आहेत. तसेच रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी निवासी डॉक्टर, नर्सिंग स्टूडंट, अध्यापक, इतर डॉक्टर यांना अतिरिक्त डयूटी लावण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णसेवा बाधित झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने एकूण परिचारीकांपैकी ९० टक्के परिचारीका या संपावर गेल्या असून, केवळ दहा टक्के परिचाराकी कामावर हजर झाल्या आहेत असा दावा केला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/L0Riqw3
via IFTTT